06/11/2025
नमस्कार, मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
शिकणं कधी थांबत नाही. गेली 2.5 वर्षं मी कतार येथे नाट्यप्रशिक्षक म्हणुन काम करतो आहे. सुट्टीत जेव्हा जेव्हा पुण्यात येत होतो, तेव्हा आवर्जून नाटक पाहण्याची भूक भागवत होतो. तिकडे म्युझिकल्स आणि इंग्रजी नाटके करतो आहे. इकडे पुण्यात गेले काही महिने बरीच नाटके पाहण्यात आली. काही आवडली. नाटकातील पात्ररचना ते नटाने उभी केलेली पात्ररचना हा नाटकातील माझा सर्वात आवडता भाग. काही नाटके पाहून प्रश्न पडले. त्यात माझं असं एक निरिक्षण आहे की अभिनेता/ अभिनेत्री एकाच पठडीमधे अभिनय करतात. त्यात तोचतोचपणा का दिसून येतो? अर्थात याला अपवाद काही कलाकार आहेत.
पण नटांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की दिग्दर्शकाचं काम एका लेवलवर येऊन थांबतं. तरी नटाचं काम चालू राहिलं पाहिजे. कारण पात्राचा शोध हा एक प्रवास आहे आणि तो नटाने करणं आवश्यक आहे. वेगवेगळी नाटके पाहताना 'संवाद पोहचवणे' एवढंच नटाचं काम आहे की काय असं सतत वाटत होतं. पात्राची body language, gestures, movements यात विसंगती का दिसते?
मग मला हा प्रश्न पडला की नट कुठे कमी पडत आहेत का?? त्याचं उत्तर मिळालं ते त्यांच्या पात्ररचनेत. पात्राचं आकलन, त्याची रचना, आयडेंटिटी, लेखकाने मांडलेला विचार, विषय, पात्रांचा परस्परसंबंध, आशय, ते कसं पोचवायचं याचा अभ्यास कुठेतरी कमी पडतो आहे.🙄
तुम्हालादेखील असे अनुभव पाहण्यात आले असतील तर comments मधे सांगा.
आज पुस्तकांसोबतच इंटरनेट चे माध्यम उपलब्ध आहे. कलाकारांना स्टॅनिस्लावस्की, माईस्नर, एडलर, स्ट्रॅसबर्ग यांच्या थियरीज माहीत असतात. परंतु त्या स्टेजवर अप्लाय कशा करायच्या? प्रॅक्टिकली वापरायच्या कशा? हे जाणून घ्यायला नट कमी पडतात का? कि ते जाणून घेण्यासाठी लागणारे पेशन्स कमी पडतात? कि reels च्या जमान्यात अभिनयाचा क्राफ्ट शिकण्याची गरज वाटत नाही? आपल्याला कोणती मात्रा लागू पडते, काय केले की माझे पात्र Truthful, Believable and Convincing वाटेल?? हे तपासून पाहणं गरजेचं वाटत नाही का? की ते सांगणारं कोणीच नसतं? 🤔
म्हणूनच या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मी पात्ररचनेवर एक शिस्तबद्ध प्रयोगशाळा घ्यायचं ठरवलं आहे. कतारमधे नाटक करत असताना इंटरनॅशनल स्पेक्ट्रम मधे काम करताना बरेच अनुभव जमा झाले. अभिनय, लेखन व दिग्दर्शनातून गेली 14 वर्षं नाटक करता करता आणि नाटक शिकवता शिकवता काही महत्वपूर्ण गोष्टी समजत गेल्या. माझी आवडती गोष्ट म्हणजेच "पात्ररचनेवर" गेली काही वर्षं काम केल्यानंतर जे काही हाती लागलं आहे, ते गाठोडं मी प्रामाणिकपणे इतर नाटकवाल्यांसोबत शेअर करणार आहे. 🤝
आज या मुहूर्तावर मी माझ्या नाटक करणार्या मित्र मैत्रिणींना जाहीर आवाहन करतो आहे. ज्यांना ते जाणून घ्यायची, थोडक्यात experiment करुन पहायची तयारी असेल त्यांनी पटापट डीएम करा. कार्यशाळेत थियरी नाही तर काही ठराविक गोष्टी आपण करुन पाहणार आहोत. त्यालाच तर प्रयोग म्हणतात नाही का!! कमीतकमी तुम्ही करत असलेल्या पात्ररचनेत ऑथेंटीसिटी येईल याची खात्री. तुम्ही तुमचं पात्र घेऊन येऊ शकता. सिरियसनेस रहावा म्हणून याची नाॅमिनल आणि परवडेल अशी फी असेल. 😊 कार्यशाळा फोकस्ड रहावी म्हणून यात फक्त 10 जणांनाच प्रवेश असेल. ही फक्त #शनिवार आणि #रविवारीच असेल. ोव्हेंबर पासून सुरु. बाकी सगळं मेसेज/काॅलवर बोलूच. First come first entry बरं का! Doesn't matter which group are you a part of! भेटूयात!! 🎭🎭🎭
-ज़ुबेन अलिफ
5.11.2025
Pic credit: Google