ओम् दत्त गुरुगाथा

ओम् दत्त गुरुगाथा एका अलौकिक गुरु-भक्ताची एक अनोखी वाचनीय कहाणी... लेखक - श्री. दिपक नरवणे

27/11/2024
ओम् दत्त.महाराष्ट्र राज्य माजी निवडणूक आयुक्त माननीय श्री. यु. पी. एस. मदान साहेब आणि प्रख्यात लेखक, कवी श्री. प्रवीण दव...
04/11/2024

ओम् दत्त.

महाराष्ट्र राज्य माजी निवडणूक आयुक्त माननीय श्री. यु. पी. एस. मदान साहेब आणि प्रख्यात लेखक, कवी श्री. प्रवीण दवणे यांनी ओम् दत्त गुरुगाथा हे पुस्तक वाचून दिलेली प्रतिक्रिया....

अशा अनेक प्रतिक्रिया या पुस्तकावर आलेल्या आहेत. लवकरच या पेज वर त्या पोस्ट करू.

ओम् दत्त

#गुरुगाथा #ओमदत्त #गुरू

"ॐदत्त गुरुगाथा"एका अलौकिक गुरु-भक्ताची, अनोखी वाचनीय कहाणीॐदत्त परिवाराचे गुरू ॐदत्त श्री ठाकूर महाराज ज्यांना गुरुशिखर...
25/10/2024

"ॐदत्त गुरुगाथा"

एका अलौकिक गुरु-भक्ताची, अनोखी वाचनीय कहाणी

ॐदत्त परिवाराचे गुरू ॐदत्त श्री ठाकूर महाराज ज्यांना गुरुशिखरावर अबुपहाड येथे एका पायावर उभे राहून घंटानाद करत असतांना ॐदत्त हा बीजमंत्र प्राप्त झाला व त्यांनी ॐदत्त परिवाराची स्थापना केली. प्रपंचकरून परमार्थ हा त्याचा पाया ठेवून स्वतः प्रपंच करून परमार्थाचे हे एक उदाहरण आपल्या भक्तांच्या समोर ठेवले. जीवनात अनेक पुस्तके लिहिली व मधुभजन या नावाने भक्तीगीते लिहून व ती स्वतः गाऊन त्याच्या कॅसेट भक्तांना उपलब्ध करुन दिल्या. तसेच, ॐदत्त परिवाराच्या माध्यमातून अनेक जनहिताची कामेही केली. "जीवनसिंधू" नावाचा प्रासादिक ग्रंथ लिहिला व श्री. गुरुचरित्रासारख्या सिद्ध पोथीचे मराठीत रूपांतर "कथायुक्त अल्पबोध" हे पुस्तक प्रापंचिकांना देऊन दत्तसंप्रदायाचा प्रसार केला.

त्यांच्या अनेक गावागावात असलेल्या ॐदत्त परिवारातील भक्त आणि डोंबिवलीतील रहिवाशी श्री. दिपक नरवणे, ज्यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षापासून त्यांना गुरु मानून आपल्या जीवनाचा गुरूंनी उध्दार केला ही भावना व प्रामाणिक श्रध्दा यामुळे त्यांच्या जिवनात आलेले अनुभव, प्रसंग व जगलेले जीवन याच्या प्रत्यक्ष अनुभवाचे लिखाण लेखक श्री. दिपक नरवणे यांनी "ॐदत्त गुरुगाथा" या पुस्तकामधून सादर केले आहे.

आपल्या गुरूंचा जन्म तुकाराम बीज या तिथीला झाल्याने जशी श्री. तुकाराम महाराज यांची गाथा त्याचप्रमाणे आपल्या गुरूंची गुरुगाथा असे नाव देऊन सदर पुस्त‌क लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन दि. २१/७/२०२४ रोजी गुरुपौर्णिमा मुहूर्तावर करून, आपण आपल्या गुरूंच्या कार्याचे ऋण कधीच फेडू शकत नाही हया भावनेने व पुस्तकरुपाने गुरुचरणी नतमस्तक होऊन आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा दिली.

श्री.दिपक नरवणे यांच्या पुस्तकात ४२ प्रकरणे असून त्याच्या प्रत्येक प्रकरणाचा शेवट त्या शीर्षकावर चार ओळी काव्य करून त्याची पूर्तता केली. तसेच अनुक्रमणिकेत शीर्षक कथा लिहून त्याची संक्षिप्त रूपात माहिती दिली. पुस्तकाची स्मरणखूण म्हणून योग्य काव्यात वेगळे बुकमार्क सादर केले व शेवटी पुस्तकाचा सांभाळ करणाऱ्या शेवटच्या मलपृष्ठावर त्या कव्हरचे मनोगत काव्यात सादर केले. असे हे पुस्तक वाचतांना पुस्तकातील प्रत्येक प्रसंगाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.असे प्रभावी लिखाण जे वाचतांना काही प्रसंग हसवतात; तर काही प्रसंगात सद्गुरूंच्या लीला वाचून विचार करायला लावतात किंवा काही प्रसंगाने डोळेही पाणावतात.

असे श्रद्धावानांना व भाविकांना वाचून आनंद मिळावा ह्या उद्देशाने सदर पुस्तक अन्वय प्रकाशन, ठाणे या नावाने उपलब्ध आहे. श्री.नरवणेंच्या शब्दांत त्यांनी लिहिलेल्या चार ओळी

लिहिले पुस्तक, स्वानुभवाचे कथन
असेल आवड, कराल वाचन
मम गुरूंच्या रंगल्या कथा
ही त्यांची "ॐदत्त गुरुगाथा"

सदर पुस्तकाची प्रत घरपोच मिळण्यासाठी
संपर्क : 9820016430 / 8108939347
मूल्य : 270 रुपये (कुरियर खर्च वेगळा)

#गुरू

Address

THANE
Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओम् दत्त गुरुगाथा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category