Actor Gajanan Patil sangli

Actor Gajanan Patil sangli टीव्ही फिल्म कलाकार, कवी, लेखक, अभिनव शिक्षक

Actor gajanan patil sangli.Official Page झिंग चित्रपट आगामी वादळ चित्रपट,हिरोईनचा बाबा, तुझ्यात जीव रंगला.वर पत्रकार,राजा राणीची गं जोडी व रीलस्टार,गजनीती कवितासंग्रह प्रसिद्ध ,टीव्ही फिल्म कलाकार,साहित्यिक,व्याख्याते अभिनव शाळा शिक्षक,अलकूड एम.

*नमस्कार आज 23 मे 2026 रोजी,सांगली आकाशवाणी केंद्रावर माझी व्यसन ही कविता सादरीकरण झाली. तर ऐका पुनर्प्रक्षेपण सायंकाळी ...
23/05/2026

*नमस्कार आज 23 मे 2026 रोजी,सांगली आकाशवाणी केंद्रावर माझी व्यसन ही कविता सादरीकरण झाली. तर ऐका पुनर्प्रक्षेपण सायंकाळी 06 : 35 मिनिटांनी 100.6 या आपल्या सांगली आकाशवाणी केंद्रावरून, आतापर्यंत आपण टीव्ही वर पाहिलात आणि पहिल्यांदा आकाशवाणीवर 🙏🏻🌹धन्यवाद जायन्ट्स ग्रुप सांगली.*
*या कार्यक्रमास, आकाशवाणी केंद्राचे. मा.श्री. श्रीनिवास जरंडीकर सर, व मा.श्री.महेश भिसे सर. व मा. श्री आनंदराव जाधव सर यांचे सहकार्य लाभले. धन्यवाद मनःपूर्वक आभार 🙏*

11/05/2026

*गजानन हणमंत पाटील*
*जन्म: 19 ऑक्टोबर 1975*

गजानन हणमंत पाटील (जन्म: 19 ऑक्टोबर 1975) हे मराठी शिक्षक, कवी, लेखक, शालेय नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता आहेत. अभिनव प्राथमिक शाळा, शामरावनगर, सांगली येथे 24 वर्षे सहा. शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

*कारकीर्द:* 2008 मध्ये 'मुलगी पाहिजे हो' या शालेय नाटिकेचे लेखन-दिग्दर्शन करून कला क्षेत्रात पदार्पण. 'झी मराठी', 'कलर्स मराठी', 'सोनी मराठी', 'स्टार प्रवाह' या वाहिन्यांवरील मालिकांमध्ये अभिनय. यामध्ये तुझ्यात जीव रंगला वर पत्रकार, राजा राणीची गं जोडी, जुळता जुळता जुळतंय की ', 'झिंग' व 'वादळ THE STORM' या चित्रपटांत भूमिका. 'गजनीती' हा कवितासंग्रह प्रकाशित.

*पुरस्कार व सन्मान:* 'कलादर्पणमार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा 2023', 'काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार 2025', 'आदर्श शिक्षक पुरस्कार'. 'जागर पर्यावरणाचा' नाटिकेसाठी उत्कृष्ट लेखक म्हणून राज्यस्तरीय उत्तेजनार्थ क्रमांक.

*मीडिया व सोशल मीडिया:* 'सकाळ', 'महासत्ता', 'बुलडाणा', 'सार्वभौम राष्ट्र', 'जनप्रवास', 'तरुण भारत' या वृत्तपत्रांतून विशेष बातम्या. इंस्टाग्रामवरील एका रीलला 57 लाख व्ह्यूज व 4.7 लाख लाईक्स. 'C News', 'My TV' वर मुलाखती.

*पदे:* शब्दवैभव काव्यमंच व काव्यप्रेमी शिक्षक मंच सांगलीचे समिती सदस्य. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद मिरजचे सहसचिव. मराठी भाषा साहित्य संवर्धन संस्थेचे 'अ' वर्ग सभासद.

1975 मध्ये जन्मलेल्या गजानन पाटील यांनी 2008 ते 2025 या 17 वर्षांच्या कालावधीत 6 वृत्तपत्रे, 1 पुस्तक, 6 टीव्ही चॅनल, 4 मालिका, 2 चित्रपट, YouTube लघुपट अनेक , वेबसेरीज, अनेक व 1 अल्बम सॉंग, 3 राज्यस्तरीय पुरस्कार व 57 लाख सोशल मीडिया व्ह्यूज अशा क्षेत्रात कला, साहित्य व शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.

---

❤️🌹🙏🏻
11/05/2026

❤️🌹🙏🏻

नमस्कार 🙏🏻🌹👍🏻
11/05/2026

नमस्कार 🙏🏻🌹👍🏻

*परीक्षण मा. मनिषा पाटील रायजादे मिरज**कविता संग्रह गजनीती* *कवी गजानन पाटील अलकूड एम ता. कवठेमहांकाळ* श्री गजानन पाटील ...
05/05/2026

*परीक्षण मा. मनिषा पाटील रायजादे मिरज*
*कविता संग्रह गजनीती*
*कवी गजानन पाटील अलकूड एम ता. कवठेमहांकाळ*

श्री गजानन पाटील यांचा गजनीती हा पहिलाच कवितासंग्रह वाचण्यात आला समृद्ध जीवनानुभव असल्यास आयुष्यातील असंख्य घडामोडी काव्यात्म रूप घेतात आणि लेखणीतून पाझरू लागतात. हे झरे अविरतपणे वाहत असतात. सर्वोत्कृष्ट भावनांचा आविष्कार कवितेच्या प्रत्येक ओळीतून दिसून येतो.जो समाजाकडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो आणि आपले भावविश्व ,समाज मनाचा आरसा आपल्या काव्यातून मांडत असतो. अशाच कविता गजानन पाटील यांच्या आहेत. त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये वैविध्य आहे. त्यांची कविता ही सर्वस्वी त्यांचीच आहे कारण त्यांच्या कवितांवर अन्य कोणाचाही प्रभाव नाही.

कवी,अभिनेता गजानन पाटील एक हाडाचे शिक्षक असून शिक्षकी पेशातून समाजात नानाविध व्यक्तीमत्वाचे पैलू घेऊन ते काव्यातून समाजपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांनी आपल्या प्रत्येक कवितेतून भावभावनांच्या प्रगटीकरणाबरोबर सत्याचा कैवार घेतला आहे. या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावरील चित्रातील प्रतिकात्मक मंदिर हे ज्ञानाचे मंदिर आहे आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी जंगलरूपी संकटे आपल्याला मार्गक्रमण करीत जावे लागणार आहे. मुखपृष्ठावरील चित्र हे त्याचेच द्योतक आहे. त्यांच्या या कवितासंग्रहात प्रेम, नाती, निसर्ग, परमेश्वराशी असणारे एकात्म, सण,उत्सव, ह्रदयात खोल जपलेली नाती,शेतकरी, थोर महात्मे अशा अनेक विषयांवरील अनेक कविता त्यांनी आपल्या शब्दलेखनीतून मांडल्या आहेत. त्यांनी कवितेचे अनेक प्रकार आपल्या या कवितासंग्रहातून हाताळले आहेत. प्रार्थना,ओवी,अभंग, वृत्तबद्ध कविता, काव्यांजली, हायकू, अष्टाक्षरी, द्रोण काव्यरचना, बडबडगीत,छत्तीस गुणी,गुणमेलनी,गवळण अशा अनेक काव्यप्रकारांतून त्यांनी समाजमनाशी आपल्या कवितेतून संवाद साधला आहे.आजपर्यंत कवी, अभिनेता गजानन पाटील यांनी जे पाहिले,अनुभवले ते सर्व आपल्या शब्दरूपातून रसिक वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

कवी, अभिनेता गजानन पाटील यांनी पवित्र ज्ञानदानाचे कार्य करता करता आपले अनेक छंद त्यांनी ह्रदयापासून जपले आहेत. काव्यलेखन, कथालेखन, गीतकार, टी.व्ही.,चित्रपट कलाकार, शालेय नाटीका व पथनाट्य लेखन व दिग्दर्शन केले आहे. त्यांनी टीव्हीवरील अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांनी पौराणिक नाटक, अनेक चित्रपट यामध्ये नाना प्रकारच्या व्यक्तीरेखा अतिशय सुंदरपणे रेखाटल्या आहेत.

या कवितासंग्रहातील कविता खऱ्या अर्थाने जर समजून घ्यायच्या असतील तर त्यांच्या कवितासंग्रहातील कवितांचे थोडक्यात परीक्षण पाहूया...
त्यांची पहिलीच कविता परमेश्वराची प्रार्थना आहे.
गुरूवर्य दिगंबरा स्वीकार नमस्कार
गणराया घडू दे सर्व मंगलमय जीवन
अशी आळवणी त्यांनी परमेश्वराकडे केली आहे.

मैत्री, आई, विद्यार्थी, वहिनी, मायमाऊली कुंकू, बाबांचा श्वास, अर्धांगिनी, प्रेमस्वरूप आई,शेतकरी राजा, मायलेकी, आईपण अशा विविध नात्यांवर अतिशय मनाचा ठाव घेणाऱ्या कविता लिहिल्या आहेत....

ते आपल्या मैत्री या कवितेत म्हणतात की,

"नाही स्वार्थच मनात
करता करीन मैत्रीत
जीव जीवाला देईन
जेव्हा मित्र संकटात"

मैत्रीचे जीवनातील असणारे अनन्यसाधारण महत्व त्यांनी या ओळीतून व्यक्त केले आहे. तर आई या कवितेत,

दिपस्तंभाप्रमाणे जळत
प्रत्येक जहाजाला
मार्गदर्शन करीत
जळते तू

आईपण या कवितेत,

शिकून मोठा हो शहाणा
होशील अधिकारी
गरिबीचे दिवस संपतील
डोईवरील भार संपेल तेव्हातरी

असे आईचे आर्तमय वर्णन कविने आपल्या कवितेत केलं आहे.

कवी गजानन पाटील यांनी अनेक थोर महात्मे, संत,परमेश्वराशी असणारे त्यांचं अध्यात्मिक नातं यावर सुंदर कविता लिहिल्या आहेत. त्यांनी महात्मा जोतीराव फुले, शिवाजी महाराज, संभाजी राजे, कुसुमाग्रज, स्वामी समर्थ, पंढरीची वारी, कान्हा, देवीची रुपे अशा विविध विषयांवरही समर्पक कविता लिहिल्या आहेत.

निसर्ग तर प्रत्येक कवी लेखनीला मोहिनी घालतच असतो.तर अशाच निसर्ग शब्दांनी सजलेल्या अनेक कविता यख कवितासंग्रहात वाचायला मिळतात. ते धरतीची माया या कवितेत म्हणतात,

करी प्रेमाचा वर्षाव
धरत्रीची ती माया
काळ्या काळ्या रानामधुनी
कसं पिकतं रे मोती

तर पाऊस या कवितेत ते म्हणतात की,

पावसात भिजल्यावर
मजाच असते न्यारी
सर्वत्र हिरवेगार होई
मनमोहक पालवी भारी

एकीकडे कवीचे मन निसर्गसानिध्यात रममाण होते तर दुसरीकडे निसर्ग या अभंगात म्हणतात,

कराल हातच
निसर्गावरच
तुज कोपलेच
श्वास घेण्या

अशी आताची वास्तव परिस्थिती त्यांनी आपल्या कवितांतून मांडली आहे.

कवी गजानन पाटील हे शिक्षक असल्याने शिक्षकमन विद्यार्थी, त्यांचे भवितव्य, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्यांनी अनेक कवितेतून त्यांनी मांडले आहेत. ते आपल्या ओझे या कवितेत म्हणतात की,

पाठीवर हवे
दप्तराचे ओझे
काय माझा गुन्हा
डोक्यावर विटांचे ओझे

अशी विद्यार्थी मनाची अवस्था त्यांनी अतिशय मार्मिकपणे मांडली आहे.

कोरोना या विषाणूने सारं मानवी जीवनच हादरवून सोडलं होतं.तर या कोरोना काळात माणसाला भोगाव्या लागलेल्या यातना, त्यावेळची परिस्थिती, त्यामुळे मानवी जीवनावर झालेला परिणाम त्यांच्या अनेक कवितेतून त्यांनी समर्पकपणे मांडले आहेत ते आपल्या "सर्व काही भुकेसाठी" या कवितेत म्हणतात की,

ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ
कायमच आमच्या साथीला
नवीन रोग आलाय म्हणे
कोरोना आमच्या नशिबाला

कवी गजानन पाटील यांनी विनोदी कविता, समाजप्रबोधनात्मक कविता, अंधश्रद्धा, खेळ, व्यायाम, पुस्तटावरही अनेक कविता लिहिल्या आहेत.गवळण,अभंग हे काव्यप्रकार ही अतिशय सोप्या पध्दतीने हाताळले आहेत. ते आपल्या "कान्हा"या गवळणीत म्हणतात की,

वसुदेव घेई हो टोपलीत
कान्हाचा जन्म हो बंदीवासात

पंढरीची वारी या अभंगात म्हणतात की,

वारी वारी पंढरीची
रखुमाई विठ्ठलाची
पायीच चालणाऱ्यांची
भेटी आस विठ्ठलाची

अशा नानाविध विषयांनी, आशयांनी सजलेला गजनीती हा कवितासंग्रह अतिशय वाचनीय आहे. प्रत्येक कविता वाचत असताना जीवनातील विविध पैलूंचे दर्शन त्यांच्या कवितेतून होते. हा पहिलाच कवितासंग्रह वैविध्याने नटलेला आहे. कवी शिक्षक मनाला स्पर्श करणारा आहे. या कवितासंग्रहातील कविता निसर्ग, मानवी मूल्ये, मानवी जीवन, ग्रामीण संस्कृती, अध्यात्म, ह्रदयाशी जोडलेली अनेक नातीगोती यांच्याशी निगडित असल्यामुळे खऱ्या अर्थाने रसिक वाचक मनाला आपल्याशा नक्कीच वाटतील. कवी गजानन पाटील यांची प्रगल्भता, प्रतिभा या कवितासंग्रहातून पहायला मिळते.

रसिक वाचक कवी गजानन पाटील यांच्या"गजनीती"या कवितासंग्रहाचे नक्कीच स्वागत करतील. असा मला विश्वास आहे. या कवितासंग्रहात एकूण ८६ कविता आहेत. त्यांना माझ्याकडून खूप खूप हार्दीक हार्दीक शुभेच्छा आहेत. आणि पुढील काव्य वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

गजनीती(काव्यसंग्रह)
कवी, लेखक, टी.व्ही-चित्रपट कलाकार मा.गजानन पाटील.
तेजश्री प्रकाशन, मूल्य रू.२५१/-

*परीक्षण मा.जस्मिन शेख* *कवितासंग्रह गजनीती* *कवी गजानन पाटील अलकूड एम ता. कवठेमहांकाळ**जस्मीनच्या लेखणीतून**काव्यसंग्रह...
05/05/2026

*परीक्षण मा.जस्मिन शेख*
*कवितासंग्रह गजनीती*
*कवी गजानन पाटील अलकूड एम ता. कवठेमहांकाळ*

*जस्मीनच्या लेखणीतून*
*काव्यसंग्रहः गजनीती*
*कवी - मा.गजानन हणमंत पाटील,शिक्षक, लेखक, अभिनेता.*
*मुद्रक - भारती मुद्रणालय, कोल्हापूर.*
*पृष्ठ संख्या- ११२*
*मूल्य - २५१/-*

शिक्षक, साहित्यिक ,अभिनेता असे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असणारे आमचे साहित्यिक बंधू गजानन हणमंत पाटील यांचा गजनीती हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. याला प्रख्यात कवी,गीतकार अभिनेता राहुल पाटील यांची प्रस्तावना लाभलेली आहे. कवी गजानन हे अनेक कला गुण संपन्न असणारे आणि तरीही अहंकाराचा लवलेश नसणारे, अतिशय नम्र असे व्यक्तिमत्व आहे. काव्यसंग्रह हाती आल्याबरोबर पूर्ण वाचून काढला. त्यातील प्रत्येक कविता ही मनाला स्पर्शून जाणारी आणि मेंदूला विचार करण्यास भाग पाडणारी अशीच आहे. काव्यसंग्रहाच्या नावामध्येच गजानन सर आणि नीता वहिनी या जोडप्याच्या नावाची सुंदर युती साधलेली आहे. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सूचक आहे. पर्वताला बघितल्याबरोबर गिरनारी पर्वताची आठवण होते.समोर दिसणारी झोपडी , शेतकरी आणि बैल हे कवी गजानन सरांच्या जीवनाशी जवळीकता साधणारं चित्र आहे. त्यातून त्यांचे वडील दृश्य स्वरूपात आपल्यासमोर येतात. तसेच शेतकऱ्यांची संपत्ती म्हणजे बैल आणि सर्व बाजूंनी निसर्ग या सर्वांची योग्य पद्धतीने मांडणी असलेले मुखपृष्ठ किशोर माणकापुरे यांनी अतिशय मार्मिक पद्धतीने चितारले आहे . काव्यसंग्रहातील बऱ्याच कविता निसर्ग , शेतकरी याच्यावर आधारित आहेत त्यामुळे मुखपृष्ठ काव्यसंग्रहाला साजेशेच आहे.
सुरुवातीला कवीने दिलेली अर्पण पत्रिका मनाला भावून जाते. कवीच्या जीवनातील त्यांच्या वडिलांचे स्थान यातून आपल्याला लक्षात येते . त्यांच्या कविता बद्दल लिहायचे म्हटले तर 'पर काया प्रवेश' ही वृत्ती कवी मध्ये असली पाहिजे कवी गजानन यांची वृत्ती तशी आहे. याची जाणीव अनेक कवितांमधून होते. उदाहरणार्थ 'झोपाळा' ही कविता स्त्रियांच्या मनातून आलेली आणि पुरुषाच्या लेखणीतून अवतरलेली अशी ही कविता आहे. या संग्रहात कवीच्या मनावर आणि आयुष्यावर एक अमिट अशी छाप सोडणाऱ्या अनेक आदर्श अशा व्यक्तींचे रेखाटन आहे. त्यामध्ये *'सुनेत्रा वहिनी', 'आदर्श शिक्षक', 'महात्मा ज्योतिराव फुले', 'अनाथांचे देवदूत', 'शिवाजी महाराज', 'कुसुमाग्रज'* अशा अनेक कविता आपल्याला वाचायला मिळतील. काव्यसंग्रहाची सुरुवातच *'प्रार्थना'* या गीताने होते.
*गुरुस्तवन*
*गुरुवर्य दिगंबरा स्वीकारा नमस्कार*
*गणराया घडू दे सर्व मंगलमय जीवन*
अशा मनोभावी प्रार्थनेमुळे काव्यसंग्रहाची अतिशय सुंदर सुरुवात झाली आहे. आपल्या जीवनसाथीचे महत्त्व विशद करताना *साथ गजनीतीची* या कवितेत कवी म्हणतात,
*हात तुझा, माझ्या हातात*
*पावसाची काय बिशाद होती*
*मरणाला नमवण्याची ताकद*
*साथ गजनीतीत होती*
अशा शब्दात ते आपल्या सहचारीणीचे जीवनातील स्थान विशद करतात.
*पुस्तक सुद्धा गुरु* या कवितेमध्ये
*पुस्तके ज्ञान देतात*
*मान देतात*
*मनावर विचाराचे*
*संस्कार देतात*
या ओळीतून पुस्तकांचे महात्म्य त्यांनी सांगितले आहे.
*सिंह जन्मला शिवनेरी*
*शिव इतिहास घडला सह्याद्री||*
या ओळीतून शिव इतिहासाचे गोडवे त्यांनी *शिवाजी महाराज* या गीतातून गायले आहेत .
जीवनाचे खरे सत्य त्यांच्या *प्रेतयात्रा* या कवितेतून आपल्याला दिसून येते.
*जिवंतपणी साथ*
*कुणी नाही दिली*
*मेल्यावर मात्र*
*सर्वजण धावली*
हे जीवनाचे कटू सत्य अगदी धाडसाने त्यांनी आपल्या कवितेत मांडले आहे. काव्यसंग्रहाचा शेवट *त्रास देऊ नका* या कवितेतून झाला आहे. या कवितेतून कवीचं हळवं मन आपल्याला दिसून येतं. या काव्यसंग्रहाची अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यातले महत्त्वाचे म्हणजे कवी गजानन पाटील यांचे मनोगत.'कवी इतरांच्या दुःखात दुःखी होतो आणि सुखात सुखी होतो'. असे विश्वव्यापी मत त्यांनी मनोगतात मांडले आहे. तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या अनेक लोकांचा उल्लेख त्यांच्या मनोगतात आहे. यातून कवीची नम्र आणि अतिशय लीन वृत्ती दिसून येते. काव्यसंग्रहातील अक्षर लेखनाचा रंग हा डोळ्यांना सुखावणारा आहे.काव्यसंग्रहात नेहमीच्या काव्यप्रकाराबरोबरच काव्यांजली, द्रोण काव्यरचना, अभंग, गवळण, गज़ल अशा अनेक प्रकारातील रचना वाचायला मिळतात. एकूण ८३ कविताचा हा काव्यसंग्रह प्रत्येकाने वाचावा असाच आहे. माणसाने निर्मित केलेली प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण नसते हे निर्विवाद सत्य आहे. त्यानुसार या काव्यसंग्रहात देखील काही त्रुटी राहिल्या आहेत, असतील. त्या पुढील संग्रहात दूर करण्यात येतील अशी आशा बाळगते आणि कवी गजानन हणमंत पाटील यांच्या या काव्यसंग्रहाला तसेच त्यांच्या येणाऱ्या पुढील काव्यसंग्रहासाठी भरभरून शुभेच्छा देते. तुमच्या या काव्यसंग्रहास अनेक पुरस्कार मिळावेत अशी प्रार्थना ही करते.
*सौ. जस्मिन रमजान शेख, मिरज.*
*सांगली जिल्हाध्यक्षा काव्यप्रेमी शिक्षक मंच जि. सांगली.*

Address

अलकूड एम ता. कवठेमहांकाळ जि. सांगली. सध्या हरिपूर
Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Actor Gajanan Patil sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category