लोकशाहीची मुस्कटदाबी

लोकशाहीची मुस्कटदाबी Creating social and political awareness

“आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अखेर विजय! पुण्यात सरकारला झुकावं लागलं; मागण्या मान्य”पुण्यात आदिवासी विद्यार्थ्या...
29/08/2026

“आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अखेर विजय! पुण्यात सरकारला झुकावं लागलं; मागण्या मान्य”
पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक आणि मूलभूत हक्कांसाठी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. 17 दिवस विद्यार्थ्यांनी केलेल्या उपोषणाची दखल घेत प्रशासनाकडून त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
शिक्षण, वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आदिवासी विद्यार्थ्यांनी आवाज बुलंद केला होता. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती.
अखेर प्रशासनाने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेतला. त्यामुळे “एकजूट आणि संघर्षाच्या जोरावर हक्क मिळवता येतात” हे पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने दाखवून दिले आहे.
हा केवळ एका आंदोलनाचा विजय नसून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या लढ्याला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे.

मतदारांच्या गोपनीय माहितीची सुरक्षा धोक्यात?
29/08/2026

मतदारांच्या गोपनीय माहितीची सुरक्षा धोक्यात?

नेपाळ पूर दुर्घटनेत आतापर्यंत 584 जणांचा मृत्यू तर 2381 जन बेपत्ता          
29/08/2026

नेपाळ पूर दुर्घटनेत आतापर्यंत 584 जणांचा मृत्यू तर 2381 जन बेपत्ता 

“दलित कितीही मोठा झाला, तरी त्याच्यावर होणारा भेदभाव थांबलेला नाही—राहुल गांधींचा गंभीर आरोप.”29 ऑगस्ट 2026 रोजी राहुल ग...
29/08/2026

“दलित कितीही मोठा झाला, तरी त्याच्यावर होणारा भेदभाव थांबलेला नाही—राहुल गांधींचा गंभीर आरोप.”
29 ऑगस्ट 2026 रोजी राहुल गांधी यांनी दलितांवरील भेदभावाच्या मुद्द्यावर तीव्र भूमिका मांडली.
त्यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेला अस्पृश्यतेचे दुसरे रूप असल्याचे म्हटले. या प्रकरणात SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत FIR दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

राहुल गांधी यांनी पुढे दावा केला की, दलितांवर आजही शाळा, गाव आणि सार्वजनिक ठिकाणी भेदभाव केला जातो—काही ठिकाणी दलित मुलांकडून स्वच्छतागृहे साफ करून घेतली जातात, तर काही चहाच्या टपऱ्यांवर त्यांच्यासाठी वेगळे कप ठेवले जातात, असा त्यांनी आरोप केला.

“सरकारी शाळेतील मुलांना विषारी अन्न? सत्य समोर आणणाऱ्यांवर FIRची धमकी; मग दोषींवर कारवाई कधी?”अभिजीत दिपके यांचा सरकारला...
29/08/2026

“सरकारी शाळेतील मुलांना विषारी अन्न? सत्य समोर आणणाऱ्यांवर FIRची धमकी; मग दोषींवर कारवाई कधी?”
अभिजीत दिपके यांचा सरकारला सवाल!

मोहन भागवत यांना अमेरिकेच्या USCIRF पाठोपाठ कॅनडात देखील 267 कॅनेडियन संस्था व संघटनांनी त्यांच्या प्रस्तावित कॅनडा दौऱ्...
29/08/2026

मोहन भागवत यांना अमेरिकेच्या USCIRF पाठोपाठ कॅनडात देखील 267 कॅनेडियन संस्था व संघटनांनी त्यांच्या प्रस्तावित कॅनडा दौऱ्यापूर्वी प्रवेश नाकारण्याची मागणी केली आहे.

नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या अचानक महापुराने हिमालयीन भागाला अक्षरशः हादरवून सोडलं. भोटे कोशी नदीच्या परिसरात आलेल्या य...
29/08/2026

नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या अचानक महापुराने हिमालयीन भागाला अक्षरशः हादरवून सोडलं. भोटे कोशी नदीच्या परिसरात आलेल्या या महापुरामुळे घरे, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले.

पण हा केवळ मुसळधार पावसाचा पूर नव्हता! प्राथमिक माहितीनुसार, तिबेटच्या बाजूला झालेल्या हिमस्खलनामुळे तात्पुरता पाण्याचा अडथळा निर्माण झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी अचानक नदीत सोडलं गेल्याने विनाशकारी फ्लॅश फ्लड निर्माण झाला असण्याची शक्यता आहे. याबाबत तपास सुरू आहे.
Rasuwa, Nuwakot, Dhading आणि आसपासच्या भागांना मोठा फटका बसला. प्रशासनाने बचावकार्य सुरू केलं असून अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. 28 ऑगस्टच्या नेपाळ सरकारच्या माहितीनुसार 538 मृतदेह सापडले असून 511 जण अद्याप बेपत्ता होते; आकडेवारी अजून बदलू शकते.

TMCच्या 20 बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांचा दणका; 7 दिवसांत उत्तर देण्याची नोटीस!TMCचे 20 बंडखोर खासदार NCPIमध्ये सह...
29/08/2026

TMCच्या 20 बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांचा दणका; 7 दिवसांत उत्तर देण्याची नोटीस!
TMCचे 20 बंडखोर खासदार NCPIमध्ये सहभागी झाल्याचा आरोप करत त्यांच्या अपात्रतेची मागणी करणाऱ्या याचिकांवर लोकसभा सचिवालयाने कारवाई सुरू केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीने या 20 खासदारांना नोटीस पाठवून सात दिवसांत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. ही याचिका TMC नेते अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत दाखल केली होती.
आता 20 खासदारांची बाजू काय? आणि त्यांची लोकसभा सदस्यता टिकणार की जाणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

“सरकारी नोकरी की राजकीय सहभाग?” RSSच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या गुरूराज जोशी-अण्णासाहेब देशमुख यांना निलंबनाचा झटका!  ...
29/08/2026

“सरकारी नोकरी की राजकीय सहभाग?” RSSच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या गुरूराज जोशी-अण्णासाहेब देशमुख यांना निलंबनाचा झटका!

“लिंबू कापलं अन् पाऊस थांबला?” भाजप खासदारांचा दावा; विज्ञानाच्या युगात अंधश्रद्धेला राजाश्रय मिळतोय का?
28/08/2026

“लिंबू कापलं अन् पाऊस थांबला?” भाजप खासदारांचा दावा; विज्ञानाच्या युगात अंधश्रद्धेला राजाश्रय मिळतोय का?

Address

Juna Pedgaon Road
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when लोकशाहीची मुस्कटदाबी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share