Kalpangan Sanskrutik Kendra

Kalpangan Sanskrutik Kendra Kalpangan Sanskrutik Kendra, Mumbai embarked upon its pursuit of perfection and propogation of perfo

Kalpangan Studio's is available on rent for rehearsals, photoshoot. Besides the traditional dance styles, Kalpangan offers training in Drawing, Painting, Writing and Oratory skills, Basics of dramatics and Music and aims for the all-round development of the students. Small Wonders of Kalpangan :
Successful is creating awareness and encouraging children to learn classical art forms in an economica

lly and artistically underpriviledged areas. Students selected for National Scholarship Programme, New Delhi. Successful in building its winning reputation at various National and International Competitions.
90 students are presently under different stages of learning.

Admissions Open ✨Begin your journey into the timeless art of Bharatanatyam—where rhythm, grace, and expression come toge...
05/01/2026

Admissions Open ✨
Begin your journey into the timeless art of Bharatanatyam—
where rhythm, grace, and expression come together.
📩 DM for class details.

25/11/2025

🌸सरस्वती पूजन - कल्पांगण सांस्कृतिक केंद्राच्या दरवर्षीच्या रिवाजाप्रमाणे या वर्षीही केंद्रामध्ये सरस्वती पूजनाचा कार्यक्रम साजरा झाला. त्यावेळी कल्पांगण सांस्कृतिक केंद्रातर्फे काही नृत्याविष्कार सादर झाले ते येथे सादर करीत आहोत ! 🌸

25/11/2025

सरस्वती पूजन - दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 'कल्पांगण सांस्कृतिक केंद्रामध्ये' सरस्वती पूजन झाले. त्यावेळीच्या काही नृत्यविष्कार येथे सादर करीत आहोत.

#

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग व पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे दि. ८ ते १२ नोव्हेंबर या काळात 'पु . ल. कला महोत्सवा...
14/11/2025

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग व पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे दि. ८ ते १२ नोव्हेंबर या काळात 'पु . ल. कला महोत्सवाचे' आयोजन केले होते, महोत्सवात कल्पांगण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती असलेल्या 'जावे पुलंच्या गावा' या आपल्या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर व जीवनावर आधारित नाटकाचे दि. ९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सादरीकरण झाले.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी (मुंबई) च्या रंगमंचावर पु . ल. कला महोत्सवात सादरीकरण करण्यास मिळणे ही आनंददायी बाब होती आणि त्यांनी जे सहकार्य केले त्यासाठी त्यांचे मन: पूर्वक आभार !!

13/11/2025

प्रेक्षक प्रतिक्रिया !!
📍पुढील प्रयोग : 14 नोव्हेंबर, शुक्रवार | सायंकाळी 6 वाजता |
रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक




❤️



13/11/2025

प्रेक्षक प्रतिक्रिया !!
📍पुढील प्रयोग : 14 नोव्हेंबर, शुक्रवार | सायंकाळी 6 वाजता |
रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक




❤️



10/11/2025

पु. ल. देशपांडेंच्या जयंतिदिनी कल्पांगण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती असलेल्या 'जावे पुलंच्या गावा' हे नाटक पाहिल्यावर उपस्थित रसिक प्रेक्षकांनी नाटकाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

❤️

पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीदिनी कल्पांगण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती असलेल्या 'जावे पुलंच्या गावा' ह्या नाटकाचा प्रय...
09/11/2025

पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीदिनी कल्पांगण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती असलेल्या 'जावे पुलंच्या गावा' ह्या नाटकाचा प्रयोग काल ८ नोव्हेंबर रोजी पु. ल. देशपांडे सभागृह, विलेपार्ले येथे सादर झाला. लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या सहकार्याने प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांनी नाटकाचे मनापासून कौतुक केले.
ज्यांच्या लेखनीतून विनोद, संवेदनशीलता आणि जीवनातील वास्तव यांचं सुंदर मिश्रण एकाच वेळी आपल्याला अनुभवायला मिळते, ज्यांनी माणसातील "साधेपणा" आणि "वेडेपणा" दोन्ही एकाच वेळी दाखवला आणि म्हणूनच त्यांचं साहित्य वाचताना आपण हसतोही आणि विचारातही पडतो. जे लेखनाबरोबरच एक उत्कृष्ट वक्ते, संगीतकार, अभिनेते आणि दिग्दर्शक होते असे आपले सर्वांचे लाडके 'भाई' म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या साहित्य आणि जीवनावर आधारित 'जावे पुलंच्या गावा' हे नाटक सादर करायला मिळणे आणि त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे या सारखे दुसरे भाग्य नाही.
पु. ल. देशपांडे यांचं योगदान म्हणजे मराठी संस्कृतीला मिळालेली एक अमूल्य संपत्ती. त्यांनी दाखवून दिलं की विनोद हा फक्त हसण्यासाठी नसतो, तो माणसाला समजून घेण्यासाठी असतो.

त्यांचं स्मरण म्हणजे केवळ साहित्यिक आदर नव्हे, तर “माणुसकी”चा उत्सव आहे.

ही संधी दिल्याबद्दल लोकमान्य सेवा संघ, पारले यांचे मन:पूर्वक आभार !!!










आजपासून महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्यातर्फे दिनांक ८ ते १२...
08/11/2025

आजपासून महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्यातर्फे दिनांक ८ ते १२ नोव्हेंबर या दरम्यान पु.ल. कला अकादमी (प्रभादेवी मुंबई) येथे 'पु.ल. कला महोत्सवाचे' आयोजन केले आहे.
पु.ल.‌ कला महोत्सव म्हणजे कलाकृतींची पर्वणी निश्चित असणार. या मध्ये आपल्या कल्पांगण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती असलेल्या 'जावे पुलंच्या गावा' ह्या नाटकाची निवड झाली आहे.
नाटकाचा प्रयोग हा दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पु.ल. कला अकादमी येथे सादर होणार आहे.

रसिक प्रेक्षकांना आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने ह्या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा.
सदर महोत्सवाचे वेळापत्रक हे पोस्ट केले आहे.
org75



#पुलकलामहोत्सव
#पुलदेशपांडे
#पुलांच्याजगात
#महाराष्ट्रसंस्कृती
#कला_आणि_संस्कृती
#महाराष्ट्रसरकार
#सांस्कृतिकविभाग
#कलेचेमहोत्सव














Address

Kalpangan Studio's, Gurukripa 30E/B, Nandadeep Everest Society, Shell Colony, Sahakar Nagar Road No. 4
Mumbai
400071

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpangan Sanskrutik Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Kalpangan Sanskrutik Kendra:

Share

Category