06/03/2025
इंद्रधनुचा 'धनु' हरपला
धनंजय जोशी यांचे दुःखद निधन
एवढ्याश्या शब्दात तुमचं कार्य सामावणार नाही याची आणि तुमचा एकेरी उल्लेख करण्याची माझी पात्रता नाही या दोन्हीची जाणीव आहे म्हणुन हा लेखन प्रपंच.
आज फक्त तुमचं निधन झालं नाही तर इंद्रधनुचा 'धनु' हरपला असच म्हणावं लागेल. खरंतर कलाकारांनी टायमिंग साधव हा रंगभूमीचा संस्कार पण तुमच्या एक्झिट चे टायमिंग मात्र चुकलं.
पडदा अजून पडलेला नसताना, रंगमंचावरच्या लाईट चा स्पॉट तुमच्यावर असताना, प्रेक्षकांच्या हातून टाळी पडलेले नसताना तुम्ही एक्झिट घ्यावी हीच गोष्ट मनाला चटका लावून जाते आहे.
खरंतर इंद्रधनु कलाविष्कार संस्था, मिरज
माझ्या आणि माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्याला आणि आमच्या सो कॉल्ड अभिनय कारकिर्दीला पहिली ओळख आणि व्यासपीठ देणारं नाव म्हणजे इंद्रधनु कलाविष्कार संस्था, मिरज.
मी आणि माझ्यासारखे कित्येक तुमचं बोट धरून रंगभूमीवर आले.
ही संस्था म्हणजे पुलंच्या रावसाहेबांच्या भाषेत गाणी गीणी करणारी पण संस्थेच्या घटने नुसार सांस्कृतिक कार्यक्रमांना वाहिलेली संस्था.
या संस्थेचा प्राण तुम्ही होतात
आज जे यश इंद्रधनु ने गेल्या काही वर्षात सांगली मिरज विभागात मिळवलं त्याच श्रेय इंद्रधनुच्या 'धनुला' जातं.
उत्तम लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, निवेदक, स्टँड अप कॉमेडियन, रेडिओ जॉकी हे आणि असे अगणित पैलू तुमच्या व्यक्तिमत्वाला होते.
तुम्ही सर्वार्थाने एक शो रनर होता.
तुमच्या जाण्यानी जी हळहळ मी आज लोकांत बघितली
जी पोकळी माझ्या मनाला जाणवली त्यावरून तुम्ही फक्त कलाकार म्हणून नव्हे तर माणूस म्हणून ही किती दिलदार होता याची प्रचिती आली.
खरतर झाकीर खान म्हणतो की
"दो-चार ख्वाब है मेरे
जिन्हें में आसमान से दूर चाहता हूं
जिंदगी गुमनामसी कटे
मौत में मशहूर चाहता हूं"
आज जेव्हा आजुबाजूला लोकांच्या डोळा पाणी आणि ओठांवर तुमचं नाव ऐकलं तेव्हा या ओळींचा अर्थ कळला.
माझा गेलेला आत्मविश्वास परत आणून देण्याला,
कलाकार म्हणून मीही काहीतरी बरं करू शकतो या पातळी पर्यंत येण्याला आणि मी आज जे काही लहान-मोठ ,बरं-वाईट काम करतो आहे त्या सगळ्याच श्रेय सर्वस्वी तुम्हाला जातं.
कारण तुम्ही जर बोटाला धरून प्रसंगी ओरडून गोष्टी शिकवल्या नसत्या तर मीही आज गर्दीचा भाग असतो.
आज तुम्हाला श्रद्धांजली वाहताना लेखणी अडखळते आहे
डोळे भरून येत आहेत.
But as you always said, believed and acted
"SHOW MUST GO ON"
भावपूर्ण श्रद्धांजली सर
Hope you are in a better place ♥️