02/01/2021
काल एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या प्रकारचे शिवप्रेमी ग्राहक पाहिले,पहिले ग्राहक हे पिपंरीचिंचवड वरुन मी केलेल आर्टिकल शोधत शोधत माझ्या पर्यंत आले,त्या आधी त्या आर्टिकलचा त्यांनी मार्केट मधे खुप शोध घेतला,पण माझे कोणतेच प्रॉडक्ट मार्केट मधे उपलब्ध नाहीत.त्यांची गाडी मोठी होती,त्यांना पीस आवडला होता.त्यांनी कोणती हि घिसघिस न करता आनंदाने दोन गाड्यांसाठी दोन पीस घेतले,आणि माझ्या कामाच कौतुक केल...सदर फोटो हा त्यांच्याच गाडीचा आहे.
तर दुसरे ग्राहक,पहिल्या गाडी पेक्षा हि मोठी करकरीत गाडी घेऊन सेम पीस साठी घरी आले,पीस आवडला पण त्यांना त्यांना त्याच्या त्या18 लाखापेक्षा जास्त किमती गाडी समोर 1600₹ च महाराजांच गिफ्ट खुपच महाग वाटल..त्यांची अपेक्षा 600₹ खुप झाले.स्वत:ला शिवप्रेमी म्हणवणाऱ्या त्या श्रीमंत?ग्राहकाची त्यांनी मला त्यांची लायकी दाखवुन दिली.एवढी महाग गाडी घेता आणि महाराजांच स्मृती चिन्ह घेताना काहि शे रुपडल्या कडे पहाता,अश्यांना मी माझे आर्टिकल विकतच नसतो.मी नुसता पैसे कमवण्यासाठी काम करत नाही,तर कामात आम्ही जीव ओततो,माझ्या आणि ग्राहकांच्या समाधाना साठी जे काम करतो त्याचा तो मोबदला असतो.मार्केट मधे चिक्कार महाराजांच्या मुर्त्या आहेत,नुसता जरीटोप आणि दाढी आहे म्हणुन ते महाराज होत नसतात.त्यात तो रुबाब असला पाहिजे.तस नसत तर मी देखिल कमी किमतीच चालु काम करु शकतो,पण माझ मन मानत नाही.जो पर्यंत खरे शिवप्रेमी आहेत तो पर्यंत तरी माझ्या कामात तडजोड नाही.आणि माझ काम अश्याच दर्दी ग्राहकांना समर्पित.काम प्रत्येक्ष पाहिल्या शिवाय मुल्यमापन करण बरोबर नाही.