10/09/2020
भाजपा सरकारच्या काळात जेव्हा बालयोगी महाराजांचा आश्रम पाडण्याचा निर्णय झाला होता तेव्हा आम्ही आदरणीय मिलिंद भाऊंच्या अध्यक्षतेखाली वारकर्यांना सोबत घेऊन त्या निर्णयाविरोधात जाहीर पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवला होता. आंदोलनं सुद्धा झालीत. त्या पत्रकार परिषदेतचा काही भाग मी माझ्या युट्युबवर पण टाकला. सरकारवर ताशेरे ओढले. पण कोणी माझ्या घरावर कींवा भाऊंच्या कार्यालयावर बुलडोजर चालवले नाही. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त कंगनाचे कार्यालय अनधिकृत नाही हे आपण जाणतोच. खरी समस्या काय आहे? प्रजासत्ताक देशात ही सरळ सरळ चेतावणी आहे," हमसे पंगा लोंगे तो यही अंजाम होगा."
प्रश्न कंगना चुक आहे की बरोबर आहे हा नाहीच. प्रश्न हा आहे की अशा "हरामखोर" (संजय राउत साहेबांच्या अर्थाने) बाईवर तुम्ही अचानक कार्यवाही का करताय? धमक्या काय देताय? बरं फक्त कंगनाच आहे का? गेल्या काही महीन्यांमधे आघाडी सरकारच्या विरोधात लिहीणार्यांवर युध्दपातळीवर कार्यवाह्या झाल्यात. वरून आघाडी सरकार समर्थक समाजमध्यमांवर दात विचकवटून आनंदोत्सव पण साजरा करताना दिसले. मरकजवर बोलला कर कार्यवाही, प्रशासनावर बोलला कर कार्यवाही, शिवसेनेवर बोलला कर टक्कल, आव्हाडांवर बोलला ने बंगल्यावर. चुक करणार्याला शिक्षा व्हायला हवी हे आम्ही मानतो आणि समर्थन पण करतो पण चुका दोन्हीकडून होत आहेत ना! मग कार्यवाही एकीकडेच का? योगी आदीत्यनाथ एका मठाचे महंत आहेत. नाथपंथी लोकांसाठीच नव्हे समस्त हिंदू समाजासाठी ते आदराचे पद आहे मात्र त्यांच्यावर टीका करताना काही निच लोक मठ, भगवा, योगी ऐवजी भोगी आणि तत्सम हिंदू प्रतिकांचा अत्यंत अश्लाघ्य भाषेत उपयोग करून टीका करत आहेत. तुम्ही मुद्द्यांवर बोला ना! काही महानुभाव संघ भाजपावर टीका करताना एक शिवी वापरतात "गायघाले" .... एवढा प्रचंड सांस्कृतिक द्वेष? त्या बिचार्या गायीने तुमचं काय वाकडं केलं? बरं यावर तक्रार करावी तर पोलिसांकडून पण सहकार्य होत नाही. एका केससाठी संपूर्ण ताकत ओतावी लागते.
सामाजिक न्यायाच्या आणि समानतेच्या गप्पा मारताना सामाजिक समानता कशासोबत खातात याचे ज्ञानही असावे. तुमचं राजकारण ठीक आहे पण ह्या सुडबुद्धीच्या कार्यवाह्या लोकांमधे दहशत पसरवण्याचे एक साधन आहे. मौलाना साद ला 'राजाश्रय' देणार्यांना इतर लोकांवर कार्यवाह्या करण्याचा नैतिक अधिकार नाही. जर अनधिकृत बांधकामाबद्दलच बोलायचं झालं तर महाराष्ट्रात अफजल खानाच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकामाहून मोठं अनधिकृत बांधकाम नाही. आपली 'मराठी अस्मिता' जरा तिथे दाखवा. (भाजपाने पाच वर्ष काय केलं हा प्रश्न भाजपा कार्यालयात जाऊन विचारा. आम्ही भाजपा विरोधी आंदोलने केली आहेत.) "आपलं ठेवावं झाकून दुसर्याचं बघावं वाकून" असला हरामखोर पणा( परत संजय राउतांच्या भाषेतला अर्थ घ्यावा ) करू नका. ये पब्लिक है ये सब जानती है।
जय श्रीराम जय हिंदूराष्ट्र
हर हर महादेव।
✍ सचिन पाटील.