29/06/2026
पाऊस पडल्या पडल्या घरची पिवळी लिली टवटवीत फुलली आणि इकडे तिकडे बागडणाऱ्या गोंडस मुलांसारखी हसून माझ्याकडे पाहतेय असं मला वाटलं.
दुसऱ्या दिवशी बाणेरच्या क्लास मध्ये दाराची बेल वाजली आणि मी दार उघडलं तर अशीच 3 टवटवीत फुललेल्या पिवळ्या लिलींसारखी डोलणारी, उत्सुकतेने चमकणाऱ्या डोळ्यांची मुलं समोर उभी. ही मुलं शाळेतून direct च क्लासला आली होती. तरी कुठे कंटाळा नाही, थकवा नाही की भूक लागल्याची अस्वस्थता नाही.
अशी स्वरभान ची ओढ मुलांना अगदी दुसऱ्या दिवसापासूनच लागते.
यांना पाहून माझाही उत्साह वाढतो.
या छोट्या व्हिडिओत पहा त्यांची जाणून घेण्याची उत्सुकता. ❤️👬👯♀️🧑🤝🧑