27/02/2026
“माझ्या मराठीचे बोलू कौतुके किती…”
माझ्या मराठीचे बोलू कौतुके किती,
ओठांवर येता शब्द होतात मोती।
आईच्या मायेचा गंध तिच्या भाषेत,
मनामनांत रुजते प्रेमाची ज्योती॥
साधी, सरळ तरी भावनांची श्रीमंती,
संस्कृतीची जपते अमोल संपत्ती।
माझ्या मराठीचा अभिमान वाटे जगी,
हीच माझी ओळख… हीच माझी भक्ती॥ 🙏
~ सुरेंद्र गावंडे, जुनोना ( वर्धा )
अधिक काव्य व माझे लेख वाचण्याकरिता फेसबुक पेज ला फॉलो करा.
🔗https://www.facebook.com/share/1A2awj894R/