06/06/2026
‘ट्रायंगल ऑफ सक्सेस’
अर्थात चित्रपट यशस्वी करण्याचा यशाचा त्रिकोण: 'कंटेंट, डिस्ट्रीब्यूशन आणि मार्केटिंग'
(मागील लेखावरून पुढे)
प्रोड्युसर, सिनेमा हॉल्स, मार्केटिंग एजन्सीज आणि ऑडीयन्स हे जर चार स्वतंत्र रस्ते मानले, तर ह्या चारही मार्गांना जोडणारा चौक किंवा जंक्शन म्हणजे 'डिस्ट्रिब्युशन' होय!
कोणत्याही चित्रपटाच्या यशामध्ये डिस्ट्रीब्युशनचे महत्व असाधारण आहे. म्हणूनच सुजाण निर्माता वितरणाला योग्य न्याय देतो आणि त्यासाठी अनुभवी, जाणकार डिस्ट्रिब्युटरची नियुक्ती देखील करतो.
निर्माता आणि प्रेक्षक यांना जोडणारा दुवा असणाऱ्या डिस्ट्रिब्युटरला अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे पेलावे लागते; तो मल्टीटास्किंग करतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये, जसे की:
*मुंबई, महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारत क्षेत्रासाठी (टेरिटरी) हक्कांचे संपादन,
*तारीख, स्क्रीनची संख्या आणि वाटाघाटींसह चित्रपटाच्या प्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन,
*प्रदर्शनाबाबतची व्यूहरचना (रिलीज स्ट्रॅटेजी)
*चित्रपटगृहांचे शोजचे बुकिंग आणि इतर सिनेमाचे प्रदर्शन
तसेच समन्वयामध्ये महत्वाची भूमिका निभावणे
*उत्पन्न गोळा करणे (रेव्हिन्यू कलेक्शन)
*ओटीटी, पायरसी, स्क्रीन काउंट मधील गैरव्यवहार इत्यादी आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करणे.
*बॉक्स ऑफिस मधून जास्तीतजास्त उत्पन्न मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे.
वितरणाच्या दृष्टीकोनातून स्वातंत्रपूर्व काळात भारताचे एकंदर १४ विभाग निश्चित करण्यात आले असून, हे टेरिटरीज किंवा सर्किट्स पुढील प्रमाणे आहेत, जे आजही तसेच अबाधित आहेत:
• मुंबई
• दिल्ली-उत्तर प्रदेश
• सी.पी. बेरार (मध्य प्रांत आणि बेरार)
• सी.आय. (मध्य भारत)
• पूर्व पंजाब
• राजस्थान
• बिहार-नेपाळ
• निझाम
• आंध्र प्रदेश
• म्हैसूर
• केरळ
• बंगाल
• आसाम
• ओरिसा
सिनेमा 'वाजवायचा' असेल तर वितरकाला वरील प्रत्येक सर्किट बाबत सखोल माहिती असणे आवश्यक आहे किंवा ज्या-त्या सर्किटमधील विश्वासू आणि जाणकार लोकांशी त्याचे कनेक्ट्स असणे गरजेचे आहे.
लवकरच संपन्न होणाऱ्या 'सिने संस्कार' ह्या कार्यशाळेत ‘ट्रायंगल ऑफ सक्सेस’ वर सविस्तर सादरीकरण होणार आहे. प्रत्यक्ष व्यवहारातील उदाहरणे आणि केस स्टडीज् चा आधार घेऊन निर्मिती, विपणन आणि वितरण या तिन्ही पैलूंवर विस्तृत मार्गदर्शन केले जाईल. नवोदित निर्मात्यांबरोबरच सिनेसृष्टीशी निगडित व्यवसायिकांना त्याचबरोबर इतर नवीन व्यवसायिक संधीसाठी हा कार्यक्रम सर्वार्थाने उपयुक्त ठरेल.
'सिने संस्कार' विषयी अधिक माहिती पुढील लेखामध्ये अवश्य वाचावी.
- डॉ. अजय फुटाणे
फिल्म डिस्ट्रिब्युटर अँड फिल्ममेकिंग कन्सल्टंट (मुंबई/पुणे)
फोन: ९४२२३६२५०५