Kokan maza gav

Kokan maza gav काेकणच्या आठवणी जाग्या करणार्या फोटोज आणि विडीयोज साठी आत्ताच
फाँंलो करा👇👇👇

29/08/2021
पयल नमन करितो वंदन हे गजमुखा गजवदन🙏🙏
05/10/2020

पयल नमन करितो वंदन हे गजमुखा गजवदन🙏🙏

पेब (विकटगड) (Peb) .किल्ल्याची ऊंची : २१०० फूटकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्गडोंगररांग: माथेरानजिल्हा : रायगडश्रेणी : मध्य...
05/10/2020

पेब (विकटगड) (Peb) .
किल्ल्याची ऊंची : २१०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: माथेरान
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम
पनवेलच्या ईशान्येला, मुंबई - पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन - चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला (विकटगड) आहे. गडाखालच्या पेबी देवी वरून या किल्ल्याचे नाव पेब ठेवण्यात आलेले असावे. माथेरान सारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणा जवळ, पण माणसांच्या गर्दीपासून दूर असलेला पेबचा किल्ला एका दिवसाच्या ट्रेकसाठी आदर्श जागा आहे. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट, वरील गुहेची रचना, गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड अजोड आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ, माथेरान, पनवेल या तिनही ठिकाणांहून वाटा आहेत.
📸Picture by: .

Rajgad fort
04/10/2020

Rajgad fort

महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचेदेऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणू...
03/10/2020

महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचेदेऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचामहागणपती ओळखला जातो.
रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला "महोत्कट' असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर तसे अगदी साधे-सुधेच होते. परंतु, बदलासह आता मंदिरात आद्ययावत सोयींसुविधा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी, तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. बांधकाम करताना उत्तम दिशासाधन साधले असल्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्यकाळात सूर्याची प्रकाशकिरणे देखील झळाळत्या सोनेरी तेजाचे आवरण लेऊन महागणपतीच्या पूजेसाठी येतात. अशा वेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक भासते. सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे. ही गणपतीची मूळ मूर्ती असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे सांगतात.




Address

Savantvadi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan maza gav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share