Abhishek Theatres

Abhishek Theatres Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhishek Theatres, Arts and entertainment, Mumbai.

Abhishek Theatres Is the Storytelling platform.We are consistent with what we create.since 20 years, we have produced and helped more than 100 Projects and we did secure 400+ Prizes and acclamation in the field of Performing Arts.

22/03/2020

आजची सकाळ वेगळीच...

आत्ताच्या वर्क फ्रॉम होम ह्या कल्पनेत तसे आम्ही येत नाही कारण स्वतःची कन्सल्टन्सी असल्याने आणि ऑफिस घरीच असल्याने आमचं वर्क फ्रॉम होम रोजचच असतं... ज्यांना सदा सर्वकाळ नोकरी निमित्ताने, काम धंद्याच्या निमित्ताने बाहेर जावेच लागते त्यांना मिळलेल्या ह्या सक्तीच्या सुट्टीचा आनंद आम्हाला घेता येत नाही.. त्यामुळे नेहमीप्रमाणेच आजचा दिवस सुरू झाला.. का कुणास ठाऊक पण इतर दिवसांपेक्षा आज अंमळ जरा लवकरच जाग आली.. नेहमीपेक्षा आजची सकाळ वेगळी वाटत होती, चहा घेऊन गॅलरीत आलो आणि विलक्षण गोष्ट अनुभवायला मिळाली, रोज गाड्यांचे आवाज, गाड्यांचे हॉर्न, माणसांची बडबड, शाळेत जाणाऱ्या मुलांचा चिवचिवाट ह्या सगळ्यांनी सुरुवात होणारी सकाळ आज मात्र वेगळीच भासत होती.. पंतप्रधानांनी जनता कर्फ्यु जाहीर केल्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे काहीच घडत नव्हतं, पण... आज विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण भारून टाकलं होतं.. रस्त्यावर माणूस नव्हता पण पक्षी स्वच्छंद पणे विहार करत होते, चिमण्या, कावळे, कबुतरं हे नेहमीचे पक्षी होतेच पण त्यांच्या बरोबरीने अनेकविध रंगांचे, आकारांचे पक्षी खुल्या हवेत भरारी मारताना दिसत होते.. आणि प्रश्न पडला, ह्या पक्ष्यांना आज नेमकं काय वाटत असेल ?... एका विषाणूमुळे जग थांबलय, म्हणजे माणूस थांबलाय, पण मोकळ्या वातावरणात उडण्याचा हा आनंद आपल्याला किती काळ घेता येईल असं वाटत असेल का त्यांना ?.. आज माणसं घराबाहेर नाहीत, गाड्या नाहीत म्हणून आपण मोकळेपणाने फिरतोय, पण हे स्वातंत्र्य किती काळासाठी असू शकेल ?.. ह्या माणसांनी आपलं जगणं किती कठीण करून टाकलं आहे असं वाटत असेल का ?.. माझ्या लहानपणी आताच्या सारखं प्रदूषण, गर्दी, वाहतूक नसायची तेंव्हा आम्ही लहान मुलं सुद्धा बिनधास्त सगळीकडे हुंदडायचो, रस्त्यांवर धावायचो, खेळायचो पण भीती वाटायची नाही कधी, पण हल्ली बदललेल्या परिस्थितीत आपल्या मुलांना ह्या सगळ्यांपासून किती जपावं लागतं ना आपल्याला ?.. असो.. सक्तीची का असेना पण ही "कैद" झालेली आहेच तर त्याचादेखील आनंद घ्या, आपल्या गॅलरीतून, खिडकीतून सकाळी हळूच डोकावून बघा, पक्ष्यांना स्वच्छंद विहार करताना बघण्याची संधी पुन्हा आपलं रुटीन सुरू झालं की नाही मिळणार कदाचित, तुम्ही बघा आनंद घ्या, आपल्या लहान मुलांना सुद्धा ह्या निमित्ताने पक्षी दाखवा, त्यांचा किलबिलाट ऐकवा, आणि फ्रेश व्हा...
- © आशीर्वाद मराठे

09/12/2019

आज संध्याकाळी 7 वाजता
"आय विटनेस"

59 वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, घाणेकर मिनी थिएटर, ठाणे अवश्य या..

चित्रपट माध्यमात संधी वाढत आहेत...पण या माध्यमात काही करून दाखवण्याची केवळ इच्छा असणे पुरेसे नाही तर त्याला शास्त्रशुद्ध...
08/11/2018

चित्रपट माध्यमात संधी वाढत आहेत...
पण या माध्यमात काही करून दाखवण्याची केवळ इच्छा असणे पुरेसे नाही तर त्याला शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही गरजेचे असते.
त्यासाठीच आम्ही घेऊन येतोय अभिराम भडकमकर मास्टर क्लास...
सुप्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार आणि सिनेमा लेखक, आणि 'बालगंधर्व' चित्रपटाचे लेखक, ' आम्ही असू लाडके' या अनेको महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर स्वतः देणार प्रशिक्षण सिनेमा लेखन तंत्राचं.. ते सुद्धा निसर्गरम्य वातावरणात, पुस्तकांचे गाव "भिलार" ह्या ठिकाणी..

अभिराम भडकमकर ह्यांच्या मास्टरक्लास मूळे ह्या तंत्राची दिशा मिळेल ह्याची नक्कीच खात्री आहे..

Abhiram Bhadkamkar's Masterclass- Dec 1st -4th. Pustakancha Gaon, Bhilar, Tal. Mahabaleshwar - REGISTER NOW

"अभिषेक थिएटर्स" ने "मराठी नाटक समूहाच्या" माध्यमातून आयोजित केलेल्या नाट्यलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आणि त्या...
08/10/2018

"अभिषेक थिएटर्स" ने "मराठी नाटक समूहाच्या" माध्यमातून आयोजित केलेल्या नाट्यलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आणि त्या निमित्ताने एक सुंदर चर्चासत्र "रंगसंवाद", ज्येष्ठ आणि अनुभवी मंडळींचे मार्गदर्शन..
गुरुवार दिनांक 11 ऑक्टोबर 2018, दुपारी 04.30 वा. , पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी.
रसिकांना, रंगकर्मीना, नाट्यलेखकांना आग्रहाचं आमंत्रण..
- मराठी नाटक समूह 🌹🙏🏻😊

30/06/2018

तुमचं तुमच्या मुलाकडे नीट लक्ष आहे का ?.. स्वतःच्या व्यवसायाच्या नादात मुलगा वाईट मार्गाला लागलाय हे कळत नाही का ?.. घरात एवढी सुख समृद्धी असताना साधे मुलावर संस्कार करायला वेळ नाही ?.. मुलगा इतका फुकट गेलाय तरी त्याच्यावर इतकं अतिरेकी प्रेम करूच कसे शकतात आईबाप ?.. हे आणि असे अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात येतात... जो पर्यंत आपण सहजसोपे, सावध आयुष्य जगत असतो तो पर्यंत असे प्रश्न पडणे एकंदर समाजव्यवस्था बघता चुकीचे देखील नाही.. पण,
हा पण खूप महत्त्वाचा आहे.. इतकं सगळं सुखात सुरू असताना देखील केवळ वाईट संगत, आईवडिलांविषयी असलेलं प्रेम आणि मुळातच स्वभावात उपजत असणारी बंडखोर वृत्ती ह्यामुळे वाईट मार्गाला एखादा मुलगा लागणं हे देखील नैसर्गिकच आहे.. अपवादात्मक परिस्थितीत असं होऊ शकतं.. मग अश्यावेळी अश्या विषयावर येणारी कलाकृती बघायची की नाही हा संभ्रम सुरक्षित, सुखासीन आयुष्य जगणाऱ्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो.. आता नुकताच आलेला "संजू"... संजय दत्त ह्या विचित्र मानसिकतेच्या कलाकारांच्या आयुष्यातील काही घटनांवर आधारित हा सिनेमा... क्षणभर हा सिनेमा संजय दत्त च्या आयुष्यावर आहे हे विसरून एका वाईट मार्गाने गेलेल्या मुलाची कथा म्हणून बघायचा प्रयत्न केला तर.. अरेच्या, हे असं कुठे असतं का ?.. काहीही दाखवतात सिनेमाच्या नावाखाली अशीही प्रतिक्रिया नक्कीच आली असती.. पण अनेक गोष्टी अपवादाने सिद्ध होतात तसं हा "संजू"... ह्या सिनेमात दाखवलेल्या घटना बघितल्यावर काय भयंकर होता हा मुलगा अशी प्रतिक्रिया येऊ शकते.. ह्या सिनेमामध्ये घेण्यासारखं काय आहे ?.. एका देशद्रोह्याने लावलेले दिवे काय बघायचे, नालायक माणूस तो.. वगैरे वगैरे.. अर्थात ह्या प्रतिक्रिया म्हणजे सिनेमा न बघणाऱ्यांच्या आणि आपण किती सच्चे देशभक्त(?) आहोत ह्याचं ओंगळवाणं प्रदर्शन मांडणाऱ्या काही विशिष्ट लोकांच्याच आहेत..
संजय दत्त त्याचं आयुष्य जगला, जगतोय.. खरं तर जे काही फायदा नुकसान झालं असेल ते त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांच्या बाबतीतील आहे.. आपण त्या भानगडीत का पडावं ?.. पण जेंव्हा देशाच्या सुरक्षेच्या आड एखादं कृत्य आलं की ती बाब सार्वजनिक होते.. त्यात सेलिब्रेटीच आयुष्य हे सार्वजनिकच असतं.. त्यामुळे त्यांच्या उठल्यापासून झोपेपर्यंतची प्रत्येक गोष्ट म्हणजे ब्रेक न्यूज असते.. असं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत एखादी संपूर्ण जग, देश हादरवणारी गोष्ट घडली आणि त्यात दुरून दुरून का होईना त्याचा संबंध आला की वाट लागलीच... वृत्तपत्रांना लोकांना चघळायला विषय द्यायचा असतो, मग प्रत्यक्ष काय घडलं काय नाही ह्याची शहानिशा न करताच विधान करायचं आणि शेवटी छोटंसं प्रश्नचिन्ह टाकायचं.. मानवी स्वभावानुसार दुसऱ्यांची लफडी वाचायची सवय असलेली मंडळी हे शेवटचे प्रश्नचिन्ह बदलून त्याचं विधान करतात आणि मिठमसाला लावून आणखी जोरदार फोडणी देतात.. आजसुद्धा देशद्रोही, अतिरेकी हे लेबल लावून मोकळं होतात.. पण संविधानानुसार त्या व्यक्तीने "शिक्षा" पूर्ण उपभोगलेली आहे हे सोयीस्कर पणे विसरतात.. मला नेहमी एक प्रश्न पडतो.. आपल्याला दुसऱ्याला बोलायचा अधिकार असतो का ?.. ज्याने आयुष्यात कधीच कुठलीच चूक किंवा गुन्हा केलेला नाहीये त्या व्यक्तीलाच हा अधिकार मिळू शकतो पण अशी एकतरी व्यक्ती ह्या पृथ्वीतलावर आहे का ?.. किंवा असू शकते का ?.. माझ्या माहितीत तरी नाही.. कारण प्रत्येकाच्या चुकीची किंवा गुन्ह्याची व्याख्या वेगवेगळी असते...
संजय दत्त चा मी फॅन नाही, त्याला आयडॉल करण्याचा हा प्रयत्न अजिबात नाही.. पण त्याच्या पापाची शिक्षा त्याने कायद्यानुसार भोगलेली आहे मग त्याला पुन्हा सर्वसामान्य माणूस म्हणून आयुष्य जगायचा अधिकार नाही का ?..
त्याने आयुष्यात काय नाही केलं हा प्रश्न आहेच.. दारू, अंमली पदार्थ सेवन, बायकांची लफडी, भीक मागणं, खोटं बोलणं, अंडरवर्ल्ड बरोबर संगत, बेकायदा शस्त्र बाळगणं, बेधुंद आयुष्य जगणं.. सगळं केलं त्याचं समर्थन होऊच शकत नाही, पण हे सगळं केल्यानंतरही त्याच्या पापाची शिक्षा त्याने कायद्यात राहून पूर्ण केल्यावरदेखील त्याला "दोषी"च ठरवणं हे चुकीचं वाटतं.. काल हा सिनेमा बघताना पिनड्रॉप शांतता होती इतके सगळे प्रेक्षक भारावून गेलेले होते..
आता हा सिनेमा राजकुमार हिराणी, विधू विनोद चोप्रा आणि अभिजात जोशी ह्या सुपरहिट त्रयीचा आहे म्हटल्यावर अपेक्षा उंचावलेल्या होत्याच, त्या हा सिनेमा बघितल्या नंतर ह्या तिघांनी यशाचं शिखर गाठल्याचा प्रत्यय आला..
रणबीर कपूर.. बर्फी, रॉकेट सिंग सारखे सिनेमा केल्यानंतर मध्यंतरी अत्यंत टुकार सिनेमे ह्याने केलेले आहेत, अरे एवढी गुणवत्ता ठासून भरलेली आहे तर असले सिनेमे हा माणूस का करतो असा प्रश्न पडायचा, पण "संजू" मध्ये संधी मिळाल्यावर सोनं केलंय.. पडद्यावर बघताना हा रणबीर नाही तर संजय दत्तच रोल करतोय इतका तो ही भूमिका जगलाय.. परेश रावल, विकी कौशल, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, जिम सरभ ह्यानी साकारलेल्या व्यक्तिरेखा सिनेमाला एका उंचीवर नेतात.. कथा, पटकथा, संवाद, संगीत, बॅकग्राउंड स्कोअर, अभिनय, दिग्दर्शन कशातच हा सिनेमा कमी पडत नाही.. बायोपिक असूनही सिनेमाचाच फील हा सिनेमा देतो हे ह्या सिनेमाचं मोठ्ठ वैशिष्ट्य आहे.. पण हा फील देतानाच अनावश्यक प्रणय दृश्य, हाणामारी, आयटम सॉंग ह्या मसाल्याची आठवण देखील येत नाही हे राजू हिराणीच कौतुक आहे..
वाईट मार्गाला गेलेल्या आणि आपल्या चुकांची, गुन्ह्याची शिक्षा भोगून नकारात्मक गोष्टींमधून बाहेर पडून सकारात्मक आयुष्य जगणाऱ्या एका मुलाची.. आपला आपल्या मुलावर विश्वास ठेवून खंबीरपणे शेवटपर्यंत साथ देणाऱ्या बापाची, इतक्या भानगडी करून देखील साथ न सोडणाऱ्या बायकोची आणि मैत्रीचे धागे घट्ट करणाऱ्या मित्राची आणि मित्र कसा नसावा हे देखील सांगणारी गोष्ट आवर्जून थिएटर मध्ये जाऊनच बघा... सिनेमा कसा असावा ह्याचा एक परिपूर्ण अनुभव मिळण्याची 100 टक्के खात्री देणारा असा हा "संजू"...
- आशीर्वाद मराठे

09/06/2018

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhishek Theatres posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Abhishek Theatres:

Share