Vaibhav punekar

Vaibhav punekar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vaibhav punekar, Dance Studio, Osmanabad.

05/11/2024
18/10/2024
18/10/2024

४०० वर्षांची अभिमानास्पद परंपरा!

तुळजाभवानी मातेच्या छबिन्यासाठी सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या दोन काठ्यांना मोठा मान आहे. समाजाची उन्नती व्हावी, सुख, शांती, समृद्धी व्हावी तसेच प्लेग, पटकी, देवी यासारख्या रोगांपासून मुक्ती मिळावी यासाठी मागील ४०० वर्षांपासून मोठ्या भक्तिभावाने व आत्मीय श्रद्धेने ही परंपरा आजही सुरू आहे..

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या छबिन्यासाठी ही शिवलाड तेली समाजाच्या या काठ्या व पालखीला मान आहे. तुळजापूर देवस्थानकडून दरवर्षी छबिन्याचे आमंत्रण दिले जाते. आपल्या अभिमानस्पद परंपरेप्रमाणे सोलापुरातून या मानाच्या काठ्या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तुळजाभवानीच्या दरबारात दाखल झाल्या.

श्री.तुळजाभवानी मातेचा छबिना या काठ्यांसह मोठ्या उत्साहात काढला जातो. तुळजापूर आणि सोलापूरचे असे अनोखे नाते या अनोख्या धार्मिक परंपरेने चार शतकांपासून जोडले गेले आहे..

#तुळजापूर #तुळजाभवानी #धाराशिव

18/10/2024
16/10/2024

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून घ्यावे!

जिल्ह्यात मागील २ दिवसात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शेतकरी बांधवांनी या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठ्यांकडे आग्रही मागणी करावी. तसेच पीकविमा कंपनीला ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती कळवावी.

रविवारी आणि सोमवारी रात्री जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. यापूर्वीही ३७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. राज्य सरकारकडे पीक नुकसानीचे अनुदान मागणीसाठी आताच्या पावसात नुकसान झालेल्या पिकांचे तलाठ्यांमार्फत पंचनामे होणे आवश्यक आहे. त्यासाठी तलाठ्यांकडे रितसर अर्ज देऊन पंचनाम्याची मागणी करून त्याची पोच आपल्याकडे ठेवावी.

तसेच पीकविमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी पाऊस झाल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानीची माहिती कळवावी, म्हणजे आपल्याला भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर होईल. २४ तासात ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला किंवा सलग १० दिवस दररोज किमान १० मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला तर राज्य सरकारकडून आपल्याला पीक नुकसानीपोटी अनुदान मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.

एप्रिल २०२१ चे परिपत्रक शेतकर्‍यांसाठी नुकसानकारक ठरणारे आहे. त्यामुळे पीक विम्याचा लाभ मिळणे शेतकर्‍यांसाठी अडचणीचे ठरणार होते. तरीही निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. लवकरच हे परिपत्रक रद्द होणार आहे. त्याची प्रक्रिया सध्या केंद्रीय कृषीमंत्री ना.श्री.शिवराजसिंह चौहान यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे.

२०२०-२१ च्या पीक विम्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेत बुधवारी सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ विधीज्ञ श्री.व्ही.डी.साळुंखे यांच्यामार्फत शेतकर्‍यांच्या हक्काचे ६५० कोटींची भरपाई आणि त्यावरील व्याज मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या न्यायालयीन प्रक्रियेला थोडा वेळ लागणार आहे. परंतु शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत.

#धाराशिव #पिक_विमा

16/10/2024

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

कोजागिरी पौर्णिमा हा सजता आणि जागृती शिकविणारा उत्सव आहे.. आपल्या जीवनातही दुधाचा गोडवा व पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णता येवो हीच सदिच्छा..

#कोजागिरी #पौर्णिमा

15/10/2024
15/10/2024

निम्न तेरणा उपसासिंचन योजना टप्पा क्र.१ ते ५ योजनेच्या संदर्भात स्थापत्य, यांत्रिकी विद्युत दुरुस्ती व इतर अनुषंगिक कामांच्या विशेष दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश जारी!

ठाकरे सरकारच्या काळात रखडलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या दुरूस्तीला महायुती सरकारने हिरवा कंदिल दाखवत मान्यता दिली होती. त्याचा आज शासन आदेश काढण्यात आला.

१० ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ११३ कोटी रूपयांच्या दुरूस्ती प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांनी पूर्ण केलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या दुरुस्तीची जबाबदारी आपण घेतली होती.

धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि औसा तालुक्यातील शेतकर्‍यांसह धाराशिव शहरालाही याचा मोठा लाभ होणार आहे.

स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी हे तिन्ही स्वतंत्र विभाग आहे. या तिन्ही विभागांची कार्यालये वेगवेगळ्या शहरात आहेत. त्यामुळे या तिन्ही विभागांकडून अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते. स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी यांच्यामध्ये समन्वय घडवून प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी त्याची तांत्रिक मान्यता मिळवून घेतली. या कार्यासाठीचा शासनादेश देखील काढण्यात आला आहे.

#निम्न_तेरणा #सिंचन

14/10/2024
14/10/2024

जिल्ह्यासाठी महायुती सरकारचा आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय..

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे नामकरण करण्याची सरकारकडून प्रक्रिया सुरू होती त्यानुसार जिल्ह्यातील ३ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे..

१) कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संतश्रेष्ठ संत गोरोबा काका यांचे नाव देण्यात आले आहे.

२) धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस थोर स्वतंत्र सेनानी, मराठवाडा मुक्ती लढा व संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे नेते, माजी विरोधी पक्षनेते उद्धवराव पाटील यांचे नाव देण्यात आले आहे.

३) तुळजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शिक्षण महर्षी, माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांचे नाव देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील संतांचा आणि भूमिपुत्रांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने आपल्या विनंती प्रमाणे महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल धाराशिवकरांच्या वतीने धन्यवाद !

#धाराशिव #कळंब #तुळजापूर #तुळजापूर

Address

Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaibhav punekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category