24/07/2022
सती(श)चं वाण ल्यालेला कवी!
-------------------
कंसू प्रीतम.
कुठल्या वाटेवर भेटलास? केवळ ख्यालीखुशालीचं
विचारलं नाहीस, मायेनं वास्तपुस्त,
शिदोरी सोडूनही दिलीस-
हे वारंवार होतं राहिलं,
व्यासपीठाशिवाय.
प्रत्येक भेट...
साहित्य हाच धर्म आणि साहित्य हेच जगणं,
न सांगताही, तुझ्या कृतीतून
शिकलो: कुठंकुठं नेऊन डकविल्यास कविता?
तुझं आवर्जून आवतण...
नवतीला सन्मान!
नवागत.
नाहीच तुझ्या दृष्टीनं.
तुझ्या वळचणीला राह्यला खूप आवडायचं.
परतफेड तुझ्याकडं नसायचीच;
नेहमी हात तुझा झोळीत, ठेवण्यासाठी
नाही, तर देण्यासाठी.
देणंच कसं माहित असतं,
एखाद्यास?
हरहमेशा पडलेला प्रश्न.
औचित्य म्हणून नाही विचारू शकत.
कोतेपण आड येतं का?
ठेंगूचं थिटंच पोतं,
नाही का?
वाहत्या झ-याला आपण वाह्यात म्हणतो.
वाह्यात प्रवाह सुघड करतो, त्याला
काय म्हणता येईल?
देणा-यानं देत जावं, घेणा-यानं घेत जावं.
हा व्यवहार नाहीच. सामाजिक.
समतोल कुठंय्?
बौद्धिक देवघेव तराजूविना असते!
अंतिमतः (नाही का?)
तू द्रष्टा खराच रे!
शरीरधर्मानुसार मृत्यू कदाचित्,
मात्र आत्मिक तू सोबत...
वाटाड्या!
मी नतमस्तक! शरणागत!! ऋणाईत!!!
___________
Consu Preetam.
Ramesh Sawant, यांच्या वॉलवरून.