21/10/2018
*नम्र आव्हाहन*
प्रिय मित्रांनो
आपल्या परिसरात जवळच सत्पाळा राजो ccडी रस्त्यावर *मदर तेरेसा वृधदाश्रम* आहे. कदाचित आपणास ह्या ठिकाणी जाण्याचा योग कधी आला नसावा पण १०० पेक्षा जास्त वृध्द व आजारी वृद्धांची ह्या ठिकाणी काळजी घेतली जाते. यातील अनेक जण अनेक व्याधींनी त्रस्त आहेत व त्यांची वैद्यकीय सेवा येथे होत असते. त्यासाठी एखाद्या इस्पितळा सारखी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. काही वृद्ध त्यांचा मुलांनी किवा नातेवाईकांनी येथे ठेवले आहेत व काही अनाथ सुध्दा आहेत. ह्या ठिकाणी एक दफनभूमी सुध्दा आहे व जे अनाथ आहेत त्यांना मृत्युनंतर घेवून जाणारे कोणी नसेल तर त्यांचा अंत्यसंस्कार येथेच नियमानुसार केला जातो. विविध विशिष्ठ आजारावर उपचार देणारे महाराष्ट्रातील हे एकमेव वृद्धाश्रम आहे. काम खूप आहे पण आर्थिक पाठबळ कमी पडत असते कारण अजून १०० वृद्ध व आजारी लोकांची वेटींग लिस्ट आहे. त्यासाठी विविध माध्यमातून मदतीचे प्रयत्न चालू आहेत.
अजुन १०० खाटा वाढविण्याचा मनोदय येथील विश्वस्त मंडळाने ठेवला आहे व त्यासाठी आजच्या पिढीचे सुप्रसिद्ध *गायक जावेद अली* ह्याच्या गायनाचा *NIRVANA* हा कार्यक्रम आयोजित केला आहे. असा उच्च दर्जाचा कार्यक्रम पालघर ते दहिसर पर्यंत कधीच झाला नसेल. आपणास हा कार्यक्रम पाहण्याची व त्याचबरोबर ह्या वृध्दाश्रमाला मदत करण्याची दुहेरी संधी चालून आली आहे.
कृपया कमीत कमी ५०० व ३०० रुपयाचे तिकिट घेवून मदतीचा हात पुढे करा व अश्या ऐतिहासिक संगीत कार्यक्रमाचा आनंद लुटा. कॉलेज विद्यार्थ्यांसाठी तिकिट २५० रुपये ठेवण्यात आले आहे. आपल्या गावातील तरुण कार्यकर्ते येतील त्यांना सहकार्य करा. अनेक वर्षे फिल्मी दुनियेत काम करणारे आपल्याच विभागातील रॉबर्ट डिमेलो ह्या कार्यक्रमासाठी निस्वार्थीपणे विशेष मेहनत घेत आहेत. आपल्या सहकार्याची अपेक्षा.
*पूर्ण कुटुंबासाठी विशेष पास उपलब्ध आहेत.*
आपलाच
Allwyn Lemos
9860043053