Abhinay Katta

Abhinay Katta कलागुणांना वाव देणारं एक खुलं व्यासपीठ !

अभिनय कट्ट्याच्या नौपाडा संगीत कट्ट्यावरील आषाढी एकादशीची सांगितीक वारी :प्रतिनिधी : नंदन भालवणकर आषाढी कार्तिकी भक्तजन ...
13/07/2024

अभिनय कट्ट्याच्या नौपाडा संगीत कट्ट्यावरील आषाढी एकादशीची सांगितीक वारी :
प्रतिनिधी : नंदन भालवणकर

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती

आपल्या लहानपणापासूनच सर्वांच्याच आवडीच्या असलेल्या ह्या आरतीने आपल्या सर्वांच्याच मनात घर केले आहे. पंढरपूरचा विठोबा म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके दैवत! विटेवरी उभा कटेवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ ! पाऊस सुरू झाला की मनात काही गोष्टींची आपसूकच आठवण होते. आषाढ महिन्यातील (इंग्रजी मध्ये जुलै) पंढरीची वारी ही त्यापैकीच एक ! महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.

अशीच भक्तीमय संगीत वारी अभिनय कट्ट्याच्या नौपाडा संगीत कट्ट्यावर साजरी झाली ! आज ह्या सुंदर भक्तीमय क्षणांचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले होते - वासू फणसे, अमिता प्रभू, लेखा तोरसकर, भरत श्रोत्री, प्रेम सुर्वे, हरीष सुतार, यशवंत कालेकर व नंदन भालवणकर यांना. कट्ट्यावर विठूरायाची सुरेल, भाव भक्तीने रसरसलेली अशी फिरत्या चाकावरती, चंद्रभागेच्या तीरावरती, विठ्ठल नामाची शाळा भरली, कानडा राजा पंढरीचा, माझे माहेर पंढरी, अबीर गुलाल यासारखी अनेक भजने / भक्तीगीते सादर झाली. लेखा तोरसकर यांनी गायनासोबत अत्यंत सुंदर पद्धतीने सूत्रसंचालन देखील केले.

ह्या संगीत कट्ट्याबद्दलची अजून एक अद्वितीय आणि विलक्षण गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रत्यक्ष अधिष्ठान ! महाराजांच्या पादुका आणि छबी म्हणजेच प्रत्यक्ष महाराज तिथे आहेतच ! स्वामी समर्थ महाराज आणि पंढरीचा विठोबा हे एकच, अभिन्न आहेत ! जिथे भक्तीचा गाभा आहे अशा भक्तीमय वातावरणात आपली कला सादर करायला मिळणे ही एका कलाकारासाठी खरोखर भाग्याचीच गोष्ट आहे ! आणि ह्याचे सारे श्रेय अभिनय कट्ट्याचे सर्वेसर्वा श्री. किरण नाकती यांनाच जाते !

सध्याची लाईफस्टाइल ही खूप फास्ट आहे. हल्ली प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कामाच्या व्यापात इतका गढलेला आहे की कशालाच उसंत नाही. अशा वेळेस संगीत कट्ट्यावर आलेल्या प्रत्येकानेच आषाढीच्या वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असणार हे नक्की ! इथे उपस्थित प्रत्येकानेच ही आलेली सुवर्णसंधी ग्रॅब केली, आणि आनंद लुटून नेला हे नक्की !

आपला कट्टा, अभिनय कट्टा या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला.
08/07/2024

आपला कट्टा, अभिनय कट्टा या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला.

05/03/2024

अभिनय कट्ट्याच्या तेराव्या वर्धापनदिनी लावणीसम्राज्ञी माधुरी चव्हाणचे सादरीकरण

भरलं आभाळ लावणी

28/02/2024

अभिनय कट्ट्याच्या तेराव्या वर्धापनदिनी लावणीसम्राज्ञी माधुरी चव्हाणचे सादरीकरण

28/02/2024

अभिनय कट्ट्याच्या तेराव्या वर्धापनदिनी कविता सादर करताना नंदन भालवणकर

28/02/2024
28/02/2024

अभिनय कट्ट्याच्या तेरा वर्षाच्या प्रवासातील कलाकारांच्या प्रतिक्रिया :

28/02/2024

अभिनय कट्ट्याच्या तेरा वर्षाच्या प्रवासातील कलाकारांच्या प्रतिक्रिया :
अभिनय कट्ट्याचा कलाकार महेश रासने याने करून दिली खिचडी ची आठवण.

अभिनय कट्ट्याच्या प्रवासाला तेरा वर्ष पूर्ण :
28/02/2024

अभिनय कट्ट्याच्या प्रवासाला तेरा वर्ष पूर्ण :

अभिनय कट्टा ६००लवकरच...
25/12/2023

अभिनय कट्टा ६००
लवकरच...

Address

Abhinay Katta, Jijamata Garden, Nr. Kopari Bridge, Bhasakr Colony, Thane (West)
Thane
400602

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 10:30am - 7pm
Wednesday 10:30am - 7pm
Thursday 10:30am - 7pm
Friday 10:30am - 7pm
Saturday 10:30am - 7pm
Sunday 10:30am - 7pm

Telephone

02225396270

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhinay Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Abhinay Katta:

Share