12/01/2026
आजच्या दिवशी एक हजार वर्षांपूर्वी गझनीचा महमुद सोमनाथच्या दिशेने निघाला तेव्हा तेथील स्थानिक राज्यकर्त्याने माघार घेतली. (या स्वारीनंतर मात्र त्याने मोठे कर्तृत्व दाखवले.) त्यामुळे महमुदाच्या सैन्याची पुढची वाट सुकर झाली. मात्र मंदिराजवळ आल्यावर त्याने पाहिले, तर काय! तेथे पन्नास हजार हिंदू मिळेल त्या हत्यारांसह तेथे उभे होते. ते हिंदू काही कोणा राजाचे सैनिक नव्हते की काही नव्हते. त्यांनी त्यांना शक्य तेवढा पराक्रम गाजवला. मात्र अखेरीस महमुदाच्या सैन्याकडून त्या सर्वांची कत्तल झाली.
तेथील हिंदूंचा विरोध मोडून काढला गेल्यावर मंदिरातील पुजारी महमुदाकडे गेले आणि तुमचा हेतू लुटीचा असल्यामुळे आम्ही तुम्हाला तेथील मूर्तीच्या दुप्पट वजनाचे सोने देतो; मात्र तुम्ही मूर्तीला धक्का लावू नका. त्यावर महमुदाने सांगितले की त्याला मूर्तींचा विध्वंस करणारा म्हणजे बुतशिकन म्हणून प्रसिद्धी मिळवायची आहे. त्या सर्व पुजाऱ्यांचीही कत्तल झाली हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.
सोमनाथमधील ही शौर्ययात्रा कशासाठी आहे हे विक्रम संपत यांनी एनडीटीव्हीवर सांगितले.
तर मंडळी, बरोबर एक हजार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी यावेळी सोमनाथ मंदिराजवळ पन्नास हजार सर्वसामान्य हिंदू आपल्या धर्मरक्षणार्थ लढत आहेत. उद्यापर्यंत ते सर्वजण धर्मासाठी आपले प्राण गमावणार आहेत. हा सोमनाथासाठी त्याच्या सर्वसामान्य भक्तांनी उभा केलेला पहिला लढा. त्यानंतर अनेकदा अशी वेळ आली. कधी विजय; तर कधी पराजय, अशी ही बलिदानाची मालिका चालू राहिली.
आजच्या युगात या साऱ्यांचा काय संबंध असे वाटणाऱ्या हिंदूंमधील मुर्खांकडे दुर्लक्ष करा. हिंदू धर्मावर आघात करणाऱ्यांचा वेळोवेळी शक्य तेवढा प्रतिकार करणाऱ्या हिंदूंमुळेच आपण हिंदू म्हणून शिल्लक राहिलो आहेत याची त्यांना थोडीही जाणीव उरलेली नाही. तुम्ही काही सांगू पहाल, तर तिकडे दूर सोमनाथमध्ये जे झाले त्याचा आमच्याशी काय संबंध, असा दिव्य प्रश्न त्यांच्यातले अनेक नतद्रष्ट विचारायला कमी करणार नाहीत. मात्र आपल्या धर्मरक्षणासाठी बलिदान करणाऱ्या त्या हजारो अनामिक हिंदूंचे आपण तरी स्मरण करूया.