Baithak

Baithak गप्पा, गाणी, गोष्टींची ... विचार, चर्चा, प्रश्नांची "बैठक"

Hello all baithakbaaj. Trust you are doing well.Two artists from Pune are starting a new initiative called Parichay and ...
25/02/2020

Hello all baithakbaaj. Trust you are doing well.
Two artists from Pune are starting a new initiative called Parichay and invited Bhushan Korgaonkar as their first season first guest. Do come, if you are in Pune.

10/01/2020

सर्व बैठकबाजांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
बैठक पॉप-अप मध्ये या वेळेस आम्ही शनिवार १८ जानेवारी रोजी 'हिडिंबा' हे नाटक घेऊन येतोय. महाभारतातल्या हिडिंबा आणि भीमाचे प्रसंग, आपल्याला जात, लिंग आणि सामाजिक उतरंडीच्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतील. पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे नक्की काय काय घडलं हे यात अलगद उलगडून दाखवायचा प्रयत्न आहे. पुराणातले आपल्या माहितीतले प्रसंग घेतल्यामुळे हे सगळं 'objectively' पाहता येईल असा विचार आहे. चेतन दातारचं 'माता हिडिंबा' आपल्यातल्या काही जणांनी पाहिलं असेल, तारा वनारसे यांची 'श्यामिनी' ही कादंबरीही काहींनी वाचली असेल. याच जातकुळीतलं पण त्यांच्याहून वेगळं असं हे नाटक इंग्रजीत सादर होणार आहे.
कलाकारांबद्दल:
बंगलोरला 'बिग फॅट कंपनी' ही 'प्लस साईझ' कलाकारांची कंपनी आहे. शारीरिक सौन्दर्याच्या पारंपरिक मापदंडाना आव्हान देत हे कलाकार आपलं म्हणणं कलेच्या माध्यमातून मांडत असतात.
श्रीकांत राव लिखित-दिग्दर्शित 'हिडिंबा' आपल्यासमोर एकहाती घेऊन येते अनुराधा एच. आर.
बंगलोर मध्ये कधीही लावणी वर्कशॉप किंवा 'संगीत बारी' चे प्रयोग असतील तर अनुराधाचा सुंदर, घरगुती स्टुडिओ - हे आमचं हक्काचं आणि प्रेमाचं ठिकाण असतं - राहण्याचं, रिहर्सलचं आणि कधी कधी प्रत्यक्ष कार्यक्रमाचंही!
त्यामुळे तिला आपल्या बैठकीत, पिरोजात बोलवायच्या संधीच्या आम्ही कधीपासून प्रतीक्षेत होतो.
कार्यक्रमाची रूपरेषा:
संध्याकाळी पावणेसात वाजता चहा येईल. नाटक ठीक सात वाजता सुरु होईल. नाटकानंतर श्रीकांत आणि अनुराधा यांच्याशी गप्पा होतील, 'हॅट' कलेक्शन होईल, चहाची अजून एक फेरी होईल आणि साडेआठच्या आसपास आपण एकमेकांचा निरोप घेऊ.
नक्की या, आम्ही वाट पाहतोय!

बैठक विथ आदिशक्तीती जेव्हा रंगमंचावर प्रवेश करते तेव्हाच जाणवतं की हे काहीतरी वेगळं आहे. आवाज, संगीत, अथक लयबद्ध हालचाली...
24/08/2019

बैठक विथ आदिशक्ती
ती जेव्हा रंगमंचावर प्रवेश करते तेव्हाच जाणवतं की हे काहीतरी वेगळं आहे. आवाज, संगीत, अथक लयबद्ध हालचाली, उड्या, शब्द, संवाद - एकेक गोष्टी घडत राहतात. आणि तुम्ही केवळ मंत्रमुग्ध होऊन बघत असता. कधी हसता, कधी नि:शब्द होता, कधी नाटकातल्या पात्रांसारखेच गोंधळून जाता आणि नाटक संपतं तेव्हा एक सुंदर कलाकृती अनुभवल्याचं समाधान, ती पूर्ण आकलन न झाल्याने थोडी हुरहूर, आणि म्हणूनच ती पुन्हा बघायची उत्सुकता अशा मिश्र भावनांनी तुम्ही भारून गेलेले असता.
'आदिशक्ती'च्या निम्मी राफेलने कुंभकर्ण आणि लक्ष्मण यांच्यातला हा संवाद रचला आहे. झोप या एका अत्यंत महत्त्वाच्या गरजेचे वेगळे पैलू अनुभवणारे हे दोघे. झोप नसल्याने किंवा खुप जास्त असल्याने नक्की काय घडत असेल? जे चाललंय ते खरं आहे की स्वप्न? कुठली बाजू खरी? किंबहुना खरं-खोटं, योग्य-अयोग्य हे कोण ठरवतं? असे बरेच प्रश्न काल आपल्या 'पिरोजा' स्टुडिओमध्ये रंगलेल्या या प्रयोगांतून उभे राहिले.
प्रकाशयोजना हा या नाटकाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग. तो उपलब्ध नसतानाही, शिवाय इतक्या जवळ बसलेल्या प्रेक्षकांसमोर हा प्रयोग करण्याचं आव्हान निम्मीने स्वीकारलं आणि तिच्यासाठीही हा एक नवीन प्रयोग ठरला.
हा 'बैठक पॉप अप' नव्या-जुन्या बैठकबाजानी आणि कलाकारांनी भरून गेला होता. चहापासून सुरु झालेल्या गप्पा, प्रयोगानंतर, निम्मी आणि आदिशक्ती चे Creative Director विनय कुमार याच्यासोबत अजूनच रंगत गेल्या.

As Adishakti binges on Mumbai VadaPav. Come meet them this evening at Piroja Studio, Vile Parle(E).
23/08/2019

As Adishakti binges on Mumbai VadaPav.
Come meet them this evening at Piroja Studio, Vile Parle(E).

Baithak anniversary session 2 with Shruti Vishwanath
05/08/2018

Baithak anniversary session 2 with Shruti Vishwanath

Baithak anniversary session 1 with Indrajeet khambe.
05/08/2018

Baithak anniversary session 1 with Indrajeet khambe.

All set to celebrate :) Happy Birthday Baithak 🙂
05/08/2018

All set to celebrate :) Happy Birthday Baithak 🙂

इंद्रजित खांबे एक नामांकित डॉक्युमेंटरी फोटोग्राफर आहे. संगणक दुरुस्तीचा व्यवसाय करता करता, डोक्यातला कलाकारीचा किडा काह...
26/07/2018

इंद्रजित खांबे एक नामांकित डॉक्युमेंटरी फोटोग्राफर आहे. संगणक दुरुस्तीचा व्यवसाय करता करता, डोक्यातला कलाकारीचा किडा काही स्वस्थ बसत नव्हता. नाटकाची वाट चोखाळताना कधीतरी कॅमेरा हाती आला, आणि इंद्रजितला नेमका पॉईंट सापडला. पहिलवान आणि दशावतार याचा काहीसा वेगळा दृष्टिकोन ठेवून त्याने केलेल्या कामाला पसंती मिळाली आणि हैदराबाद, पणजी, मुंबईपासून ते थेट इटली, जॉर्जिया, स्कॉटलंड, ऑस्ट्रेलियापर्यंतच्या फोटोग्राफी महोत्सवांमध्ये त्याच्या इमेजेस पोहोचल्या. त्याचा कॅमेरा आपल्या रोजच्या जगण्यातले छोटेछोटे अनुभवही टिपत असतो. फोटोग्राफी करण्यासाठी महागडे कॅमेरे आणि पर्यटन स्थळांची सफर करण्यासाठी पैसा लागतो अशी पारंपारीक मतं मोडीत काढून आपल्या आजूबाजूचीच माणसं, परिसर वेगळ्या नजरेतून पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि काही फोटो चक्क आपल्या साध्या मोबाईल फोनवरूनही काढले आहेत. या प्रत्येक फोटोमागची कहाणी सांगत इंद्रजित आपल्याला कोकण, कोल्हापूर, कलकत्त्याच्या मातीतले रंग दाखवणार आहे.

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!कला स्टुडिओत येत्या ५ ऑगस्टला अभंगांचे वेगळे रंग दाखवायला श्रुती विश्वनाथ येतेय. कर्नाटक संगीत...
23/07/2018

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

कला स्टुडिओत येत्या ५ ऑगस्टला अभंगांचे वेगळे रंग दाखवायला श्रुती विश्वनाथ येतेय.

कर्नाटक संगीताच प्रशिक्षण घेतल्यावर श्रुतिने संगीताचा अधिक व्यापक दृष्टीने अभ्यास सुरु केला. शास्त्रीय आणि लोकसंगीताच्या सीमारेषांवर खेळत ती विविध प्रांतांतल्या कवींच्या रचनांवर प्रयोग करून पाहत असते. महाराष्ट्रातल्या काहीशा दुर्लक्षित संतकवयित्रींच्या अनवट रचना तिला विशेष मोहित करतात. बायकांच्या, तेव्हाच्या आणि आताच्या जगण्यात श्रुतीला कमालीची साम्यस्थळं दिसतात. आणि त्यांचा कालातीत स्वर तिला अचंबित करतो.
समाजाच्या ठराविक स्तरात आणि भाषेत अडकलेलं अध्यात्म, वारकरी पंथाद्वारे, बहुजनांसाठी खुलं झालं. मराठी भाषेत अनेक अर्थपूर्ण, प्रवाही रचना केल्या गेल्या. सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांचा यात सहभाग होता.संत-पुरुषांचे अभंग आज मोठ्या प्रमाणात गायले जातात. पण संत-स्त्रियांचं साहित्य मात्र - तितकंच सकस असूनही - काहीसं दुर्लक्षिलं जातं. श्रुतीच्या मते, ती असा भेदाभेद न करता, दोन्ही प्रकार गाते. 'भक्ती'कडे आज एकाच अक्षातून पाहिलं जातं. वारकरी पंथातल्या संत-स्त्री साहित्यामुळे मात्र ही परिमाणं पूर्णच बदलून जातात.अभंगाच्या पारंपरिक चालींना स्मरून, कधी त्यांच्याशी तादाम्य पावत तर कधी त्यांच्या पलीकडे जात, तिने काही प्रयोग केले आहेत. इंडिया फाऊंडेशन फॉर द आर्टस् तर्फे तिला याच कामासाठी फेलोशिप मिळाली आहे. अनेक देशी-विदेशी संगीत महोत्सव गाजवून, वारकरी पंथावरच्या आपल्या या अभ्यासातल्या गंमती आपल्याला सांगायला आणि अर्थात अभंग आणि ओव्यांच्या शब्दांत आणि सुरांत आपल्याला भिजवायला ती सज्ज आहे. तुम्ही येताय ना?

Lokmat covers Hrishikesh Pawar, his work and Baithak
07/06/2018

Lokmat covers Hrishikesh Pawar, his work and Baithak

कथक शिकणारे मुलगे कमीच. तो मनापासून ही कला शिकला. विदेशात जाऊन त्यानं नृत्याचे धडे गिरवले. आणि आता परत आल्यावर तो क....

We will be on FB LIVE from 5pm. Stay tuned :)
03/06/2018

We will be on FB LIVE from 5pm. Stay tuned :)

Address

Zee Nayak, MG Road,Vile Parle (E)
Mumbai
400057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baithak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Baithak:

Share