Spandan Pune

Spandan Pune Spandan Pune - Drama & Dance Academy, rawivar peth pune-411002

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणार्‍या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती. नाटकामध्ये शब्दसंहिता, कथानक, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही.

14/09/2017

*Spandan pune*
Present

* Acting workshop

* Basic Acting - Provide stage , Knowledge of Camera Facing , Knowledge of vocals

Contact - Sagar 8446221776
Manoj 8889712516

Address - Vishnupriya society , flat no 13 , near by kasba ganpati

04/04/2017
03/04/2017
04/02/2017

🌟🌟🌟STAR EVENTS 🌟🌟🌟
उमेदवारी तुमची प्रचार आमचा.....✌🏻
पक्ष कुठलाही असो तुमचा विजय हेच आमचे उद्धिष्ट.....

आमच्या कडे प्रचाराची सर्व कामे घेतली जातील.......
प्रचार पथनाट्य, प्रचारासाठी व्हिडीओ,ऑडिओ,मनोरंजन कार्यक्रम(होममिनिस्टर) प्रचाराचे नियोजन आणि आखणी,कार्यकर्त्यांचे नियोजन,यद्यांची कामे, झेंडे, प्रचार पत्रके, बूथ व्यवस्था,सोशल नेटवर्किंग द्वारे प्रचार,ई.सर्व प्रचारा संबंधित कामे केली जातील.....🙏
सागर स्वामी
7219618999
7020712055

23/01/2017

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

👉 मराठी/ हिंदी चित्रपट ऑडिशन ला जाताना नवीन कलाकारांनी घ्यावयाची काळजी:-

👉 नवीन कलाकारांसाठी काही टीपा:
(कृपया हे जरूर आणि पूर्ण वाचावे, ह्याचा आपल्याला फायदाच होणे अपेक्षित आहे)

१. प्रथम दर महिन्यास एक नाटक आणि सिनेमा (भाषेचे बंधन नाही)

२. नाटक आणि सिनेमा पाहताना, रंगमंच आणि कॅमेरा ह्यांचे भान ठेवून कलाकारांचा अभिनय, व्यक्तिरेखा, हावभाव, शब्दफेक, संवादफेक, आवाजाचा चढ-उतार (पोत), हालचाल, प्रतिक्रिया, प्रत्युत्तर, चपळपणा, संयम, दोन वाक्य/शब्द ह्यांच्यावर दिलेला भर, दोन्हीतले अंतर ह्याचे निरीक्षण करावे

३. मराठी मध्ये लोकसत्ता वृत्तपत्राच्या रविवारच्या लोकरंग पुरवणीचे पहिले पानाचे दोन्ही लेख मनातून आणि मुखोद्गत पद्धतीने वाचावे, शब्दाचा, वाक्याचा अर्थ कळत नसल्यास जाणकार व्यक्तीस निःसंकोच विचारावे. हिंदी मध्ये दैनिक भास्कर आणि इंग्रजी मध्ये दी इंडियन एक्सप्रेस चे अंक वाचावेत, दी फ्री प्रेस जनरल ह्या इंग्रजी वृत्तपत्राची लेखन शैली, नवोदित इग्रंजी शिकणाऱ्या लोकांसाठी सोपी असते.

४. प्रवास करताना विविध भाषिक लोकांचे निरीक्षण करावे, त्यांचे कपडे, हावभाव, भाषाशैली, बोलण्याचा ढंग आदी.. त्याचे अनुकरण (imitation) करावे, अंधानुकरण (blind imitation) नव्हे!

५. स्वतःचे रूप आणि स्वतःच्या मर्यादा जाणून घेऊन त्यानुसार आपल्याला कुठले पात्र जमू शकते हे स्वतः अभिप्रेत करावे जेणेकरून मोठे पात्र मिळवण्याकरिता त्यानुरूप बदल स्वतःमध्ये (रूप, भाषा, अभिनय) घडविणे आणि त्यासाठी मेहनत घेणे.
इथे एक लक्षात असावे कि प्रत्येक व्यक्ती मुख्य भूमिका करूच शकेल असे नसते परंतु मुख्य भूमिका साकारणारी व्यक्ती सुद्धा प्रत्येक पात्र साकारू शकते असे नसते!!

६. ऑडिशन (अभिनयाची मुलाखत)
ला जाताना प्रथम स्वतः स्वतःचे कपडे, रूप नेटनेटके आहे की नाही ह्याची खबरदारी घ्यावी, पूर्तता करावी, आणि मगच ऑडिशनच्या ठिकाणी पाऊल (एंटर होणे) टाकावे

७. आपल्याला मिळालेला परिच्छेद (स्क्रिप्ट) आधी मनातून वाचावी, मग तोंडाने वाचावी, काही प्रश्न जसे व्यक्तिरेखा (कॅरॅक्टर) कसे आहे, साधारण वय कसे आहे, कुठला भाव, प्रसंग अभिप्रेत आहे हे तिथल्या व्यक्तीस निःसंकोच विचारावे.

८. स्क्रिप्टचे पठण महत्त्वाचे नसते तर त्यातील भाववाचकता, प्रसंग, विशिष्ट शब्दोच्चार तुम्ही कसे करता, साकारता हे गरजेचे आहे, तथापि विशिष्ट शब्द असल्यास ते तसेच उच्चारावे बाकी काही शब्दांमध्ये बदल केल्यास (अर्थाचा अनर्थ न होऊन देता!) स्क्रिप्ट सादर करावी. इतके बदल नकोत कि दहा वाक्यांची स्क्रिप्ट तुम्ही तीन चार वाक्यांत संपवाल!!

९. एकदा हे झाले की ऑडिशन देताना प्रथम विचारावे कि आधी ओळख (प्रोफाइल) कि आधी सादरीकरण (परफॉर्मन्स) ?

१०. प्रोफाइल देताना पूर्ण नाव, वय, उंची, संपर्क सांगून समोर, उजवीकडे आणि डावीकडे वळून (वळल्यावर प्रत्येक वेळी मान फिरवून कॅमेराकडे पाहून किंचित स्मित होणे) आणि पुन्हा समोर वळणे.

११. ऑडिशन देताना, कॅमेरा हाफ प्रोफाइल आहे की फुल प्रोफाइल आहे हे जाणून घ्यावे

१२. रंगमंच आणि कॅमेरा दोन वेगवेगळी माध्यमे आहेत, गरज नसताना अतितार (ओरडून) स्वरात वाक्ये बोलू नयेत (व्यक्तिरेखा तशी असल्यास आवाजाचा पोत वरचा हवा), देहशैली, हावभाव, हालचाल ह्यावर अंकुश असावा, उगाचच अति नाटकी किंवा अति मूव्हमेंट्स इथे अपेक्षित नसतात!

१३. जिथे ऑडिशन ला जात आहात तिथल्या व्यक्तीशी उत्तम संवाद साधून जमल्यास त्यांचा संपर्क स्वतःकडे सेव करून घ्यावा, उगाच मागे लागू नये.

१४. कलाकारांनी ऍडस (जाहिरातींची) ओपन ऑडिशन्स जरूर द्यावीत कारण क्लायंट ला कुठला चेहरा अभिप्रेत आहे हे निश्चित नसते!

१४. ऑडिशन्स ला जाताना ज्याचे तर्फे आला आहात त्याचा रेफरन्स द्यावा, कॉर्डिनेटर असल्यास त्याचा पाठपुरावा करावा.

१५. काही कास्टिंग कंपन्या मेम्बर्स करून घेतात, तेव्हा ते तितके खरे आहेत का ह्याची खातरजमा करावी, शक्यतो काही माणसे पाच दहा हजार रूपये काम देण्याआधी मागून काम देतो असे बोलतात तिथे कधीच पैसे देऊ नये, कामानंतर कमिशन देण्यात काहीच चुकीचे नाही. काही कंपन्या शुल्लक शुल्क आकारून मेम्बर्स करून तुम्हाला प्रमोट करत असल्यास काही हरकत नाही पण त्याची नोंद असावी.

१६. तुमचे लुक्स (दिसणे), अभिनय क्षमता, तुमचे आचरण (बिहेविअर), तुमचा संवाद (अप्रोच), तुमचे उत्तम संबंध (रिलेशन्स) आणि तुमचे संपर्क (काँटॅक्ट्स) ह्या एकूण गोष्टींवर तुम्हाला काम मिळणे अपेक्षित आहे.

१७. तुम्हाला कुठल्याही गोष्टींविषयी कुठली अडचण, संदेह, शंका, प्रश्न असल्यास ते त्वरित त्या त्या वेळी संबंधित व्यक्तीशी बोलून निराकरण करून घ्यावे.

१८. मुलींसाठी महत्त्वाचे म्हणजे जे अश्चिल नाही असे कुठलेही कपडे घालण्यास, पात्र साकारण्यास ना नसावी, काळानुसार आणि प्रोजेक्ट्स नुसार स्वतःमध्ये बदल करावेत.

१९. अभिनय हा शिकून येत नाही, अर्थात त्यास आकार द्यावा लागतो तथापि तो शिकण्यासाठी भरमसाठ फी भरण्यापेक्षा नाटक पाहावे, करावे, अभिनय, आवाज शिबिरांना भेट द्यावी, वाचन करावे, स्वतःला अपडेट ठेवावे.

२०. स्वतःमध्ये योग्य ते बदल करणे, आत्मविश्वास ठेवणे, खंबीर राहणे, कमी बोलणे, अवाजवी गप्पा न मारणे, स्वतःच्या आचरणामध्ये संयम ठेवणे, प्रसंगाचे भान ठेवावे, आपल्याला जे येत नाही ते शिकून घ्यावे, जे येते तयात अजून उत्तम बनावे. कधीही भिऊ नये, मुलींनी👌 उगाच घाबरून संकोचून वागू नये, कोणीही आपल्याला डायरेकट् कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, फसवू शकत नाही.

बाकी मित्रहो, नम्रता असावी, आपल्याला जो काम देतो त्याची जाणीव ठेवावी, आदर ठेवावा, जिथे एटीट्युड गरजेचा नाही तिथे तो दाखवू नये कारण समोरचा आपल्याला चुकीचे गृहीत धरू शकतो, प्रोजेक्ट्सला समंती देताना सगळे काही आलबेल आहे का, त्याचा आपल्याला फायदा होणार का हे तपासावे, आणि मग हो म्हणावे!
धन्यवाद!.........
actor__kt ananda rao
(NaNa)comediyan___
09773524130
Kiran 7875546090
🙏आपला मित्र🙏
गणेश तळेकर
Kiran jat
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ - सभासद

29/12/2016

Patha naty sathe mula muli pahejat
Call me 7219618999 8149434925

14/12/2016

कलावंताशी लग्न करताना कायम त्याच्याकडे कलावंत म्हणून पहायची इच्छा आणि शक्ती असेल तर करावं... संसारात, व्यवहारात तो सामन्यापासून निराळा वागणार आहे हे गृहीत धरूनच करावं... त्याचं वागणं विक्षिप्त वाटेल पण त्याच्या विश्वात त्याला , त्याची अशी संगती असेल... ते आकलन होणार असेल तरच करावं... कलाकाराच्या सगळ्याच वृत्ती आणि विकार उत्कट असतात.. राग, प्रेम, लोभ, अभिलाषा, माया.... या सगळ्याच संवेदना पराकोटीच्या प्रखर असतात आणि त्यातल्या त्यात कुठल्या संवेदना केव्हा उफाळून येतील याचे संकेतही सामान्य पेक्षा निराळे असतात... अमुक एक भावना या वेळीच का ? असा प्रश्न त्या कलाकाराला रुचत नाही.. त्याला त्या क्षणी फक्त साथ हवी असते.... ---- व. पु. काळे

12/12/2016

सूर, ताल, लय यांचा मेळ म्हणजे एका अज्ञात ऊर्जा प्राप्तीचा "अनामिक प्रवास"

कधी काही प्रवास हे पूर्व निश्चित असतात.
कधी काही प्रवास घडून आणले जातात.
कधी काही प्रवास हे अनपेक्षित पणे सुरु होतात.
तर कधी काही प्रवास हे एका प्रवासातून एका नव्या प्रवासाची सुरुवात करतात.

आपण गुरफटतो या प्रवासाच्या वाटा शोधण्यात त्याचा तळ आणि टोक यांच्यातील अंतर मोजण्यात...

नेमकं काय याचा विसर पडतो खरां..
मग कधी वाट भिरभिरावं फुलपाखरा सारख गंधाच्या शोधात.
कधी वाटं वाहत जावं नदी प्रमाण संत प्रवाहाच्या दिशेनं.
कधी कधी पसरावं चौफेर कस्तुरी सुगंधा प्रमाणं
कधी वाट धारण करावां तो गर्भ नवं निर्मितीचा
तर कधी वाटं
वेगवान व्हावं त्या आंधळ्या गरुडा प्रमाणं
कि घ्यावी भरारी चिवचिव करीत या अवकाशात आणि झोकून द्यावं स्वतःला पंखांच्या बळावर ?

बहरतं रहावं कल्पवृक्षा प्रमाणं
तर कधी पानझड होऊन रुजाव आशेचा अंकुर होण्यास आणि रुपांतरीत व्हावं एका भव्य वटवृक्षात...

प्रवासात कळतं नकळतं वेचावं सगळं,
अनुभवाव सारं,
चालतं रहावं पाउलं अन पाउलं

एका प्रवासातून दुसऱ्या प्रवासाच्या दिशेनं
चालतं रहावं फक्त चालतं
कधी ताल धरून,
कधी लयीत,
तर कधी सूरात सूरं मिसळत अनुभवावा फक्त 'नाद'
या प्रवासात येणाऱ्या अनेक कडू गोड आठवणींन सोबत चालतं रहावं

लेख :-
(चालतं रहावं फक्त चालतं)

09/12/2016

भारतीय ललित कलांना समर्पित अखिल भारतीय संघटना

15/11/2016

स्पर्धा असो की प्रायोगिक अथवा व्यावसायिक प्रयोग. प्रेक्षक म्हणुन नविन काहीतरी पहायला मिळावं ही अपेक्षा असते. मनोरंजनाबरोबरच एखादा संदेश देणारी कलाक्रुती अधिक भावते आणि थेट काळजाला जाऊन भिडते. आणि मग प्रेक्षक म्हणुन भरभरुन दाद देतांना आपल्याही नकळत नाटकातील काही व्यक्तीरेखा विचारांमधुन थेट आपल्या सोबत वावरतात. नाटकातील काही पात्रे, वास्तवातील पात्रांशी साधर्म्य असणारी वाटु लागतात. मग ते नाटक केवळ नाटक रहात नाही. आपल्या अंतर्मनात कुठेतरी ते रुजलं जातं, आपल्या विचारांतुन आपोआपच फुललं आणि बहरलं जातं, आणि आपल्या आचरणातुन उतरलं जात व्यक्तीमत्वाचाच एक भाग बनुन जातंं..

05/11/2016

तिसरी घांटा होते।
मखमलं ही उलगडते।
रंगरंगल्या अभिनेत्यांचे भानं हरवुनी जाते।।
कसली जादू होते।
भारुनी सारे जाते।
रसिकांसाठी आसू आणि हासू ठेउनी जाते।।
🎭 रंगभुमी दिनाच्या हार्दीक शुभेच्छा🎭

05/11/2016

सर्व रंगकर्मीना "रंगभूमी दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा....

Address

Pune
411002

Opening Hours

Monday 5pm - 9pm
Tuesday 5pm - 9pm
Wednesday 5pm - 9pm
Thursday 5pm - 9pm
Friday 5pm - 9pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

8149581836

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spandan Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Spandan Pune:

Share