14/08/2026
काही चुकवू नये असे - “हिट्स ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल”
आपल्या ६५व्या वर्धापन दिनानिमित्त अशोककुमार सराफ प्रस्तुत ऑर्केस्ट्रा 'मेलडी मेकर्स’, आज शुक्रवार दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे रात्रौ ८-30 वा. "हिट्स ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल” हा एक विशेष कार्यक्रम सादर करीत आहेत.
या भव्य कार्यक्रमातून ‘एल.पी.' यांनी संगीतबद्ध केलेल्या दोस्ती, बॉबी, कर्ज, सरगम, दो रास्ते, अमर अकबर अँथनी या सारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांतील सदाबहार गीतांचा समावेश असणार आहे. विजय केळकर, जितेंद्र भुरूक, हिंमतकुमार पंड्या, प्रविणकुमार अवचर, भक्ती कुलकर्णी, राधिका अत्रे व स्वरान्वये ७ कोरस ग्रुप, हे नावाजलेले गायक कलाकार त्यात सहभागी होणार आहेत. पराग चौधरी यांचे खुमासदार निवेदन कार्यक्रमात असणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वादक कलाकार चिंतन मोढा, अमन सय्यद, हार्दिक रावल, महेंद्र कुमार, आसिफ खान, मकरंद देशपांडे, सोमनाथ फाटके, मुकेश धोत्रे, दीपक काळे, श्याम चंदनशीव व प्रविण सराफ आपल्या ३० इन्टरनॅशनल कलाकारांच्या टीमसह संगीत साथ करणार असून संगीत संयोजन व संचलन प्रविण सराफ करणार आहेत. तिकीट दर रु.७००, रु.५००, रु.४००, रु.३००, रु.२५०, व रु.२०० असून Book My Show वर ऑन लाईन बुकिंग, P's Ticketghar (9673590220) येथे दूरध्वनीद्वारे व दिवसभर थिएटरवर उपलब्ध आहे.