26/10/2022
*एक अशीही दिवाळी*
दिवाळीचा सण सर्वत्र मोठया उत्साहात साजरा केला जात असताना. नवीन कपडे, फटाक्यांची आतिषबाजी यासह तिखट गोड फराळाची मेजवानी. यात सर्वजण गुंतून गेले आहेत. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणा-या, आनंदाच्या या पर्वात काहींना मात्र दिवाळीच्या आठवणी आपण किती एकटे आहोत याची जाणीव करून देतात. शहरातील निराधार वयोवृद्धांचा संभाळ करणाऱ्या, माऊली वृद्धाश्रमातील आजी आजोबांची ही व्यथा.
हेच हेरून नक्षत्र डान्स अकॅडमी च्या सदस्यांनी सर्व निराधार आजी अजोबांसोबत, गोड तिखट फराळ व ब्लेंकेट वाटप करून आगळी वेगळी दिवाळी साजरी केली.
यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र रक्ताच्या नात्या प्रमाणे कोणीतरी आपल्या सोबत दिवाळीचा सण साजरा केल्याचा आनंद देखील पहायला मिळाला.
यासाठी नक्षत्र चे सर्व सदस्य तीन दिवसांपासून धावपळ करत होते त्यांनी दिवाळीनिमित्त सर्व आश्रमाची स्वच्छता केली फुलांच्या माळा, कंदील, आकाश दिवे याद्वारे सुशोभीकरण करण्यात आले दिवाळीच्या दिवशी सकाळी जाऊन पूर्ण आश्रमाला रांगोळी काढण्यात दिवे लावण्यात आले आणि संध्याकाळी फराळ व ब्लॅंकेट वाटप करून एक आगळीवेगळी दिवाळी साजरी केली.
सिद्धांत छल्लारे यांनी असे वृद्धाश्रम निघतात आणि त्याची गरज पडते हेच अत्यंत लाजिरवाणी आहे असे दुःख बोलून दाखवले.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने ही सेवा करण्याचा निश्चय केला असे मनोगत राहुल उपाध्ये यांनी व्यक्त केले. तसेच जुनेद सय्यद यांनी, समाजातील दुलक्षीत घटकांसोबत दिवाळी साजरी करून, आत्मिक समाधान लाभल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच वृद्धआश्रमाचे संचालक वाघुंडे यांनी नक्षत्र डान्स अकादमीचे कैतुक करत समाजातील इतरांनी देखील, असे उपक्रम राबवावे अशी इच्छा व्यक्त केली. नक्षत्रच्या सामजिक उदात्त भावनेतून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास सिध्दांत छल्लारे, विशाल पापडीवाल, प्रशांत आव्हाड, इमदाद पठाण, विजय जावरे, शुभम केनेकर, आकांक्षा गर्जे, सायली हारळे, भूमिका आणि यश शर्मा, जीशान सय्यद नदीम इनामदार विजय ज जावरे सिद्धार्थ मोरे अनिस इनामदार अथर्व पांढरे कुणाल खरात अथर्व जोशी श्रेया जाईल जितेश तलरेजा हंसिका स्वरांगी मिरीकर साक्षी शाहिद चौधरी जयश सावंत आदीं सह नक्षत्रचे विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.