09/02/2020
शिक्षण संगीता सारखे सुखमय व आनंददायी व्हावे यास्तव संगीताच्या माध्यमातून शिक्षणाला हातभार लावणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश!
त्यासाठी काही समविचारी व भारावलेल्या संगीतप्रेमींनी एकत्र येऊन तालासुरात झंकारायचे ठरविले व त्या अनुषंगाने हा वाद्यवृंद व गायक,गायिकांचा मेळ!
शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार, त्यापासून पैशाअभावी कुणी वंचित राहू नये या उदात्त हेतूने दानशूरांनी दान केलेली रक्कम वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षादानात कार्य करणाऱ्या सेवाभावी व स्वयंसेवी संघटनांना मदत म्हणून देण्याचा मानस आहे!