30/07/2026
तारक मेहता का उलटा चष्मा या प्रसिद्ध मालिकेचे चित्रीकरण मागील १८ वर्षांपासून दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये सुरू आहे. दिनांक २८ जुलै २०२६ रोजी या मालिकेला १८ वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने राज्याचे सांस्कृतिक सचिव डॉ.किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी मालिकेच्या सेटला सदिच्छा भेट दिली.