_r_tistic.gallery

_r_tistic.gallery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from _r_tistic.gallery, Art, Mumbai.

Combination : Flavour with Colors.. ❤️
02/09/2022

Combination : Flavour with Colors.. ❤️

26/08/2022
शिव शंभो..!!❤❤
07/04/2021

शिव शंभो..!!❤❤

अष्टविनायकतला *आठवा गणपती* :*"रांजणगाव चा श्री महागणपती"*🤔 *"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल...
22/08/2020

अष्टविनायकतला *आठवा गणपती* :
*"रांजणगाव चा श्री महागणपती"*

🤔 *"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔
महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. .
🤔 *श्री महागणपती हे रूप आणि मंदिर नक्की आहे तरी कसं..?* 🤔
मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. श्री महागणपतीला कमळाचे आसन आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत.
गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात.
असं म्हणतात, मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे.

😍 *बाप्पाची गोष्ट* 😍 :
आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, "यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने "प्रणम्य शिरसा देवम्‌' या श्‍लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला "त्रिपुरी पौर्णिमा' म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते..
❤️ असं ह्या आपल्या लाडक्या बाप्पाचं हे आठवे रूप ❤️
❤️ *आठवे दर्शन सुफल संपूर्ण* ❤️
🙏 *श्री महागणपती नमः* 🙏 @ Majha bappa / माझा बाप्पा

अष्टविनायकतला *सहावा गणपती* :*"लेण्याद्री चा गिरिजात्मक"*🤔 *"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गि...
21/08/2020

अष्टविनायकतला *सहावा गणपती* :
*"लेण्याद्री चा गिरिजात्मक"*

🤔 *"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔
लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते.

🤔 *श्री गिरिजात्मकाचे हे रूप आणि मंदिर नक्की आहे तरी कसं..?* 🤔
या मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केल्या जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.
असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.

😍 *बाप्पाची गोष्ट* 😍 :
गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले.पार्वतीने आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून लेण्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्या केली. मन एकाग्र व्हावे म्हणून मातीची बालमूर्ती बनवली. याच मूर्तीची अनन्यभावाने सेवा केली. पार्वतीच्या भक्तीला यश येऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रकट झाले, तो हा गिरिजात्मज, असे सांगितले जाते. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला.
गिरीजा म्हणजे पार्वती, आत्मज म्हणजे मुलगा.
असे म्हणतात, की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला.

❤️ असं ह्या आपल्या लाडक्या बाप्पाचं हे सहावे रूप ❤️
❤️ *सहावे दर्शन सुफल संपूर्ण* ❤️
🙏 *श्री गिरिजात्मकाय नमः* 🙏 @ Majha bappa / माझा बाप्पा

अष्टविनायकतला *पाचवा गणपती* :*"थेऊर चा श्री चिंतामणी"*🤔 *"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्याती...
20/08/2020

अष्टविनायकतला *पाचवा गणपती* :
*"थेऊर चा श्री चिंतामणी"*

🤔 *"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔
चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे.

🤔 *श्री चिंतामणीचे हे रूप नक्की दिसतं तरी कसं..?* 🤔
श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे..
🧐 इतिहास :🧐
गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले.
युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.

😍 *बाप्पाची गोष्ट* 😍 :
आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेंव्हा गणासूराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेंव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासूराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला.
गणपतीने गणराजाला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिला. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेंव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला 'कदंबपूर' असेसुद्धा म्हणतात.

❤️ असं ह्या आपल्या लाडक्या बाप्पाचं हे पाचवे रूप ❤️
❤️ *पाचवे दर्शन सुफल संपूर्ण* ❤️
🙏 *श्री चिंतामणी नमः* 🙏. @ Majha bappa / माझा बाप्पा

अष्टविनायकतला *चौथा गणपती* म्हणजे :*"महड चा श्री वरदविनायक"*🤔 *"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔वरदविनायक मंदिर रायगड जिल्ह्...
19/08/2020

अष्टविनायकतला *चौथा गणपती* म्हणजे :
*"महड चा श्री वरदविनायक"*

🤔 *"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔
वरदविनायक मंदिर रायगड जिल्ह्यातील खोपोली या गावा जवळ, खालापूर तालुक्यातील महड या गावात आहे.

🤔 *श्री वरदविनायकाचं हे रूप नक्की दिसतं तरी कसं..?* 🤔
वरदविनायकाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे.
या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.
पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.

😍 *बाप्पाची गोष्ट* 😍 :
आख्यायिकेनुसार कौन्डीन्यपूरचा सम्राट भीम आणि त्याची राणी यांना मूल नव्हते. ऋषी विश्वामित्र हे जंगलात तपस्या करीत होते. त्यांना भेटायला ते दोघे गेले. तेव्हा विश्वामित्र यांनी त्यांना एकाक्षर गणेश मंत्र त्यांना दिला. त्या मंत्राच्या जपामुळे त्यांना रुक्मंद नावाचा सुपुत्र झाला. राजकुमार रुक्मंद लवकरच लहानाचा मोठा झाला.
राजकुमार एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचक्नवी यांच्या आश्रमात राहिला. तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमार रुकंद याच्या प्रेमात पडली. पण राजकुमाराने तिचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला आणि तो आश्रम सोडून निघून गेला. मुकुंदा राजकुमारासाठी झुरत असलेली पाहून इंद्राने रुक्मंद याचा वेश धारण केला आणि तो मुकुंदाकडे गेला. त्यातून मुकुंदाला दिवस गेले आणि तिने ग्रीत्सम्द नावाच्या मुलाला जन्म दिला. ग्रीत्सम्द याला जेंव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेंव्हा तो आपल्या आईला शाप देतो आणि पुष्पक अरण्यात जाऊन तपस्या करू लागतो. त्याच्या तपाने गणपती प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो की त्याला एक अतिशय धाडसी मुलगा होईल ज्याला केवळ भगवान शंकर हरवू शकतील.
ग्रीत्सम्द याने गणपतीला तेथेच कायमचा निवास करण्यास सांगितले आणि ब्रम्हज्ञान देण्याची विनंती केली. आज त्या जंगलाला भद्रका असे म्हणतात. ग्रीत्सम्द याने त्या जागी गणपतीचे मंदिर बांधले आणि तिथे स्थापना केलेल्या गणपतीला वरदविनायक म्हणतात.
❤️ असं ह्या आपल्या लाडक्या बाप्पाचं हे चौथं रूप ❤️
❤️ *चौथं दर्शन सुफल संपूर्ण* ❤️
🙏 *श्री वरदविनायकाय नमः* 🙏
#तो येतोय ❤️ @ Majha bappa / माझा बाप्पा

अष्टविनायकतला *तिसरा गणपती* म्हणजे :*"पालीचा श्री बल्लाळेश्वर"*. "कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔बल्लाळेश्वर (पाली) हे रायग...
18/08/2020

अष्टविनायकतला *तिसरा गणपती* म्हणजे :
*"पालीचा श्री बल्लाळेश्वर"*.
"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔
बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.

🤔 *बल्लाळेश्वराचं हे रूप नक्की दिसतं तरी कसं..?* 🤔
एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची तीन फुट उंच मूर्ती स्थित आहे.
ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी(backside) चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडीत आहे.
हे मंदिर अशाप्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सुर्याद्याच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात.
साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे *गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य* दाखवला जातो.😇.
❤️ असं ह्या आपल्या लाडक्या बाप्पाचं हे तिसरं रूप ❤️
❤️ *तिसरं दर्शन सुफल संपूर्ण* ❤️
🙏 *श्री बल्लाळेश्वराय नमः* 🙏
#तो_येतोय 😍 #बाप्पा # गणपती fever
@ Majha bappa / माझा बाप्पा

अष्टविनायकतला *दुसरा  गणपती* म्हणजे :*"सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर"*. 🤔 *"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔सिद्धटेक (सिद्धेश्व...
17/08/2020

अष्टविनायकतला *दुसरा गणपती* म्हणजे :
*"सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर"*.
🤔 *"कुठे आहे बरं हा गणपती..?"* 🤔
सिद्धटेक (सिद्धेश्वर) हे अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा *सिद्धिविनायक* अष्टविनायकांपैकी *उजव्या सोंडेचा एकमेव गणपती* आहे.

🤔 *सिद्धेश्वराचं हे रूप नक्की दिसतं तरी कसं..?* 🤔
सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच असून पितळेच्या चौकटीत स्थित आहे. . ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. लागते. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे.
असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.

😍 *बाप्पाची गोष्ट* 😍
जेव्हा ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने “ॐ” काराचा अखंड जप केला. त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्याच्या इच्छेला पुर्णत्वास जाण्याचा वर दिला.. जेंव्हा ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करीत होता तेंव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले. विष्णूच्या कानातून मधु आणि कैतभ हे दैत्य निर्माण झाले. ते देवी-देवतांना छळू लागले. ब्रम्हदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो, विष्णूने प्रयत्न केले पण तो त्यांना मारू शकला नाही.
तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरु केले. शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले, तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकराने त्याला *“ॐ गणेशाय नमः”* या मंत्राचा जप करावयास सांगितला. हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधु आणि कैतभ या दैत्यांचा संहार केला.

असं ह्या आपल्या लाडक्या बाप्पाचं हे दुसरं रूप ❤️
❤️ *दुसरं दर्शन सुफल संपूर्ण* ❤️
🙏 *श्री सिद्धेश्वराय नमः* 🙏.
#तो_येतोय 😍 #बाप्पा # गणपती fever

अष्टविनायकतला *पहिला गणपती* म्हणजे :*"मोरगांवचा श्री मोरेश्वर."*. पुण्यापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या...
16/08/2020

अष्टविनायकतला *पहिला गणपती* म्हणजे :
*"मोरगांवचा श्री मोरेश्वर."*.
पुण्यापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गावी *'कऱ्हा नदीच्या काठावर'* श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे... .
मयूरेश्वराचं हे रूप नक्की दिसतं तरी कसं..?* 🤔
गाभाऱ्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, *डाव्या सोंडेची* , उत्तराभिमुख अशी आकर्षक आहे.
मूर्तीच्या डोळ्यांत माणिक व नाभीत हिरा आहे.
मस्तकावर नाग फणा दिसतो.
मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूस रिद्धी (बुद्धी) आणि सिद्धी (क्षमता) पितळी मूर्ती असून, पुढे मूषक व मयूर आहेत..
🙏आख्यायिका (गोष्ट ) : 🙏.
मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा आणि त्याची राणी उग्रा हे मुल नसल्यामुळे दुःखी होते. त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वादस्वरूप राणीला दिवस गेले. परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. समुद्रात जन्म पावल्याने मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणाऱ्या सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदि देवांवर आक्रमण केले. मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले. यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याचठिकाणी सिंधूचे मुंडके पडले...🧐🤓🤩.
असं ह्या आपल्या लाडक्या बाप्पाचं हे पहिलं रूप ❤️
❤️ *पहिलं दर्शन सुफल संपूर्ण* ❤️
🙏 *श्री मोरेश्वराय नमः* 🙏.
#बाप्पा
@ Majha bappa / माझा बाप्पा

❤️ भारत हमको जान से प्यारा है ❤️ ❤️Happy Independence Day❤️ ❤️ जय हिंद ❤️ ...जात-धर्म -पंथ जरी वेगवेगळे असले तरी ते एका ...
15/08/2020

❤️ भारत हमको जान से प्यारा है ❤️
❤️Happy Independence Day❤️
❤️ जय हिंद ❤️ ...
जात-धर्म -पंथ जरी वेगवेगळे असले तरी ते एका धाग्यात बांधले गेले आहेत, and तो धागा म्हणजे आपला तिरंगा 🇮🇳 ह्या सगळ्या गोष्टी येण्याअगोदर आपण आधी 'भारतीय' आहोत आणि त्याचा गर्व सगळ्यात जास्त असला पाहिजे.. 🙌 .
❤️ गर्व से कहो हम भारतीय है ❤️
#व्यर्थ न हो बलिदान ❤️. . . . . . .
🧡🤍🤍💙💚.



✨ 🦋 ❤️ 💫
handmade✍️

कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो.. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवर्णाचा" आणि ...
12/08/2020

कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो..
कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवर्णाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो.
श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील (refers to a fortnight or a lunar phase in a month of the Hindu lunar calendar.)
अष्टमी तिथीला मध्यरात्री 'रोहिणी नक्षत्रावर' श्रीकृष्णाचा जन्म झाला.
त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो.
महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते. . 😇😍.
"वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥" ❤️.

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when _r_tistic.gallery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category