17/01/2026
रसिकहो...
YouTube Channel ला दिलेल्या
भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद..🍁
( ▶️LISTEN Thru Us SANDEEP MADANE )
मी संदीप मदाने
व्यवसायाने B'ness Consultant असलो तरीही
मनात नाटक, कविता, कादंबऱ्या खोलवर रुजल्याहेत
एक सुवर्ण काळ होता
ज्यावेळी मराठी माणूस साहित्याशिवाय
विशेषतः मराठी कादंबऱ्या, नाटकांशिवाय राहूच शकत नव्हता
हल्ली आयुष्याला आलेला Speed
त्यामुळे इच्छा असूनही
नाटकांचा, कवितांचा, साहित्याचा आस्वाद घेऊ शकत नाही
वि.वा.शिरवाडकर, गडकरी, पू.ल.देशपांडे, व.पू.काळे, कुसुमाग्रज, कानेटकर, तेंडुलकर, मतकरी, शिवाजी सावंत, गदिमा, पाडगांवकर, महानोर, ग्रेस, बहिणाबाई
किती नाव सांगता येतील
मग कल्पना सुचली..
शांपूची बॉटल घेण्याआधी सॅशे वापरून पहातो की नाही
त्याच धर्तीवर सॅशे बनवायचे
साहित्यातील कलाकृतींचे
थोडक्यात महत्त्वाचं, आशय सांगणारे...!
साहित्यातल्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी
चॅनलला भेट द्या...!