06/06/2026
Special Order of Handmade Dwarf Kingfisher
for Rupa Tai & Ajinkya Sir🪶🥰
रूपा ताईंना तुषारकडून माझी आणि कागज़गार या माझ्या पेजची माहिती आधीपासूनच होती. एकदा त्यांनी माझी इंस्टास्टोरी पाहून विचारलं होतं, 'तुमच्या घरी हे पक्षी आहेत का?'
मी कागज़गार पेजवर कागदी 3D पक्ष्यांच्या पोस्ट टाकत होते.
एक दिवस रूपा ताईंचा मेसेज आला , 'मला एक खंड्या पक्षी बनवून हवा आहे, जमेल का?' आम्ही लगेच होकार दिला.
रूपा ताईंचे मिस्टर, अजिंक्य सर. हे पक्षी अभ्यासक आणि उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. त्यांनी त्या खंड्या पक्ष्याचे फोटो टिपण्यासाठी कित्येक तास वाट पाहिली होती, खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे तो पक्षी त्यांच्या मनाच्या खूप जवळचा होता. रूपा ताईंना तो कागदी खंड्या बनवून अजिंक्य सरांना सरप्राईज गिफ्ट द्यायचं होतं.
हा खंड्या तसा पाहण्यातला नव्हता, Dwarf Kingfisher (तिबोटी खंड्या) होता. चिमणी, कावळा यांसारखे पक्षी आपण नेहमी पाहतो; पण हा विशिष्ट पक्षी फारसा सहज दिसत नाही. त्यामुळे तो साकारण्यासाठी मला त्याचा थोडा अभ्यास करावा लागला. रूपा ताईंनी अजिंक्य सरांनी स्वतः काढलेले सुंदर फोटो संदर्भासाठी पाठवले होते, त्यांचा खूप उपयोग झाला.
तो खंड्या पूर्ण झाल्यावर मला स्वतःलाच खूप आनंद झाला. आणि जेव्हा आम्ही तो रूपा ताईंकडे देण्यासाठी गेलो, तेव्हा रूपा ताई आणि अजिंक्य सर दोघांनाही तो मनापासून आवडला. विशेष म्हणजे, तो काळ खंड्या दिसण्याचा हंगाम होता. त्यामुळे जणू काही खरा खंड्याच त्या काळात Mr. & Mrs. दंताळे यांच्या घरी पाहुणा म्हणून आला होता!
रूपा ताई, माझ्यावर आणि कागज़गारवर विश्वास दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपली भेट जरी धावती झाली असली, तरी खूप आनंददायी होती. लवकरच पुन्हा भेटूया.