Katti Batti

Katti Batti Damini Jayshri Rajendra -
founder of Katti batti
• Theatre in Education
• story telling session
• Story Performance
• Drama Workshop

13/01/2025

"कट्टी-बट्टी" नाट्य कार्यशाळा

"कट्टी-बट्टी" वर्कशॉप: मुलांसाठी हसत-खेळत अनुभव!  "कट्टी-बट्टी" वर्कशॉपमध्ये लहान मुलांसाठी खास खेळ घेण्यात आले. या खेळा...
31/12/2024

"कट्टी-बट्टी" वर्कशॉप: मुलांसाठी हसत-खेळत अनुभव!

"कट्टी-बट्टी" वर्कशॉपमध्ये लहान मुलांसाठी खास खेळ घेण्यात आले. या खेळांमध्ये मुलांना वेगवेगळ्या कृतीतून सहभाग घेण्याची संधी मिळाली. मुलं बोलली, हसली, आणि मनसोक्त खेळली. प्रत्येक खेळाला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला.

पालकांनीही यापुढेही अशा उपक्रमांमध्ये मुलांनी सहभागी व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली.

#कट्टीबट्टी🎉👧👦 #मुलांचासहभाग🌟😊 #खेळमज्जा🎭🕊️ #मुलांसाठीकार्यक्रम🎬📚

01/12/2024

📚👦🏻👧🏻 🎭"कट्टी बट्टी": गोष्टी, नाटक, खेळ
https://www.facebook.com/share/p/1CwQWU4iyh/

https://www.instagram.com/p/DDCSpZKs9ff/?igsh=MWdwemVpbDAyMTNjYw==

📖👶 कट्टी बट्टी - जिथे गोष्टींवर आधारित छोट्या कृतींच्या माध्यमातून मुलं सहभागी होतात. कधी वाचलेलं इतरांना सांगतात, तर कधी गोष्टींवर चर्चा करतात. प्रत्येक उपक्रमात त्यांचा उत्साह दिसतोय. मुलांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम जिवंत होतोय. अधिकाधिक मुलांना या उपक्रमात सामील करून "कट्टी बट्टी"चा प्रवास चालू आहे. मुलांच्या रोजच्या शिकण्यात नाटक, गोष्टी, गप्पांची भर पडतेय.

तुमच्या लहानग्यांनीही या प्रवासाचा भाग व्हावं असं वाटतंय ना? मग आम्हाला आजच संपर्क करा!

#कट्टीबट्टी 📚🎉 #गोष्टींचंविश्व 📖✨ #खेळआणिगंमत 🎭🗣️ #मुलांचासंवाद 👧🏻👦🏻 #शिकतानामजा 🤹‍♂️😊 #मुलांसाठीकार्यक्रम 👫🌟

26/11/2024

📚🌟 "कट्टी बट्टी" – लहानग्यांचं वाचन आणि संवाद! 👦🏻👧🏻
https://www.facebook.com/share/p/15FSNRNLot/

https://www.instagram.com/p/DC1gxW-Mh0l/?igsh=MWIxMXhtbnd1MWx2OA==

"कट्टी बट्टी" या उपक्रमात मुलांना गोष्टी वाचताना मजा येते आणि गोष्ट वाचून ते त्याबद्दल चर्चा करतात, त्यांना आवडलेलं सांगतात आणि त्यांचे विचार मांडतात.

#कट्टीबट्टी 📖🎭 #गोष्टींचेजग 🌟 #नाटकआणिखेळ 🎭🤹‍♂️ #शिकण्याचीगंमत 🧠🎉 #संवादकौशल्ये 💬✨ #लहानमुलांचेहसू 😄

24/11/2024

🎭📖 "कट्टी बट्टी" – गोष्टी, नाटक आणि संवादाचा एक रंगतदार प्रवास! 🌟👦🏻👧🏻

"कट्टी बट्टी" च्या वर्कशॉप चा दुसरा दिवस संपला ज्याला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मुलांना गोष्टींच्या, नाटकाच्या माध्यमातून शिकण्याची आणि व्यक्त होण्याची संधी मिळते.

कार्यशाळेत दररोज मुलांसाठी खास गोष्टींची निवड केली जाते. ज्यात गोष्टींचा भाग म्हणून नाटकांचे खेळ खेळले जातात, जिथे मुलांना विविध पात्रं साकारायला मिळतात. हावभाव, आवाज आणि अभिनयातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आत्मविश्वास फुलतो. याशिवाय, मुलांना गोष्टींवर आधारित त्यांच्या मतांवर चर्चा करण्याची संधी दिली जाते.

हे सगळं गमतीशीर वातावरणात केलं जातं, जिथे मुलं खेळता खेळता शिकतात. जर तुम्हालाही तुमच्या लहानग्यांच्या आयुष्यात संवाद आणि आत्मविश्वासाची भर घालायची असेल, तर "कट्टी बट्टी"चा भाग बनण्यासाठी तयार व्हा! कारण"कट्टी-बट्टी" म्हणजे शिकणं मज्जेदार बनवणारी जागा! आणि मुलांच्या कल्पनांचा उत्सव!

#कट्टीबट्टी 📖🎭 #गोष्टींचेजग 🌟 #नाटकआणिखेळ 🎭🤹‍♂️ #शिकण्याचीगंमत 🧠🎉 #लहानमुलांचेहसू 😄

22/11/2024

https://www.facebook.com/share/p/17r746UuMP/

https://www.instagram.com/p/DCrP9NJMHPV/?igsh=MXduemxtcmp1aDVkbQ==

"Quest ने दिलेली शिदोरी - आणि क्रिएटिव्ह प्रवासाची सुरुवात!"

“Quest ने दिलेली शिदोरी घेऊन प्रवासाला सुरुवात केली आणि पहिला टप्पा परी, खुशी आणि त्रिशासोबत पार पडला! त्यांच्या उत्साहाने पुस्तकं वाचणं, रंगीबेरंगी चित्र काढणं यात वर्कशॉपचा पहिला दिवस खूप मजेदार ठरला!”

असं काहीतरी तुम्हीही शोधताय ना? मग वाट कसली बघताय?

• का निवडाल कट्टी-बट्टी?

🎨 कलात्मक प्रवास : पुस्तकांशी मैत्री, चित्रकला आणि विचारांना मूर्त स्वरूप देणारं ठिकाण.
🧠 बौद्धिक विकास: टीमवर्क, गप्पा आणि खेळ.
🌟 प्रत्येक वयोगटासाठी खास सत्रं: तुमच्या मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन सत्र तयार केली जातात.
🎯 प्रत्येक क्षण मजेदार : मजा आणि शिकण्याचं अनोखं मिश्रण.

• तुमची मुलं देखील पुस्तकं, कला आणि मज्जेत रममाण होतील, नव्या मित्रमैत्रिणींशी जोडली जातील आणि त्यांच्या कल्पनांना पंख मिळतील. कट्टी-बट्टी हे फक्त वर्कशॉप नाही, तर त्यांच्या कल्पकतेचं नवीन जग आहे!

• मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे रंग भरायचे आहेत? अहो मग "कट्टी-बट्टी" आहे ना ...जिथे मजा आणि शिक्षण हातात हात घालून चालतात! जिथे शिकणं होतं मजेदार, आणि मजा होते विचारप्रवृत्त! तुमच्या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी आणि त्यांना त्यांच्या क्षमतांची ओळख करून देण्यासाठी कट्टी-बट्टी शी संपर्क साधा!

QUEST या शैक्षणिक संस्थेची 'गोष्टरंग' ही फेलोशिप मार्च महिन्यात संपली. पण Quest ने मला दिलेली गोष्ट ही कधीही न संपणारी ग...
14/11/2024

QUEST या शैक्षणिक संस्थेची 'गोष्टरंग' ही फेलोशिप मार्च महिन्यात संपली. पण Quest ने मला दिलेली गोष्ट ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. त्यामुळे मी quest ची कायम ऋणी आहे. फेलोशीप संपल्यानंतर त्याच पठडीतलं काम करण्याची खूप ईच्छा होती. त्यामुळे गोष्टरंगपासून प्रेरित होऊन मी 'कट्टी बट्टी' हे नवीन प्लॅटफॉर्म सुरू करत आहे. ज्यामध्ये थिएटर वर्कशॉप, गोष्टींचे सादरीकरण, अभिवाचन या सगळ्या गोष्टी घेतल्या जातील.

फक्त अभ्यास एके अभ्यास असा रटाळवाना कार्यक्रम न करता हसूया, खेळूया, नाचूया, मज्जा करूया हा मंत्र लक्षात घेऊन अगदी हसत खेळत मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांच्यापर्यंत वाचन संस्कृती पोहोचवणे हा उद्देश घेऊन 1 ते 13 वर्ष वयोगटातील मुलांसाठी नवनवीन गोष्टींचे सादरीकरण केले जाईल. प्रत्येक वयोगासाठीची वेगवेगळी पुस्तकं घेऊन त्यातील गोष्टींचे नाट्यरूपांतर करून ते मुलांसाठी सादर केले जाईल. गोष्ट जितक्या इंटरेस्टिंग पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचेल तितकी मुलं पुस्तकं हाताळतील म्हणूनच सादर होणाऱ्या गोष्टीशी निगडित काही खेळ, ऍक्टिव्हिटी देखील घेतल्या जातील. आम्हाला तुमचा भरभरून प्रतिसाद अपेक्षित आहे. आम्ही उत्सुक आहोत तुमच्या बच्चे कंपनीसोबत धम्माल करण्यासाठी. तर...तुम्हाला तुमच्या इथे कट्टी बट्टीचे प्रयोग ठेवायचे असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधावा. चला तर मग... वाट कसली बघताय? आम्ही तयार आहोत पोतंभर गोष्टी घेऊन! आणि तुम्ही?

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Katti Batti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share