Kalavishwa Mahavidyalaya, Sangli

Kalavishwa Mahavidyalaya, Sangli It's official page of Kalavishwa Mahavidyalya, Sangli. Read about us on http://www.kalavishwasangli. Read more about us on http://www.kalavishwasangli.com/

चित्रकलेचे दर्जेदार व उच्च शिक्षण देणारी एक नामवंत शिक्षण संस्था म्हणुन कलाविश्व महाविद्यालयाने महाराष्ट्राच्या कला क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे.

कला क्षेत्रात सतत बदलणारे प्रवाह, विचारधारा, माध्यमे, वातावरण या सर्व गोष्टी महाविद्यालयाने अनुभवल्या व स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

मागील ४५ वर्षापासुन अनेक नामवंत चित्रकार, शिल्पकार, प्राध्यापक व कलाशिक्षकांनी या महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे.

07/05/2026
07/05/2026

कलाविश्व महाविद्यालय,शांतिनिकेतन,सांगली.
शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रवेश सुरू

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन | विद्यार्थी विभाग |     सोमवार,दिनांक १६ ते रविवार,दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ | कला प्रात्...
21/02/2026

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन | विद्यार्थी विभाग |
सोमवार,दिनांक १६ ते रविवार,दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ | कला प्रात्यक्षिके |
(चित्रकार/शिल्पकार)
स्थळ : कला विश्व महाविद्यालय,
शांतिनिकेतन, सांगली.......................................
▪️ मंगळवार,दिनांक :१७/२/२०२६
१) *अतिफ पाच्छापूरे*, बेळगाव
(स्थिरचित्र)(तैलरंग)
२) *तुषार सावंत* मुंबई
(सिरॅमिक पॉटरी)
३) *अभिजित साळुंखे* तासगाव
(धातुकाम) .......................................
▪️ बुधवार, दिनांक : १८/२/२०२६
४) *रोहन कुंभार*, कोल्हापूर
(व्यक्तीचित्र)( तैलरंग)
५) *अवधूत करजगी* सोलापूर
(निसर्गचित्र) (जलरंग)
६) *अभिजीत पाटील*, सांगली
(व्यक्तिचित्र) (तैलरंग).....................................
▪️ गुरुवार, दिनांक : १९/२/२०२६
७) *महेश हिरूगडे*, सांगली
(व्यक्तीशिल्प)
८) *सत्यजित वरेकर*, सांगली
(व्यक्तिचित्र)(तैलरंग)

▪️टीप : ऐनवेळी वरील नियोजनात बदल होऊ शकतो.

▪️▪️▪️▪️▪️

६५ वे राज्य कला प्रदर्शन | विद्यार्थी विभाग | १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ | कलाविश्व महाविद्यालय शांतिनिकेतन, सांगली |
21/02/2026

६५ वे राज्य कला प्रदर्शन | विद्यार्थी विभाग | १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ | कलाविश्व महाविद्यालय शांतिनिकेतन, सांगली |

६५ वे राज्य कला प्रदर्शन | विद्यार्थी विभाग | १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ | कलाविश्व महाविद्यालय शांतिनिकेतन, सांगली | पहिल...
20/02/2026

६५ वे राज्य कला प्रदर्शन | विद्यार्थी विभाग | १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ | कलाविश्व महाविद्यालय शांतिनिकेतन, सांगली | पहिला दिवस | १६/०२/२०२६ |

📌गुरूवार, दिनांक : १२/०२/२०२६| नि | मं | त्र | ण |नमस्कार.....विद्यार्थी विभागाचे ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन सो...
12/02/2026

📌
गुरूवार, दिनांक : १२/०२/२०२६
| नि | मं | त्र | ण |
नमस्कार.....
विद्यार्थी विभागाचे ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन सोमवार, दिनांक १६ ते रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन, सांगली येथे होत आहे. या प्रदर्शनाचा उद् घाटन समारंभ सोमवार, दिनांक १६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता लोकरंगभूमी, शांतिनिकेतन, सांगली येथे होणार आहे. प्रदर्शनाचे उद् घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उद् घाटन समारंभास आपण आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.
राज्यात कला संचालनालयाच्या आस्थापनेखाली शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित कला महाविद्यालये कार्यरत आहेत. या कला संस्थांमध्ये दृश्य कलेतील विविध पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवले जातात. या सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने विविध जिल्ह्यात या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे प्रदर्शन सांगलीत होत आहे. प्रदर्शनात आठ विभाग आहेत. यामध्ये मूलभूत अभ्यासक्रम, रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला, मुद्राचित्रण, कलाशिक्षक प्रशिक्षण, कला व हस्तव्यवसाय (धातूकाम, अंतर्गत गृह सजावट, वस्त्रकाम, मातकाम), आणि दिव्यांग विभाग यांचा समावेश आहे. यावर्षी राज्यातील विविध कला संस्थांमधून ३४९० विद्यार्थ्यांच्या सुमारे ५६८० कलाकृती प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त कलाकृतींपैकी १२७५ कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या आहेत. या प्रदर्शनाच्या उद् घाटन समारंभात ज्येष्ठ चित्रकार आणि कलाविश्व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जी.एस. माजगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
सुमारे २० वर्षानंतर हे प्रदर्शन सांगलीत होत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन पाहण्यासाठी आणि उद् घाटन समारंभासाठी आपण आवर्जून यावे, याकरिता हे आग्रहाचे निमंत्रण!

*प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.*

आपला
प्राचार्य बाळासाहेब पाटील
कलाविश्व महाविद्यालय,
शांतिनिकेतन, सांगली
*सहाय्यक प्रदर्शन अधिकारी,*
६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन
(विद्यार्थी विभाग)

▪️▪️▪️

Address

Shantiniketan Lokvidyapith
Sangli
416416

Opening Hours

Monday 9:30am - 4pm
Tuesday 9:30am - 4pm
Wednesday 9:30am - 4pm
Thursday 9:30am - 4pm
Friday 9:30am - 4pm

Telephone

+912332312666

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalavishwa Mahavidyalaya, Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Kalavishwa Mahavidyalaya, Sangli:

Share

Category