27/03/2026
काल छत्रपती संभाजी नगर ते परभणी मराठवाडा एक्सप्रेस ने प्रवास करत असताना. साधारण परतुर ते सेलूच्या दरम्यान हातात एक पिशवी व त्यात एक स्टीलचा डबा घेऊन रेल्वेच्या डब्यामध्ये चढला. रेल्वेमध्ये जसा एखादा विक्रेता आपल्या पदार्थाची जोरजोरात ओरडून मार्केटिंग करत असतो त्याप्रमाणे या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा न करता आपल्या प्रॉडक्टची मार्केटिंग न करता फक्त त्या पिशवीमध्ये आलेल्या मोठ्या स्टीलच्या डब्याचे झाकण उघडले व काही क्षणात त्या डब्यामधून गरमागरम वाफा सहित सेलूंच्या मसाला चण्याच्या गमघमाट अख्या डब्यामध्ये पसरला. आता एसी चा डबा असल्याकारणाने त्या चण्यांचा घमघमाट बराच वेळ डब्यामध्ये घुमत होता... आता मुळामध्ये रेल्वेच्या प्रवासामध्ये कोणताही पदार्थ खाताना मनाची बरीच घालमेल होते कारण तो पदार्थ विकणाऱ्याची स्वच्छता तसेच उघड्यावर ट्रेमध्ये घेऊन फिरणारे अस्वच्छ असे फेरीवाले त्यामुळे कुठलाही पदार्थ खाण्याची हिंमत होत नाही. परंतु जेव्हा या चनेवाल्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्यामध्ये असलेला टापटीपणा हातामध्ये घातलेले ग्लोज व बंद डब्यामध्ये असलेला पदार्थ त्यामुळे भूक लागली असल्याकारणाने चणे टेस्ट करण्याची इच्छा झाली. मग काय दिला भाऊला आवाज व एक प्लेट सेलु चे चणे घेतले. गरमागरम वाफाळलेले मसालेदार चणे त्यावर टाकलेला कांदा व कोथिंबीर, हळद मीठ लावलेल्या दोन कैरीच्या फोडी व सोबतीला रेल्वेचा प्रवास, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्या सामान्य माणसाला आणखीन काय हवंय.... पहिला घास खाताच आपसूकच तोंडामधून फक्त वाह निघाले... व्यवस्थित शिजलेले चणे अंगापुरता लागलेला मसाला त्यामुळे चण्याची चव अगदी भन्नाट होती... त्या भाऊला न सांगताच त्याचा त्याचा फोटो काढला... आपणही कधी छत्रपती संभाजीनगर ते परभणी किंवा नांदेड प्रवास करत असाल तर नक्कीच या चण्यांचा आस्वाद घ्यायला विसरू नका...