28/09/2024
कुणाच्या संकल्पनेतून उभे असलेल्या वास्तूला रंगरंगोटी केली म्हणजे त्यांची संकल्पना पुसली जात नाही ...
मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळात नाशिक मध्ये पंपिंग स्टेशनच्या जागेवर मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पहिलं शस्त्र संग्रहालय असलेलं स्मारक CSR फंडातून रुपये ०२ कोटी खर्च करून उभं केलं गेलं. यामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या कडील शिवकालीन शस्त्रे आणि वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. सत्ता बदला नंतर सदर वास्तूची दुरावस्था झाली होती.
शिवसेनेचे नगर सेवक यांच्या प्रयत्नातून पुन्हा त्याची डागडुजी करून नव्याने लोकांसाठी ते खुल केलं जाणार आहे .
पण हे सर्व होत असताना ज्यांच्या संकल्पेतून आणि प्रयत्नातून ही वास्तू उभी राहिली त्याचंच नाव पुसण्याचा डाव हे सत्ताधारी करत आहेत. मा. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते सदर वास्तूच उद्घाटन होणार आहे .
पण ज्यांच्या संकल्पेतून सगळं साकारलं त्यानाच डावल जातंय हे सुज्ञ नाशिककर कदापि सहन करणार नाही . एक नाशिककर म्हणून आम्ही ह्या गोष्टींचा निषेध करतो ..
- आपला सुज्ञ नाशिककर
Raj Thackeray MNS Adhikrut Devendra Fadnavis Amit Thackeray MNS Adhikrut Nashik