09/12/2026
११ सप्टेंबर २००१.
FDNY फायरफायटर Tim Duffy त्या दिवशी सुट्टीवर होते. घरी आपल्या 2000 Harley-Davidson Super Glide Sport वर काम करत असतानाच त्यांनी न्यूयॉर्कवर झालेला हल्ला पाहिला.
क्षणाचाही विचार न करता त्यांनी Harley चा spark plug परत बसवला, आपले firefighting gear घेतले आणि ज्या दिशेने हजारो लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते, त्याच दिशेने Tim आपल्या Harley वरून धावत गेले—Ground Zero कडे!
South Tower कोसळताना ते तिथेच होते. ढिगाऱ्यात सापडले, त्यातून बाहेर आले आणि पुन्हा इतरांचे जीव वाचवण्यासाठी कामाला लागले.
वर्षांनंतर Harley-Davidson ने त्यांची तीच ऐतिहासिक Super Glide Sport पूर्णपणे restore करून या शौर्याला मानवंदना दिली.
माझ्यासाठी ही फक्त एका firefighter ची किंवा एका motorcycle ची गोष्ट नाही.
ही गोष्ट आहे कर्तव्याची, धैर्याची, स्वातंत्र्याची आणि अमेरिकेची.
त्या दिवशी एक माणूस आणि त्याची Harley आगीच्या दिशेने धावले... आणि इतिहासाचा भाग बनले.
Harley is America and America is Harley. 🇺🇸
Tim Duffy आणि 9/11 च्या सर्व वीरांना मनापासून सलाम!!