13/10/2026
नमस्कार ठाणेकर!
येत्या १ नोव्हेंबरला, राम गणेश गडकरी रंगायतन मध्ये ‘प्रियारंग ’ प्रस्तुत एक खास सांगीतिक कार्यक्रम घेऊन मी तुमच्या भेटीला येत आहे.
या कार्यक्रमात माझ्यासोबत असणार आहे तुमचा लाडका कवी वैभव जोशी दादा, जो आपल्या अप्रतिम कवितांनी या संध्याकाळी रंगत आणणार आहे.
संगीत आणि कवितांनी सजलेली ही एक अविस्मरणीय संध्याकाळ असणार आहे.
यामध्ये मराठी भावगीतं, अभंग, नाट्यसंगीत, काही अजरामर गीतं आणि माझी स्वतःची गाणी असा सुरेल नजराणा मी तुमच्यासमोर पेश करणार आहे.
या कार्यक्रमाची तिकिटं BookMyShow वर उपलब्ध आहेत आणि ती वेगाने विकली जात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपली तिकिटं बुक करा.
तुम्हा सगळ्यांना भेटायला आणि तुमच्यासोबत ही सांगीतिक दिवाळी साजरी करायला मी खूप उत्सुक आहे.
लवकरच भेटूया ठाण्यात!
Book online tickets for Priyanka Barve and Vaibhav Joshi Live in Concert in Mumbai on BookMyShow which is a music-shows event happening at Ram Ganesh Gadkari Rangayatan: Thane