kavibhushan7

kavibhushan7 नमस्कार मित्रांनो ��
आपल्यासाठी घेउन आलो आहे महाकवी भूषण ह्यांचे ब्रज भाषे मधील रचलेले छंद.

डाढ़ीके रखैयनकी डाढ़ीसी रहत छाती बाढ़ी मरजाद जैसी हद्द हिंदुवाने की कढिगई रैयत के मनकी कसक सब, मिटिगई, ठसक तमाम तुरकाने ...
27/07/2026

डाढ़ीके रखैयनकी डाढ़ीसी रहत छाती
बाढ़ी मरजाद जैसी हद्द हिंदुवाने की
कढिगई रैयत के मनकी कसक सब,
मिटिगई, ठसक तमाम तुरकाने की ।।
भूषन भनत दिल्लीपति दिल धकधका
सुनि सुनि धाक सिवराज मरदाने की ।
मोठी भई चंडी बिन चोटी के चबाय सीस,
खोटी भई संपति चकत्ता के घराने की ।।४७।।

डाढी=दाढी; रखैयन राखणारे; डाढी रहत = जळत; बाढी वाढली; मरजाद मर्यादा; हद्द सीमा; हिंदुवान = हिंदुस्तान; कढि गई निघाली; नाहीशी झाली; रैयत = प्रजा; कसक पीडा; मिटि गई = मिटली, नष्ट झाली; ठसक= घमेंड, अभिमान; तमाम = सर्व; तुरकाने की तुर्काची, मुसलमानांची; धकधका थर थर कापणे; मरदाना = शूर मर्द; मोठी = लठ्ठ; भई झाली; चंडी = रण देवता; बिन चोटी = शिखा हीन (मुसलमान); चबाय चावून; सीस = मस्तक; खोटी भई क्षीण झाली; चकत्ता घराना = चगताई वेश (ज्यात औरंगजेब उत्पन्न झाला)

जसजशी हिंदुंची राज्यमर्यादा वाढू लागली तसतशी दाढी राखणाऱ्यांची (यवनांची) छाती जळू लागली. (हिंदुंचे वैभव सहन होईना) हिंदू प्रजेच्या मनातील सर्व पीडा नाहीशी झाली व मुसलमानांचा गर्व पार नष्ट झाला. भूषण म्हणतो, ‘मर्द शिवराजाचा वारंवार दरारा ऐकून, दिल्लीपती औरंगजेबाच्या हृदयात धडकी भरली. रणदेवता शिखाहिनांची (यवनांची) मुंडकी खाऊन ताजी व लठ्ठ झाली आहे आणि मोंगल घराण्यांतील राजलक्ष्मी दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे.’

मारि करि पातसाही खाकसाही कीन्ही, जिन जेर कीन्हों जोर सों लै हद्द सब मारे की । खिसि गई सेखी, फिसि गई सूर ताई सब, हिसि गई ...
10/07/2026

मारि करि पातसाही खाकसाही कीन्ही, जिन जेर कीन्हों जोर सों लै हद्द सब मारे की । खिसि गई सेखी, फिसि गई सूर ताई सब, हिसि गई हिम्मति हजारो लोग सारे की ।। बाजत दमामें लोखों धौंसा आगे घहरात, गरजत मेघ ज्यों बरात चढ़े भारे की । दूल हो सिवाजी भयो दच्छिनी दमामे बारे, दिल्ली दुलहिन भई सहर सितारे की ।।४६।।

पातसाही = राज्य (मुसलमानी); खाक साही = भस्म ; कीन्ही=केली; जिन = ज्याने; सों नें; लै = घेऊन; खिसिगई पडली; झुकली; सेखी बढाई; फिसिगई नष्ट झाली; सूरताई = शूरत्व; धौंसा = नगारे; घहरात = गर्जत; भारे = श्रीमंत; दूलहो = नवरा ; दमामेवारे = नगारेवाले; दुलहिन = वधू, नवरी; सहर = शहर ; सारे सर्व; जेर कीन्हों= जर्जर केले.

ज्याने केवळ आपल्या सामर्थ्याने सर्व माऱ्यांच्या जागा हस्तगत करून घेऊन मोठमोठ्यांची बढाई, शूरपणा, तसेच हजारो शूरांच्या हिंमती ज्याने नष्ट केल्या त्या शिवाजीराजाच्या विजयदुंदुभी मेघांच्या गडगडाटाप्रमाणे दणाणत आहेत; जणु एखाद्या श्रीमंताच्या लग्नाची वरातच (जिच्यापुढे नगारे, नौबतींचा मेघर्गजनेप्रमाणे दणदणाट चालावा) निघाली आहे असे वाटत आहे. दक्षिणेत विजय दुंदुभी वाजविणारे शिवाजी हे ह्या वरातीतील नवरदेव होत व दिल्ली त्या सातारागडाधिपतीची नवरी होय.

मालवा उजैन भनि भूषन भेलास ऐन सहर सिरोज लौं परावने परत है ।गोंडबानो तिलंगानो फिरंगानो करनाट रुहिलानो रुहिलन हिये हहरत हैं...
08/07/2026

मालवा उजैन भनि भूषन भेलास ऐन सहर सिरोज लौं परावने परत है ।
गोंडबानो तिलंगानो फिरंगानो करनाट रुहिलानो रुहिलन हिये हहरत हैं।।
साहिके सपूत सिवराज, तेरी धाक सुन गढ़पति बीर तेऊ धीर न धरत हैं।
बीजापुर गोलकुंडा आगरा दिल्ली के कोट बाजे बाजे रोज दरबाजे उघरत हैं ।।४५।।

मालवा=माळवा; भेलास भेलसा-ग्वाल्हेर; ऐन-ठीक, थेट (अरबी शब्द); सिरोज = शिराज, इराणातील एक शहर; हहरत हैं = भयभीत होतात; रुहिलन हिये = रोहिल्यांची हृदये; कोट किल्ला; बाजे बाजे रोज एकाद्या दिवशी, केव्हा तरी, कोण्या तरी.

भूषण म्हणतो, ‘हे शहाजीचे सुपुत्र शिवराज ! तुमच्या धाकाने माळवा, उज्जैन, आणि भेलशांच्या (यवन) रहिवाशांस थेट इराणची राजधानी शिराजपर्यंत पळावे लागले. गोंडवण, तेलंगण, रोहिलखंड, कर्नाटक तसेच फिरंगी लोकांच्या वस्तीतील रहिवाशांच्या हृदयात धडकी भरली आहे. मोठमोठे शूर किल्लेदार धीर धरीनातसे झाले. गोंवळकोंडा, आग्रा आणि दिल्ली येथील किल्ल्यांचे दरवाजे महिना- पंधरा दिवसातून केव्हा तरी उघडतात, रोज-रोज उघडत नाहीत.’

दुग्ग पर दुग्ग जीते सरजा सिवाजी गाजी, उग्ग पर उग्ग नाचे रुंड मुंड फरके। भूषन भनत बाजे जीत के नगारे भारे सारे कर नाटी भूप...
07/07/2026

दुग्ग पर दुग्ग जीते सरजा सिवाजी गाजी, उग्ग पर उग्ग नाचे रुंड मुंड फरके। भूषन भनत बाजे जीत के नगारे भारे सारे कर नाटी भूप सिंहल को सरके ।। मारे सुनि सुभट पनारे बारे उदभट, तारे लगे फिरन सितारे गढ़धर के । बीजापूर बीरनके गोलकुंडा धीरन के दिल्ली उर मीरन के दाडिम से दर के ।।४४।।

दुग्ग=दुर्ग, उग्ग=उग्र, शंकर; सिंहल=सिंहल द्वीप; सरके=पळाले; पनारे वारे = पन्हाळगडवाले; उदभट=पराक्रमी; तारे फिरन लगे = भाग्य पालटूं लागले; गढधर = गडपति; दरके=फाटले; गाजी= धर्म करणारा, धर्मवीर.
धर्मवीर शिवाजीने एकामागून एक असे कित्येक किल्ले घेतले. रणांगणात शेकडो धडे व शिरे नाचू उडू लागली. विजयदुंदभींच्या प्रचंड जयघोषाने कर्नाटकचे सर्व राजे थेट सिंहलगीपापर्यंत पळाले. शिवाजीचा भाग्यसूर्य अनुकूळ तळपत आहेसे पाहून व पन्हाळगडच्या शूरवीर योद्ध्यांस मारलेले ऐकून, विजापूरच्या वीरांची, गोंवळकोंडा येथील धैर्यशील शूरांची, व दिल्लीच्या सरदारांची हृदये डाळिंबाप्रमाणे उलली (फाटली.)

10/05/2026

उतै पात साहजू के गजन के ठट्ट छूटे,
उमदि घुमदि मतवारे घनकारे हैं।
इतै सिवराज जूके छूटे सिंहराज और
बिदारे कुंभ करिन के चिक्करत भारे हैं।।
फौजें सेख सैयद मुगल औ पठानन की
मिली इखलास खांहू मीरन सँभारै हैं।
हद्द हिंदुवान की बिहद्द तरवारि राखी,
कैयो बार दिल्ली के गुमान झारि डारे है ।।२४।।

अर्थ :-
उतै तिकडून; जू-जी (बहुमानार्थी); ठट्ट-समहू; उमडि=वेगानें; घुमडि=घेरून येणे; मतवारे-उन्मत्त; कारे काळे; इतै-इकडून; बिदारे विदारण केलें; करिन हत्ती; चिक्करत भारे हैं = मोठ्यानें गडगड करीत आहेत; चिक्करणे = हत्तीचे ओरडणे; हू-देखील; मीर=सरदार; बिहद्द मोठी, अमर्याद; कैयोबार=कित्येक वेळा; गुमान-गर्व; अभिमान; झारि डारे हैं-झाडून टाकले आहेत, खंडन केले.

तिकडून दिल्लीपती औरंगजेबबादशहाच्या हत्तींच्या झुंडीच्या झुंडी काळ्याकुट्ट मेघांप्रमाणे निघाल्या आहेत, तर इकडे शिवराजाकडून सिंहासारखे मराठे शूर गडी घोर गर्जना करीत त्या हत्तींच्या मस्तकांचे विदारण करीत आहे�

मौरंग कुमाऊँ औ बाँधे एक पल,कहाँ लौं गिनाऊँ जेब भूपन के गत हैं।भूषन भनत गिरि बिकट निवासी लॉग,बावनी बवंजा नव कोटि धूंध जोत...
27/03/2026

मौरंग कुमाऊँ औ बाँधे एक पल,
कहाँ लौं गिनाऊँ जेब भूपन के गत हैं।
भूषन भनत गिरि बिकट निवासी लॉग,
बावनी बवंजा नव कोटि धूंध जोत है ।
काबुल कंधार खुरासान जेर किन्हों जिन,
मुगल पठान सेख सैय्यद हा रोत हैं ।
अब लग जानत हे बडे होत पातसाह
सिवराज प्रगटे ते राजा बडे होत हैं ।

अर्थ -
भाषण म्हणतो, ‘मौरंग, कमाऊ आणि पलाऊ येथील संस्थानिकांनी तर शिवाजीने क्षणात जिंकून कैद केले; यांच्याप्रमाणे आणखी किती तरी राजांना कैद केले, ते मी कोठवर मोजू? ऊंच आणि बिकट अशा पर्वतांवर राहणाऱ्यास त्याचप्रमाणे बावनी बवंजा, नव कोटी, येथील संस्थानिकांस निस्तेज करून टाकले. काबुल, कंदहारांस जर्जर केल्यामुळे मोंगल, पठाण, शेख, सैय्यद हाहाकार करून रडत आहेत. आजपर्यंत ‘ बादशहाच काय तो मोठा’ असे लोक समजत असत. पण शिवाजीच्या पळत होण्याने राजाच मोठा (श्रेष्ठ) असतो हे समजून आले ‘ ॥

चकित चकत्ता  चौकिं चौकिं उठै बार बार,दिल्ली दहसति चिते चाह करषति है |बिलखि बदन बिलखात बिजैपुरपती,फिरति फिरंगीनि की नारी ...
24/03/2026

चकित चकत्ता चौकिं चौकिं उठै बार बार,
दिल्ली दहसति चिते चाह करषति है |
बिलखि बदन बिलखात बिजैपुरपती,
फिरति फिरंगीनि की नारी फरकत है ।
थरथर कापत कुतूबसाह गोलकुंडा,
हहरि हबस भूपभीर भरकति है ।।
राजा सिवराज के नगारन की धाक सुनी
केते पातसाहन की छाती दरकती है ।। ४२ ।।

अर्थ-शिवाजी महाराजांच्या नगारांच्या दणदणाट ऐकून औरंगजेब भयचकित होऊन वारंवार दचकून उठतो आहे, दिल्लीवासीयांच्या मनात दहशत बसली आहे. विजापूरच्या बादशाहचा उदास झालेला चेहरा पाहून दिरंगाई स्त्रिया घाबरून गेल्या आहेत; गोवळकोंड्याचा कुतुबशाह बादशाह थरथर कापत आहे; हबशी राजे या भयभीत होऊन पळून जाण्याच्या तयारीत आहेत, कित्येक बादशहाच्या छात्या फाटून गेल्या आहेत.

#कविराज #महाकविराज

कोट गड ढाहियतु एकै पातसाहनके,एकै पातसाहन के देस दाहियतु है।भूषण भनत महाराज सिवराज एकै साहन की फौज खग्ग बाहियतु है॥क्यों ...
21/03/2026

कोट गड ढाहियतु एकै पातसाहनके,
एकै पातसाहन के देस दाहियतु है।
भूषण भनत महाराज सिवराज एकै
साहन की फौज खग्ग बाहियतु है॥
क्यों न होहि बैरिन की बैरि बधू बौरी सुनि,
दौरनि तिहारे कहौ क्यों निवाहियतु है।
रावरे नगारे सुने बैर बारे जगरन नैन बारे
नदन निवारे चाहियतु है॥ ४१॥

अर्थ :-
हे शिवाजी महाराज ! आपण कोणा बादशहाचे किल्ले पाडता,
कोणाचे देश जाळून भस्म करता, तर कोणा बादशहाच्या सैन्यावर तरवार चालविता, हा आपला पराक्रम पाहून शत्रुस्त्रीया का बावरणार नाहीत ?
तुमच्या हल्ल्यांपासून त्या आपले संरक्षण कसे करू शकतील? भूषण म्हणतो, तुमच्या नगाऱ्यांचा भयंकर ध्वनी ऐकून शत्रूंच्या नगरांतील लोक सारखा विलाप करीत आहेत, तो इतका की, त्यांच्या अश्रूंच्या नद्या पार होण्यास मोठ मोठ्या नौका पाहिजे आहेत.

सिवा की बडाई और हमारी लघुताई क्यों कहत बार बार कहि पातसाह गरजा ।सुनीये खुमान हरि तुरुक गुमान महि देवन जेंवायो कवि भूषण य...
20/03/2026

सिवा की बडाई और हमारी लघुताई क्यों
कहत बार बार कहि पातसाह गरजा ।
सुनीये खुमान हरि तुरुक गुमान महि
देवन जेंवायो कवि भूषण यों अरजा ||
तुमवाको पाय कें जरूर रन छोरो वह
रावरे बजीर छोरि देत करि परजा |
मालुम तिहारो होत याहि मैं निवारों रन
कायर सो कायर औ सरजा || ४० ||

अर्थ:-
औरंगजेबाने एकदा भूषण कवीस खोदखोदून विचारले की, तू नेहमी शिवाजीची प्रशंसा आणि आमची निंदा करतोस ह्याचे काय कारण ?
भाषणाने विनयपूर्वक उत्तर दिले, ऐका, तो शिवाजी चिरंजीव होवो, त्याने म्लेच्छांचा गर्वहरण करून देवा ब्राह्मणांचे संरक्षण केले.
दुसरे असे की रणात तुम्ही त्याला पाहिले मात्र की, तुम्हास रण सोडून पळून जावे लागते. ( शिवाजी ही संधी पाहून )तुमच्या प्रधानास आपली प्रजा करून घेतो, ( आपल्या छत्राखाली घेतो ). तुमच्या प्रश्नाचा निवाडा या तुमच्या कृतीतच आहे. तुम्ही रण सोडून पळून जाता आणि शिवाजीस पाहून भिता म्हणून तुम्ही रणभीरू व तो रणशूर सिंह.

#कविभूषण

Address

Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when kavibhushan7 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category