Shodh Times

Shodh Times Digitel media news and Coompny

29/12/2025

SHODH TIMES DIGHTAL MIDIA NEWS NETWORK

पुणे भाजपमध्ये उमेदवारीवरून गोंधळ‘पार्टी विथ डिफरन्स’चा दावा फोल? निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या नातेवाईका...
28/12/2025

पुणे भाजपमध्ये उमेदवारीवरून गोंधळ
‘पार्टी विथ डिफरन्स’चा दावा फोल? निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या नातेवाईकांना संधी

पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली. अर्ज प्रक्रिया, मुलाखती आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेले फोटो यांमुळे भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचे चित्र उभे करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी प्रक्रियेतील गोंधळ आणि अंतर्गत राजकारणामुळे भाजप शहर नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे शहर भाजपकडून अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अद्याप दोन दिवस शिल्लक असतानाही अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. यामागे बंडखोरीची भीती हे प्रमुख कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षातील नेत्यांची मुले व नातेवाईक यांना संधी दिली जात असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, यातील अनेक संभाव्य उमेदवारांनी ना अर्ज भरले होते, ना मुलाखतींना उपस्थिती लावली होती. त्यामुळे संपूर्ण अर्ज व मुलाखत प्रक्रिया ही केवळ औपचारिक फार्स ठरल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. स्वतःला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपची ही कार्यपद्धती काँग्रेसपेक्षाही खालच्या पातळीची असल्याची टीकाही उघडपणे केली जात आहे.

प्रभाग क्रमांक २१ मध्ये तिकीट वाटपाचा ट्विस्ट
प्रभाग क्रमांक २१ – मुकुंदनगर, महर्षीनगर, सॅलिस्बरी पार्क या भागात भाजपच्या तिकीट वाटपात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. येथील निष्ठावंत आणि जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ऍडजस्टमेंटच्या राजकारणातून उमेदवार ठरवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

स्थानिक पातळीवर काम केलेल्या इच्छुक उमेदवारांना संधी न देता, पक्षातील विशेष लॉबीमार्फत काही नावं थेट जनतेवर लादली जात असल्याने नागरिकांमध्येही नाराजी वाढत आहे. या निर्णयांचा फटका भाजपला आगामी महापालिका निवडणुकीत बसू शकतो, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.

एकीकडे शिस्त, पारदर्शकता आणि कार्यकर्त्यांचा सन्मान यांचा दावा करणाऱ्या भाजपमध्येच जर अशी परिस्थिती असेल, तर ‘एक नंबरचा पक्ष’ ही प्रतिमा कितपत खरी आहे, असा प्रश्न पुण्यातील राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

शोध टाइम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
🌐 “प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
📌 आमच्याकडे वाचा व पाहा
✔️ ताज्या घडामोडी
✔️ सामाजिक प्रश्न
✔️ भ्रष्टाचाराविरोधातील बातम्या
✔️ नागरिकांच्या समस्या
✔️ स्थानिक बातम्या
✔️ राजकीय • गुन्हेगारी • मनोरंजन • क्रीडा
📲 सर्व अपडेट्ससाठी Follow करा
👉 YouTube | Facebook | Instagram
👍 LIKE • 🔄 SHARE • 🔔 SUBSCRIBE
📧 Email: [email protected]
📞 Contact: 9511654815

**भाजपात ‘आयते घोड्यावर, इच्छूक वाऱ्यावर’!मुलाखती नव्हे तर कार्यकर्त्यांची थट्टा केल्याचा संताप**पुणे | प्रतिनिधीपुणे मह...
28/12/2025

**भाजपात ‘आयते घोड्यावर, इच्छूक वाऱ्यावर’!
मुलाखती नव्हे तर कार्यकर्त्यांची थट्टा केल्याचा संताप**

पुणे | प्रतिनिधी

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रत्येक प्रभागातून इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवले. या प्रक्रियेची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करण्यात आली. इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षाने एक प्रकारचा उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. मोठ्या संख्येने इच्छूकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते.
“भाजप हा देशातील एक नंबरचा पक्ष आहे, त्यामुळे अर्जांची संख्या मोठी असणारच,” असे पुणे शहरातील पदाधिकारी वारंवार माध्यमांसमोर सांगत होते. सोशल मीडियावर मुलाखतींचे फोटो प्रसिद्ध करून शहरातही भाजपाच नंबर एक असल्याचा प्रचार सुरू करण्यात आला.
मात्र, प्रत्यक्षात बंडखोरीच्या भीतीने उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही पुणे शहर भाजपकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरीकडे काही संभाव्य उमेदवारांची नावे मात्र चर्चेत आली असून, त्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचे पुत्र व नातेवाईक असल्याची जोरदार चर्चा आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या कथित उमेदवारांपैकी अनेकांनी उमेदवारीसाठी अर्जच केला नव्हता, तसेच मुलाखतीसही ते उपस्थित नव्हते. तरीही त्यांना तिकीट देण्याची तयारी सुरू असल्यामुळे सर्वसामान्य, प्रामाणिक आणि रीतसर प्रक्रियेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
शहरातील पदाधिकाऱ्यांकडून “आयतरावांना घोड्यावर बसवून निष्ठावंत इच्छूकांना वाऱ्यावर सोडले जात आहे,” असा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. अर्ज मागवणे आणि मुलाखती घेणे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ एक फार्स ठरल्याची भावना इच्छूकांमध्ये तीव्र झाली आहे.
विशेषतः प्रभाग क्रमांक २१ – मुकुंदनगर, महर्षीनगर, सॅलिस्बरी पार्क या भागात तिकीट वाटपात असाच प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक, प्रामाणिक आणि पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ‘ऍडजस्टमेंट’द्वारे उमेदवार लादले जात असल्याची कुजबुज जोर धरू लागली आहे.

“भाजपाचे तिकीट मिळाले म्हणजे विजय हमखास” या समजुतीतून तडजोडीचे राजकारण सुरू असून, याचा फटका पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत आहे. परिणामी त्यांच्या समर्थकांमध्येही तीव्र नाराजी असून, याचा थेट परिणाम निवडणुकीत भाजपला भोगावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पक्षातील काही विशेष लॉबीमार्फत, मुलाखतीला न आलेल्या आणि अर्ज न केलेल्या उमेदवारांना थेट अधिकृत उमेदवारी दिली जात असल्याच्या चर्चांनी सध्या पुणे भाजपात खळबळ उडवून दिली आहे.

🔍 शोध टाइम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
🌐 “प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
✔️ ताज्या घडामोडी
✔️ सामाजिक प्रश्न
✔️ भ्रष्टाचाराविरोधातील बातम्या
✔️ नागरिकांच्या समस्या
✔️ स्थानिक बातम्या
✔️ राजकीय • गुन्हेगारी • मनोरंजन • क्रीडा
📌 Follow करा: YouTube | Facebook | Instagram
👍 LIKE • 🔄 SHARE • 🔔 SUBSCRIBE
📧 Email: [email protected]
📞 Contact: 9511654815

25/12/2025

*स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न*

पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमास नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगरचे अध्यक्ष विलास लेले, जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषदेचे सदस्य ॲड तुषार झेंडे, सदस्या ॲड अनिता गवळी आदी उपस्थित होते.

श्री. सुधळकर ग्राहकांचे फसवणुकीपासून सरंक्षण करण्यासोबत त्यांच्या हक्काबाबत जागरुक करणे तसेच त्यांची फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेबाबत माहिती देण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, याचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सुधळकर यांनी केले.

श्री. लेले म्हणाले, ग्राहकांचे हक्क व हित अबाधित ठेवण्यासोबतच त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यामार्फत ग्राहकांना मोफत सल्ला देण्यात येतो, असेही श्री. लेले म्हणाले.

ॲड झेंडे म्हणाले, या वर्षीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना ‘जलद, सुलभ डिजिटल न्यायाकडे वाटचाल’ अशी आहे. ‘ग्राहक सरंक्षण अधिनियम 2019’ हे नागरिकाभिमुख असून अधिनियमाचा व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याकरिता प्रशासनासोबतच नागरिकांनी पुढे आले पाहिजे. नागरिकांची फसवणूक झाल्यास 1915 या हेल्पलाइन क्रमांक किंवा 8800001995 या चॅटबॉट किंवा e-jagriti.gov.in संकेतस्थळद्वारे तक्रार दाखल करता येते, अधिकाधिक नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड झेंडे यांनी केले आहे.

यावेळी मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या विविध विभागाच्या स्टॉलला भेटी देवून सेवा व वस्तुंबाबत माहिती घेतली.
शोध टाइम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
🌐 “प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
✔️ ताज्या घडामोडी
✔️ सामाजिक प्रश्न
✔️ भ्रष्टाचार
✔️ नागरिकांच्या समस्या
✔️ स्थानिक बातम्या
✔️ राजकीय • गुन्हेगारी • मनोरंजन • क्रीडा
📌 YouTube | Facebook | Instagram
👉 LIKE • SHARE • SUBSCRIBE
📧 Email: [email protected]
📞 Contact: 9511654815

*सामाजिक काम गरजेतून आणि संवेदनशीलवृत्तीने करावे!**उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रतिपादन**अतिव...
19/11/2025

*सामाजिक काम गरजेतून आणि संवेदनशीलवृत्तीने करावे!*

*उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रतिपादन*

*अतिवृष्टी भागात मदत कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा सन्मान*

पुणे, दि. 19: सप्टेंबर २०२५ मध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना अतिवृष्टीचा प्रंचड फटका बसला. यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या संकटातून इथल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील शैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यभरातील अनेक संस्था, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मदत कार्य राबवले होते. सामाजिक कामे करतांना गरजेतून आणि संवेदनशीलवृत्तीने केले पाहिजे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालय आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या योगदानानिमित्त 'संकटातून संकल्पाकडे' या सन्मान सोहळा संपन्न झाला.

यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. जोत्स्ना एकबोटे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे केवळ पिकांचे नुकसान झाले नाही, तर जमीन खरवडून गेली. त्याशिवाय या भागातील विद्यार्थ्यांचे ही मोठे नुकसान झाले होते. या संकटातून आपतग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात होत्या. पण तरीही या संकटातून इथल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि राज्यातील इतर भागातील विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक संस्थांना या आपत्तीची दाहकता कळावी, यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. कारण कोणतेही सामाजिक कार्य हे गरजेतून आणि अतिशय संवेदनशील वृत्तीने केले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत २० महाविद्यालयांनी अतिशय मोलाची मदत केली. ती उल्लेखनीय व इतर महाविद्यालयाकरिता प्रेरणादायी आहे. अशाप्रकारचे राष्ट्रीय सेवा योजनेने सतत करीत राहावे, यामाध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आपण साध्य होण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे २०४७ मधे भारताचे ' विकसित भारत' बनण्याचे स्वप्न आपण साकार करण्याकरिता प्रयत्नशील राहूया, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

डॉ. एकबोटे म्हणाले, उच्च शिक्षणामध्ये गेल्या काही दिवसात नविन कल्पना राबविल्या आहेत. उच्च शिक्षणामधे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शिक्षक भरतीचे प्रयत्न व संशोधन निधी तरतूद झाल्यास निधीची त्रुटी भरून काढता येईल का याबाबत विचार करण्याची गरज आहे, असेही डॉ. म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तावित प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले.

शोध टाईम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
“प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
📌 अशाच सामाजिक, स्थानिक, शैक्षणिक व प्रेरणादायी बातम्यांसाठी Follow करा!
📧 [email protected]
📞 9561654815
🔹 YouTube | Facebook | Instagram | Twitter
👉 Like • Share • Subscribe करा!

सामाजिक युवा प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम: आरोग्य शिबिर, साहित्य वाटप आणि सत्कार समारंभ उत्साहात संपन्न ✨दिनांक : 14 नोव्हें...
19/11/2025

सामाजिक युवा प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम: आरोग्य शिबिर, साहित्य वाटप आणि सत्कार समारंभ उत्साहात संपन्न ✨

दिनांक : 14 नोव्हेंबर 2025 | ठिकाण : —

सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 14 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य आरोग्य शिबिर, शालेय साहित्य वाटप, भोजन समारंभ आणि उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

🎉 कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये
या वर्षीचा कार्यक्रम सर्वार्थाने भव्य आणि सामाजिक उपयुक्ततेने परिपूर्ण होता.
✔ आरोग्य शिबिर – विविध आजारांचे तपासणी शिबिर, डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि मार्गदर्शन
✔ शालेय साहित्य वाटप – सामाजिक संस्थेच्या वतीने शेकडो विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, बॅग इत्यादी साहित्य देण्यात आले
✔ भोजन समारंभ – उपस्थित नागरिक, विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली
✔ सत्कार सोहळा – सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

👥 मान्यवरांची उपस्थिती
या उपक्रमाला संस्थेचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते :
अध्यक्ष उमेश भाऊ शिंदे
विष्णू कसबेकर
संदीप भोंडे
संदीप गोटे
राहुल गायकवाड
रमेश तेलवडे
इकबाल खान
तसेच स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पालक आणि नागरिकांचा मोठा सहभाग

🙌 नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पालक, सामाजिक संस्था, महिला बचतगट आणि युवकांनी विशेष उपस्थिती दाखवली.
कार्यक्रमात प्रबोधनपर गाणी, सांस्कृतिक उपक्रम, प्रेरणादायी भाषणांनी वातावरण भारावले.

🌟 लहुजी वस्ताद साळवे जयंती निमित्त समाजहिताचा उपक्रम
लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक युवा प्रतिष्ठानने हा उपक्रम राबवला.
समाजकारणाची भावना जपत—
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत
सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा
सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
ही संस्थेची ध्येयधोरणे या कार्यक्रमातून अधिक बळकट झाली.
🗣 अध्यक्ष उमेश भाऊ शिंदे यांचे मत
“समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करणारे सामाजिक कार्य करणे हेच आमचे ध्येय आहे. पुढील काळातही अशा उपक्रमांचे प्रमाण वाढवले जाईल.”
🌼 कार्यक्रमाबाबत सर्वत्र कौतुक
स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, विद्यार्थी, पालक सर्वांनी सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

🔵 शोध टाईम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
“प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
📌 अशाच सामाजिक, स्थानिक, शैक्षणिक व प्रेरणादायी बातम्यांसाठी Follow करा!
📧 [email protected]
📞 9561654815
🔹 YouTube | Facebook | Instagram | Twitter
👉 Like • Share • Subscribe करा!

*राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जम्मू कश्मीरकडे रवाना*पुणे, दि. 18: जम्मू येथील वैष्णो धाम, का...
18/11/2025

*राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जम्मू कश्मीरकडे रवाना*

पुणे, दि. 18: जम्मू येथील वैष्णो धाम, कालिका धाम येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील मुला-मुलींचा संघ रवाना झाला. या संघाला क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यापूर्वी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्री विठ्ठलराय जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल, डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतून राष्ट्रीयस्तरासाठी पुढीलप्रमाणे खेळाडूंची निवड करण्यात आली.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी १९ वर्षाखालील मुलामध्ये तेजस हर्षद वासणीकर, मयूरेश विवेक सावंत, प्रणव जयदिप घोळकर, रामानुज अमित जाधव आणि वेदांत नागेश खळदे तर १९ वर्षाखालील मुलीमध्ये उर्दी सिद्धार्थ चुरी, अन्वी शैलेश गुप्ते, अनुष्का संदीप पाटील, निहाली निवास पाटील आणि जान्हवी पराग फणसे यांचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक अनिल शंकरराव बंदेल, असद अली अब्दुल लतीफ सय्यद तसेच व्यवस्थापक कविता धोंडीराम देसाई आहेत.

याप्रसंगी खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांना जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते गणवेश किटचे वाटप करण्यात आले. क्रीडा अधिकारी अश्विनी शिवानंद हत्तरगे आणि नानासाहेब तलवाडे उपस्थित होते.

शोध टाईम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
“प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
📌 अशाच ताज्या घडामोडी, गुन्हेगारी अपडेट्स, स्थानिक समस्या, राजकीय व सामाजिक बातम्यांसाठी आमचे पेज Follow करा!
📧 [email protected]
📞 9561654815
🔹 YouTube | Facebook | Instagram | Twitter
👉 Like • Share • Subscribe करा!

*मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा;* *केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता-वनमंत्री गणेश ...
17/11/2025

*मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा;*
*केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता-वनमंत्री गणेश नाईक*

पुणे, दि. 17: मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा निधी व त्याकरिता प्रस्तावाची मागणी तात्काळ सादर करावी, तसेच कृत्रीम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर व जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात, बिबट नसबंदीबाबत केंद्राची मान्यता प्राप्त झाली असून त्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.

वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या सभागृहात मानव-बिबट संघर्ष उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, मल्लिकार्जुन,मुख्य वनसंरक्षक, नाशिक, आशिष ठाकरे, वनसंरक्षक पुणे वनवृत्त महादेव मोहिते, उपवनसंरक्षक पुणे, प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक जुन्नर, श्रीधर्मबीर सालचिठठल, उपवनसंरक्षक अहिल्यानगर, विवेक होशिंग, उपवनसंरक्षक वन्यजीव जयरामगौडा, उपवनसंरक्षक शिक्षण कुलराज सिंह, उपवनसंरक्षक सोलापूर सिध्देश सावडेकर उपवनसंरक्षक नाशिक, पंकज गर्ग उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण यांच्यासह वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. नाईक यांनी नाशिक मधील वनकर्मचारी यांच्यावर झालेल्या बिबट हल्लाप्रकरणी संबंधित वनकर्मचारी यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. मानव-बिबट संघर्षाबाबत वनकर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत, त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य पुरविण्यात यावे. जिल्हा योजनेमधून आकस्मिक निधी त्वरीत उपलब्ध करुन देण्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत आहे. बांबू लागवड करुन बिबटला अटकाव करता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करावा , अशा सूचना श्री. नाईक यांनी दिल्या.

श्री. खांडेकर यांनी बैठकीत ऊस शेती, बिबट अधिवास व त्याकरीता प्रभावी उपाययोजनांबाबत माहिती दिली. यामध्ये साखर कारखान्यांनी करावयाची कार्यवाही, टायगर फाऊंडेशनवर आधारित नियोजन तसेच बिबट्यांची गणना करणे, बिबट्यांचे मायक्रोमॅपिंग, पोल्ट्री वेस्ट तसेच हॉटेल वेस्टची विल्हेवाट, रेस्क्यू सदस्यांचा विमा काढणे, बेस कॅम्पचे सक्षमीकरण करणे, कुरण विकास करून बिबट्यांकरीता अधिवास तयार करणे, मेंढपाळ, ऊस कामगार आदीकरिता विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

श्री. खाडे यांनी मानव-बिबट संघर्षाबाबत केलेल्या उपाययोजनाबाबतचे सादरीकरण केले. तर श्री. मोहिते यांनी टीटीसी बावधन मधील कामांबाबतची माहिती दिली. जून 2026 पर्यंत 80 पेक्षा अधिक बिबट्याकरिता उपचार उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.

श्री. ठाकरे यांनी पिंपरखेड मधील शोध अभियान चालू ठेवण्याबाबत सूचना दिल्या आणि यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केली. तसेच बिबट्यांच्या संख्या नियंत्रणासाठी इम्युनो-कॉन्ट्रासेप्टीव्ह पध्दतीची केंद्र शासनाची परवानगी प्राप्त झाली असल्याचे त्यांनी यावेळी म्हणाले.

शोध टाईम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
“प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
📌 अशाच ताज्या घडामोडी, गुन्हेगारी अपडेट्स, स्थानिक समस्या, राजकीय व सामाजिक बातम्यांसाठी आमचे पेज Follow करा!
📧 [email protected]
📞 9561654815
🔹 YouTube | Facebook | Instagram | Twitter
👉 Like • Share • Subscribe करा!

*वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार**नवले पुलाच्या अपघाताची का...
17/11/2025

*वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार*

*नवले पुलाच्या अपघाताची कारणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देश*

पुणे, दि. १७: पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात कमी व्हावेत यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. नवले पुलाच्या ठिकाणी झालेल्या गंभीर दुर्दैवी अपघाताची संबंधित यंत्रणांनी तात्काळ चौकशी करावी व या मार्गावर आवश्यक त्या लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

पुणे शहरातील वाहतूक सुधारणाबाबत विधानभवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, पुणे शहरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते. सेव्ह लाईफ फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष तिवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सेव्ह लाईफ फाउंडेशनने तीन-चार वर्षापूर्वी नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचविण्याबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता. त्याअनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, आता झालेला गंभीर अपघात पाहता पुन्हा या मार्गाचे पुन्हा सविस्तर अभ्यास सेव्ह लाईफ फाउंडेशनने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने करवा, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या. या अनुषंगाने आपला अहवाल दोन आठवड्यात सादर करू असे श्री. तिवारी यांनी सांगितले.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, शहरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला दंड केला जावा. तसेच तीनपेक्षा अधिक वेळा उल्लंघन झाल्यास संबंधिताचा वाहनचालन परवाना नियमानुसार निलंबित करणे व त्या उपरही उल्लंघन केले गेल्यास जप्त करण्याची कारवाई करावी.

रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी दरमहा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी व आधीच्या बैठकांमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांची कामे पूर्ण होतील याची खात्री करावी, असेही डॉ.पुलकुंडवार म्हणाले.

रस्त्याची मालकी असलेल्या यंत्रणेवर सदर रस्ता सुस्थितीत ठेवणे, आवश्यक त्या उपाययोजना करणे, वाहतूक सुरळीत होईल याची जबाबदारी राहील. रस्ता सुस्थितीत नसल्यास संबंधित यंत्रणेवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येईल. महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रम्बलर्स, वाहतूक चिन्हे, फलक, बॅरियर्स लावावेत. सेव्ह लाईफ फाउंडेशनने शहरात वाहतूक कोंडी, अपघात अधिक होणाऱ्या रस्ते, ठिकाणांविषयी अभ्यास करून रस्त्यांच्या डिझाईनमध्ये काही त्रुटी असल्यास उपाययोजना सुचवाव्यात. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी.

पुणे शहर वाहतूक शाखेने अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तोपर्यंत वाहतूक शाखेच्या मागणीनुसार संबंधित रस्त्याची मालकी असलेल्या यंत्रणेने वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक वार्डन देण्याची जबाबदारी राहील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

मनपा आयुक्त श्री. राम म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणात रस्तांची, पुलांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी पुणे महानगरपालिकेच्यावतीने ट्रॅफिक वार्डन देण्यात येत आहेत. वाहतूक नियमन कामात खासगी स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घ्यावा.

वारंवार अपघात होणाऱ्या ब्लॅकस्पॉटच्या अनुषंगाने कार्यवाही तात्काळ करणे आवश्यक असल्याचे डॉ. म्हसे म्हणाले. पुणे शहरासाठी वाहतुकीच्या अनुषंगाने एकात्मिक नियंत्रण केंद्र आवश्यक असून त्या अनुषंगाने हैदराबाद येथील नियंत्रण केंद्राचा अभ्यास आवश्यक असल्याचे श्री. डूडी म्हणाले. यावर कार्यवाहीचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. यावेळी श्री. तिवारी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीला पीएमआरडीएच्या सह आयुक्त पूनम मेहता, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (रस्ते) अनिरुद्ध पावसकर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव, आदींसह राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग, सेव्ह लाईफ फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शोध टाइम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
“प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
📌 अशाच ताज्या घडामोडी, स्थानिक समस्या, गुन्हेगारी अपडेट्स, राजकीय, सामाजिक व मनोरंजन विश्वातील बातम्यांसाठी आमचे पेज Follow करा!
📧 [email protected]
📞 9561654815
🔹 YouTube | Facebook | Instagram | Twitter
👉 Like • Share • Subscribe करा!

गुलटेकडी–इंदिरानगर नेहरू रोडवर पाण्याचा अपव्यय शिगेला! हजारो लिटर पाणी वाया—महापालिकेचे दुर्लक्ष?पुणे | गुलटेकडी–इंदिरान...
16/11/2025

गुलटेकडी–इंदिरानगर नेहरू रोडवर पाण्याचा अपव्यय शिगेला! हजारो लिटर पाणी वाया—महापालिकेचे दुर्लक्ष?
पुणे | गुलटेकडी–इंदिरानगर
गुलटेकडी इंदिरानगर, नेहरू रोड परिसरात पाण्याच्या वॉलमधील मोठ्या प्रमाणातील लिकेजमुळे दररोज हजारो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. पुण्यात पाणीटंचाई गंभीर स्वरूप धारण करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे म्हणजे शासन-प्रशासनाची थेट निष्काळजीपणा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
💧 दररोज हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर!
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार—
✔ वॉलमध्ये मोठे नुकसान आहे
✔ गेल्या अनेक दिवसांपासून पाणी सतत वाहते आहे
✔ पिण्यायोग्य पाणीच रस्त्यावर वाहून जाते
✔ पाणी साचल्यामुळे वाहतूक व स्वच्छतेची समस्या
यामुळे परिसरात चिखल, घाण, डास, दुर्गंधी अशा समस्या वाढल्या आहेत.
🛑 बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष?
गुलटेकडी–नेहरू रोड हा बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येतो.
परंतु, स्थानिक नागरिकांचा दावा आहे की—
“अनेक वेळा तक्रार करूनही वॉल दुरुस्ती केली जात नाही. कर्मचारी फक्त येतात, पाहणी करून जातात… पण काम काहीच होत नाही.”
कॉन्ट्रॅक्टर व कर्मचाऱ्यांची निष्काळजी दुरुस्ती, तांत्रिक पथकाचे अपुरे नियोजन, तसेच नवीन वॉल बसवण्यास विलंब हे मुद्दे अधोरेखित होत आहेत.
❗ पाण्याची टंचाई—पण महापालिकेची उदासीनता!
शहरात पाणी कपात सुरू आहे…
नळयोजना, टँकर, पाणीपुरवठा हे मोठे प्रश्न बनत आहेत…
आणि अशा परिस्थितीत हजारो लिटर पाणी वाया जाणे म्हणजे
➡ संसाधनांचा अपव्यय
➡ नागरिकांच्या पैशांचा अपव्यय
➡ प्रशासनाचा बेजबाबदारपणा
स्थानिक सामाजिक संस्थांनी यावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
🗣 नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
✔ “हे कॉन्ट्रॅक्टर- कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे होत आहे.”
✔ “वॉल नीट बसवले जात नाहीत; दुरुस्ती केलीच जात नाही!”
✔ “महापालिका जागी केव्हा होणार?”
सामाजिक संघटना, राजकीय कार्यकर्ते व नागरिकांनी तत्काळ वॉल दुरुस्ती आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी केली आहे.
📌 निष्कर्ष
गुलटेकडी–इंदिरानगर परिसरातील पाण्याची गळती तातडीने थांबवली नाही तर
→ पाणीटंचाई आणखी तीव्र होऊ शकते
→ संसाधनांचा प्रचंड अपव्यय सुरूच राहील
महापालिकेने तात्काळ पडताळणी करून वॉल बदलणे अथवा दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

शोध टाइम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
🌐 “प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
अशाच
🔸 ताज्या घडामोडी
🔸 आपल्या परिसरातील बातम्या
🔸 मनोरंजन
🔸 क्रीडा
🔸 देश–विदेश
🔸 स्थानिक
🔸 राजकीय
🔸 गुन्हेगारी विश्व
🔸 सामाजिक प्रश्न
यांच्या सर्व अपडेट्ससाठी आमच्या पेजला Like, Follow व Share करा!
📌 YouTube | Facebook | Instagram
👉 Subscribe करा — Follow करा — Support करा
📧 [email protected]
📞 9511654815

स्वारगेट परिसरात खाजगी ट्रॅव्हल्सचा सुळसुळाट — वाहतूक पोलिसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष? नागरिकांचा संताप उफाळला!पुणे | स्वा...
16/11/2025

स्वारगेट परिसरात खाजगी ट्रॅव्हल्सचा सुळसुळाट — वाहतूक पोलिसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष? नागरिकांचा संताप उफाळला!
पुणे | स्वारगेट
स्वारगेट वाहतूक हद्दीत खाजगी ट्रॅव्हल्स, कार, टॅक्सी, रिक्षा यांचा अवैध धिंगाणा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. नो पार्किंगच्या फलकाखालीच बिनधास्तपणे उभ्या राहणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेस आणि टॅक्सीमुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, तसेच नागरिकांचा संताप वाढत आहे.
🚧 शंकर शेठ रोड, वेगा सेंटर परिसरात अवैध व्यवसाय उघड्यावर!
स्वारगेट एसटी स्टँड बाहेरील भागात—
✔ खाजगी ट्रॅव्हल्सच्या मोठमोठ्या बसेस
✔ बिननोंदणीची टॅक्सी
✔ नो-पार्किंगमध्ये उभ्या खाजगी कार
यामुळे महामार्ग ते स्वारगेटपर्यंतची वाहतूक पूर्णपणे ठप्प होते आहे. या अवैध पार्किंगमुळे नियमित वाहनधारकांना व पादचारी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
🛑 सरकारचा महसूल खोऱ्याने घटतोय!
अधिकृत एसटी स्टँडला बसणारे प्रवासी
→ खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत.
त्यामुळे एमएसआरटीसीचा महसूल मोठ्या प्रमाणात घटत असून, सरकारी वाहतूक यंत्रणेची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे.
❗ वाहतूक पोलिसांचे "जाणूनबुजून" दुर्लक्ष?
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार—
“हे सगळं पोलीसांच्या आशीर्वादानेच चालत आहे. नाहीतर स्वारगेटमध्ये अशा मोठमोठ्या ट्रॅव्हल्स थांबणं शक्यच नाही.”
शंकर शेठ रोड, स्वारगेट, मुकुंदनगर, महर्षीनगर, जेजे चौक, सेवन लव्ह चौक—
सर्व ठिकाणी नो-पार्किंग झोन असूनही वाहतूक शाखेची कारवाई शून्य!
⚠ खाजगी ट्रॅव्हल्सचा खुलेआम उपद्रव
✔ बसेस थेट रस्त्यावर प्रवासी चढवतात
✔ मोठ्या गाड्या रस्त्यात उभ्या
✔ वाहतूक कोंडी रोजचीच
यामुळे अॅम्ब्युलन्स व अग्निशमन दलालाही मार्ग मोकळा मिळत नाही, नागरिकांचा जीव धोक्यात येतो आहे.
❓ पोलिसांकडून कारवाई कधी होणार?
नागरिकांचा थेट प्रश्न—
पोलीस आयुक्त यात लक्ष घालणार का?
पोलीस उपायुक्त, वाहतूक (येरवडा विभाग) यांच्याकडून कारवाई होणार का?
स्वारगेट परिसराला मोकळा श्वास मिळणार का?
अवैध ट्रॅव्हल्सवर जप्तीची कारवाई कधी?
सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना आणि स्थानिक नागरिकांनी त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
🗣 नागरिकांचे मत
“नियम फक्त सामान्य नागरिकांसाठी आहेत का? खाजगी ट्रॅव्हल्सना कधीच भीती नसते… त्यांच्यावर कारवाई का होत नाही?”
📌 निष्कर्ष
खाजगी ट्रॅव्हल्सचा वाढता सुळसुळाट हा स्वारगेट परिसरातील रस्ते, सुरक्षा, आणि सरकारी महसूल तिन्ही गोष्टींचा नाश करतो आहे.
वाहतूक विभागाने यावर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

शोध टाइम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
🌐 “प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
अशाच
🔸 ताज्या घडामोडी
🔸 आपल्या परिसरातील बातम्या
🔸 मनोरंजन
🔸 क्रीडा
🔸 देश–विदेश
🔸 स्थानिक
🔸 राजकीय
🔸 गुन्हेगारी विश्व
🔸 सामाजिक प्रश्न
यांच्या सर्व अपडेट्ससाठी आमच्या पेजला Like, Follow व Share करा!
📌 YouTube | Facebook | Instagram
👉 Subscribe करा — Follow करा — Support करा
📧 [email protected]
📞 9511654815

पुणे वाहतूक विभागाची धडाकेबाज कारवाई : 20 जड वाहनांवर गुन्हे दाखल, वाहनं जप्तपुणे | दिनांक : 15 नोव्हेंबर 2025पुणे शहरात...
15/11/2025

पुणे वाहतूक विभागाची धडाकेबाज कारवाई :

20 जड वाहनांवर गुन्हे दाखल, वाहनं जप्त

पुणे | दिनांक : 15 नोव्हेंबर 2025
पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने पुणे शहर वाहतूक विभागाने विशेष कारवाई पथक तैनात केले आहे. सहाय्यक पोउपनिरीक्षक देसाई यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने शहरातील विविध ठिकाणी गस्त घालत जड वाहनांवर कठोर कारवाई केली आहे.
पीक अवर्समध्ये बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांवर मोठी कारवाई
दिनांक 08/11/2025 ते 14/11/2025 या कालावधीत या पथकाने पीक अवर्समध्ये आणि रेड झोनमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रवेश करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर विशेष लक्ष ठेवले.
कारवाईत —
✔ 20 जड वाहनचालकांवर गुन्हे दाखल
✔ सर्व वाहनं जप्त
✔ गुन्हे नोंद – BNS कलम 110, 223, 281 व मोटार वाहन अधिनियम अंतर्गत
अधिकाऱ्यांनी सांगितले की अशा वाहनांमुळे गंभीर अपघाताची शक्यता वाढते, तसेच शहरातील वाहतूक कोंडीही तीव्र होते. त्यामुळेच ही विशेष मोहिम राबविण्यात आली.
वाहनचालकांसाठी वाहतूक विभागाचे आवाहन
वाहतूक विभागाने सर्व जड वाहन चालक व मालकांसाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत :
1️⃣ पीक अवर्स आणि रेड झोन परिसरात जड वाहनांना प्रवेशास सक्त मनाई
2️⃣ वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक
3️⃣ निर्धारित मार्ग, ठरलेली वेळ आणि वेगमर्यादा पाळणे आवश्यक
दाखल केलेल्या गुन्ह्यांचा पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
वाहतूक विभागाची सतर्क भूमिका
पुणे वाहतूक विभागाने सांगितले की शहरातील सुरक्षेसाठी अशा कारवाया पुढेही वेगाने चालू राहतील.
शहरातील नागरिकांना सुरक्षित, सुरळीत आणि अडथळामुक्त वाहतूक मिळावी हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

शोध टाइम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क
“प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी”
📌 अशाच ताज्या घडामोडी, गुन्हेगारी अपडेट्स व स्थानिक बातम्यांसाठी आमचे पेज Follow करा!
📧 [email protected]
📞 95654815
🔹 YouTube | Facebook | Instagram | Twitter – Like, Share & Subscribe करा

Address

411001, Pune, MH, India
Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shodh Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category