16/06/2025
एक वयस्कर माणूस म्हणजे एक लहान मुलं च असत. त्यांच्यातल्या कलागुणांना हळुवार गोंजारूनच बाहेर काढाव लागत. बॅगेवर स्वतःच्या हाताने चित्र रेखाटण्यात रमून गेलेले हे " Sahara care" मधील आजोबा आजी.
एखाद्या चित्रकारालाही लाजवतील अशी कलाकृती आज त्यांनी तयार केली. या सहारा कुटुंबातील सर्व सदस्य सत्तरी पार केलेले आहेत. काहीजण असाध्य अशा आजाराने ग्रस्त आहेत तरी या वर्कशॉप मध्ये त्यांनी उत्साहाने भाग घेतला.
सहारा केअर चे सर्वेसर्वा डॉ. रवींद्र सोनवणे त्यांच्या निरीक्षणाअंती असं म्हणाले कि, या वर्कशॉपच्या दरम्यान काही क्षणासाठी ही सर्व मंडळी एवढी मग्न झाली होती की ते त्यांचा आजारही विसरली.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून अशा प्रकारचे वर्कशॉप परत परत व्हावेत अशी डॉक्टरांची इच्छा आहे.
यासाठी coordinator म्हणून शिल्पा मेनन हिची मदत झाली व "ऊर्जा" च्या संपूर्ण टीमने ही हिरीरीने ह्यात भाग घेतला.