07/03/2023
रंग🌈
त्या रंगांच्या खेळात मी रमून गेलो होतो.
त्या वेळेस या उनाड मनास कसलेच भान नव्हते. ना आणखी काही सुचत होते. फक्त ते सुखद क्षण अनुभवायचे होते, जगायचे होते. अनेक सान-थोरांचे हात गालावर स्पर्श करत रंगांचं महत्व समजावत होते.इतकं सर्व सभोवताली आनंददायी वातावरण होत.पण काही तरी आपल्या हातुन निसटत आहे असे भासत होते. एवढा धिंगाणा घालूनही मन मात्र कसल्यातरी शोधात गोंधळलेले आहे. हे जाणवत होते पण ते ना उमजावेसे असे काहीसे.
काही घटिका सरल्या थोडा डोक्यावर ताण दिला. क्षणात जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. त्यात सर्व काही खुप अविस्मरणीय होत. ते माझ्या आयुष्य भराची सोबत बनुन माझ्या सोबत होतच. त्यातलीच ती एक होती. माझी एक छान मैत्रीण होती.
ती पण आमच नात मात्र या पलीकडचं होत. शब्दात सांगता न येणार शेवटची आमची महाविद्यालयातील ती होळी आणि तिच्या सोबतचा तो शेवटचा सन आणि दुरावा निर्माण करणारे ते क्षण!
आज तिचा तो शेवटचा स्पर्श मला साद घालत होता आणि दुरावलेली ती आठवत होती🌸