MarathiRang

MarathiRang MarathiRang

"वादळांना घाबरून थांबू नकोस; कारण गरुड नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेच उंच भरारी घेतो"
16/02/2026

"वादळांना घाबरून थांबू नकोस; कारण गरुड नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेच उंच भरारी घेतो"

रात्री साडेसातची वेळ. चिपळूण रत्नागिरी हायवे. विशीतली दोघं भावंडं गावाकडं, घराकडं निघालीयत. एका भरधाव एस.टी.बसनं दोघांना...
21/02/2019

रात्री साडेसातची वेळ. चिपळूण रत्नागिरी हायवे. विशीतली दोघं भावंडं गावाकडं, घराकडं निघालीयत. एका भरधाव एस.टी.बसनं दोघांनाही उडवलं आणि ती बेदरकारपणे निघून गेली. बहीण थोड्या वेळानं शुद्धीवर आली. भाऊ रक्तानं माखलेला होता. ती हायवेवरून जाणार्‍या येणार्‍या गाड्यांना मदतीसाठी विनंती करीत होती. जिवाच्या आकांतानं ती मदतीसाठी रडत-ओरडत होती. तासाभरात किमान पन्नास गाड्या तिथून आल्या - गेल्या. पण कोणीही थांबलं नाही. तासाभरानं भावानं प्राण सोडला.

त्यानंतर एकानं गाडी थांबवली. त्या दोघा बहीणभावंडांना आरवलीत आणून सोडलं. एकुलता एक मुलगा गेल्याचं बघून आई वडीलांनी, आजी आजोबांनी हंबरडा फोडला. आजोबांचा नातवावर फार जीव होता. आजोबा हाय खाऊन आजारी पडले आणि त्यातच ते गेले.

वडील हायवेवर चहाची एक टपरी चालवत होते. रस्ता चौपदरी होणार होता. शेजारच्या दोघा टपरीधारकांनी आपल्या टपर्‍यांचं मुल्यांकन करून घेतलं. प्रत्येकाला सतरा लाख रुपये भरपाई मिळाली. वडीलांना निरक्षरतेमुळं यातलं काहीच माहित नव्हतं. जेव्हा कळलं तोवर उशीर झालाय असं अधिकारी म्हणाले. गेली १८ वर्षे त्यांची चहाची टपरी आहे. ग्रामपंचायतीच्या तश्या नोंदीही आहेत. पण शून्य रुपये शून्य पैसे भरपाई मिळणार असं सांगितलं गेलं. हाताशी आलेला मुलगा नुकताच अपघातात गेलेला. घरात आई,पत्नी आणि मुलीसह खाणारी चार माणसं. त्यांनी धसका घेतला. ते हार्टॲटॅक येऊन गेले. निरक्षर कुणब्यांची परवड काही थांबत नाही.

आजीची मुलावर आणि नातवावर आभाळमाया. ती उदास झाली. खचली. पंधरा दिवसात आजीही गेली.
दरम्यान मावशी आणि काकाही वारल्याचं कळलं.

मायलेकी तशाही आघातांमध्ये पाय रोऊन उभ्या होत्या. झुंजत होत्या. पण आई गेलेल्यांसाठी झुरतही होती. वर्षभरात तीही गेली.
किर्तीनं एका वर्षात जवळचे, मायेचे, आतड्याचे एकुण सातजण गमावलेले होते.
नियती इतकी क्रूर कशी काय असते?

किर्ती सध्या चिपळूणला एम.ए.च्या प्रथम वर्षात शिकतेय.

चहाची टपरी चालवतेय. पोरगी खरंच जिगरबाज आहे.

:- प्रा. हरी नरके,

शिवाजी महाराजांचं चित्र...
19/02/2019

शिवाजी महाराजांचं चित्र...

Learn how to draw Shivaji Maharaj sketch drawing step by step. Best and easy Shivaji Maharaj drawing for kids and adults. On this Shivjayanti, learn a beauti...

12/01/2019

खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य असे, की प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात..!

ही आहे मराठी भाषेची श्रीमंती..!
💧💧☔
'पाणी' शब्द हा असे प्रवाही, वळवू तिकडे वळतो हा.. जशी भावना मनात असते, रूप बदलते कसे पहा ..!

रंग पाण्याचे 🌈

नयनामध्ये येता 'पाणी' 😥
अश्रू तयाला म्हणती,
कधी सुखाचे, कधी दुःखाचे,
अशी तयांची महती..!

चटकदार तो पदार्थ दिसता,
तोंडाला या 'पाणी' सुटते,
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते..! 😰

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,
म्हणती अविरत भरते 'पाणी'..
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी जाते 'पाणी' ..!

"वळणाचे 'पाणी' वळणावरती"
म्हण मराठी एक असे,
"बारा गांवचे 'पाणी' प्यालाय"
चतुराई यातुनी दिसे..!

लाथ मारूनी 'पाणी' काढणे,
लक्षण हे तर कर्तृत्वाचे,
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे..!

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,
'पाण्या'त पाहणे गुण खोटा..
'पाणी'दार ते नेत्र सांगती,
विद्वत्तेचा गुण मोठा..!

शिवरायांनी कितीक वेळा,
शत्रूला त्या 'पाणी' पाजले..
नामोहरम करून, अपुले
मराठमोळे 'पाणी'दाविले..!

टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी' पानावरती,
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,
अळवावरचे अलगद 'पाणी'..!

कळी कोवळी कुणी कुस्करी,
काळजाचे त्या 'पाणी' होते..
ओंजळीतूनी 'पाणी' सुटता,
कन्यादानाचे पुण्य लाभते..!

मायबाप हे आम्हां घडविती,
रक्ताचे ते 'पाणी' करूनी..
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडता 'पाणी'
तुडुंब, दुथडी नद्या वाहती,
दुष्काळाचे सावट पडतां
सारे 'पाणी पाणी' करती..!

अंतीम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची..
पितरांना मग 'पाणी' देऊनी,
स्मृती जागते आप्तांची..!

मनामनांतील भावनांचे,
'पाण्या' मध्ये मिसळा रंग..
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,
चेहऱ्यावरती उठे तरंग..!!
👌🙏🙏

- credit unknown

दत्तजयंतीच्या शुभेच्छा 🙏
03/12/2017

दत्तजयंतीच्या शुभेच्छा 🙏

52 श्लोकी गुरुचरित्र..!
30/11/2017

52 श्लोकी गुरुचरित्र..!

52 श्लोकी गुरुचरित्र..!
श्री गुरुदेव दत्त...!!!
Like : Shri Dattaguru (श्री दत्तगुरू)

15/10/2017
आज पुण्याच्या पंक्चर स्कॅम ची बातमी बघण्यात आली. न झालेल्या पंक्चरच्या भीती चा बागुलबुवा मानगुटीवर बसवून साडे तीन - चार ...
13/10/2017

आज पुण्याच्या पंक्चर स्कॅम ची बातमी बघण्यात आली. न झालेल्या पंक्चरच्या भीती चा बागुलबुवा मानगुटीवर बसवून साडे तीन - चार हजार रुपये उकळणारी टोळी कार्यरत आहे म्हणे तिथं. अर्थात प्रामाणिकपणे सेवा देणारे अनेक जण आहेत. काही दोन-पाच दुष्प्रवृत्तीनमुळं सगळेच बदनाम होतात.
आणि हा माझ्या कोल्हापुरातील राजू पंक्चरवाला. माझ्याच गाडीचं नवीन टायर तीन साडेतीन इंच फाटलं. ज्यांच्याकडे घेतलं, त्यांनी सांगितलं... नवीन घ्या. ह्याला काहीही करता येत नाही.
मी अमोल ला फोन केला.
तो म्हणाला, "पाच मिनिट थांब".
त्याचा परत फोन आला, "टायर घिऊन ये माझ्याकडं. मी राजू ला फोन केलाय. त्यो ईल पाच मिनिटात".
मी तिथं गेलो तेव्हा राजू येऊन थांबला होता.
टायर बघून त्यानं सांगितलं, देतो की करून. संध्याकाळी ६ पर्यंत या.
संध्याकाळी राजू च्या पडळकर मार्केट च्या दुकानात गेलो. माझी नवी कोरी टायर तयार होती.
घराच्या दारातच दुकान. राजुच्या आईने झक्कास चहा करून दिला. गप्पा-टप्पा झाल्या.
राजुने थोडेच पैसे घेतले; माझे खूप पैसे वाचवले.
राजू फोन केला की कोल्हापुरात जिथे असाल तिथे येऊन पंक्चर काढून देतो. दिवसा, रात्री... कधीही. आणि हो; मोजकेच पैसे घेतो.
आपल्या झालेल्या सोयीची जाण न ठेवण्याइतके आपण अजाण नाही. परंतु आपण देऊ केलेले जास्तीचे पैसे तो नम्रपणे नाकारतो.
राजू मुजावर : ९८९०८६२०२९.

Source: Mandar Vaidya

चला तर मग.. आजपासूनच सुरुवात करू..!!
17/09/2017

चला तर मग.. आजपासूनच सुरुवात करू..!!

आपल्या लाडक्या नटखट गणेशाचे अनेक वेगवेगळे भावपूर्ण आणि सुंदर मनमोहक शिल्पं बनवली आहेत मूर्तिकार विशाल सुर्यकांत शिंदे (म...
24/08/2017

आपल्या लाडक्या नटखट गणेशाचे अनेक वेगवेगळे भावपूर्ण आणि सुंदर मनमोहक शिल्पं बनवली आहेत मूर्तिकार विशाल सुर्यकांत शिंदे (मुंबई) आणि छायाचित्रे काढली आहेत स्वप्निल चांदोरकर यांनी.
Like & Share तर झालंच पाहिजे.
MarathiRang

पुणेकरांची लाडकी सुमित्रा..!
23/08/2017

पुणेकरांची लाडकी सुमित्रा..!

22/08/2017

नवीन लग्न झालेलं जोडपं बागेत फिरायला गेलं होतं.
ते बागेत फिरत असताना एक कुत्रा त्यांच्याकडे जोरात पळत येत होता.
हा कुत्रा आता आपल्याला चावणार याची दोघांनाही खात्री पटली.
कुत्रा मला चावला तरी चालेल पण माझ्या प्रिय पत्नीला इजा नाही पोचली पाहिजे ,
असा विचार करुन त्याने आपल्या पत्नीला दोन्ही हातावर घेऊन वर उचलले.
कुत्रा त्यांच्याजवळ येऊन जोरजोराने भुंकू लागला.
नंतर काय झाले कुणास ठाऊक तो न चावताच खाली मान घालून निघून गेला.
त्याने तिला खाली उतरवले.
आपण तिला उचलून कुत्र्यापासून संरक्षण केले यामुळे ती आपल्यावर भलतीच खुश झाली असेल ,
असा विचार त्याच्या मनात सुरु होता तेवढ्यात...
ती ओरडून म्हणाली 'कुत्र्याला दगड ,लाकूड मारणारे खुप पाहिले ,
पण कुत्र्याला फेकून मारण्यासाठी चक्क बायकोलाच उचलणारा
तुमच्यासारखा नालायक व्यक्ती आज पहिल्यांदाच पाहिला'
😜😂😜😂👌👌
तात्पर्य :- बिचा-या नव-यांनी काहीही केले तरी बायका कधीच खुश होत नाहीत.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when MarathiRang posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share