Tiny Tales

Tiny Tales Tiny Tales is a Traveling Theater. We complicatedly work for children, through Literature & Theater.

टायनी टेल्स अंतर्गत आम्ही नाटक लोकांपर्यंत, त्यांच्या जागेत गावागावात फिरून पोहोचवण्याचा प्रयत्न करते. Travelling Theater (फिरतं नाटक) ही संकल्पना खरोखरच प्रत्यक्षात आणत आम्ही आत्तापर्यंत १००हून अधिक गावांमध्ये नाटक पोहोचवलं आहे.
आम्ही मोठ्यांसोबतच बालसाहित्यावर आधारितही काम करतो. नाटकाचा वापर करून मुलांच्या वाचन व लेखन क्षमतेचा विकास व्हावा हे आमचे उद्दीष्ट आहे.
बालसाहित्यातील गोष्टी सादर करून, त

्या गोष्टींच्या प्रकट वाचनातून मुलांना तो अनुभव आणि त्याचबरोबर लेखन-वाचनातला आनंद मिळवून देण्याचे काम आम्ही करतो.

01/04/2026

हा जो चंट मुलगा दिसतोय तो मीच आहे . मीच माझ्यासमोर असा बिनधास्त नाचतोय. माझ्या शाळेच्या वयात माझ्या समोर असा कल्पेश आला असता तर सगळे शाळेचे नियम, शिक्षेची भीती सोडून मी ही असा बिनधास्त नाचायला आलो असतो .
शाळेत असं कधी कोणी माझ्या आयुष्यात आलंच नाही किंवा कोणी गोष्टी सांगणारं सुद्धा. आणि जेव्हा गोष्टी , गाणी आयुष्यात आली तेव्हापासून आपण अशा अनेक कल्पेश च्या जवळ जाऊयात असं मनात आलं आणि तेव्हापासूनचा हा प्रवास . आपण मुलांना प्रेम द्यावं,आनंद द्द्यावा,मजा द्यावी,गमंत असावी असं मला कायम वाटतं . आज ही मजा रेकॉर्ड करायला खुद्द मेंढे सर होते म्हणून हे सोबत जोडत आहे . आता हे गाणं पाठ झालं आहे . बाकी आपण सगळे अशी मजा करत राहूयात आणि ह्या सर्व मुलांना प्रेम वाटत राहूयात. ते प्रेम देत आहेतच.
- एक चंट मुलगा

innocence



(fearless kids express freely confidence matters school life no fear just love sing without fear school shala)

23/03/2026

Children are natural performers, they step into characters every day.

So when they watch theatre, something instantly connects. You can see it in their eyes, they’re not just watching, they’re imagining themselves inside the story.

And after the show, something beautiful happens…
They reach for books.
They want to read, to relive the story.

This connection between theatre and stories is pure magic and watching children experience it is what keeps us going. 💜
Thank you for inviting us!

Video and publicity by:

21/03/2026

अमरावती, परभणी, पालघर, पुणे, रायगड, नंदुरबार, गडचिरोली, नाशिक, हिंगोली, अशा भरपूर जिल्ह्यांमध्ये शिक्षक आणि खास करून अंगणवाडीच्या ताईंसोबत काम करतोय!
या प्रकल्पामुळे आपण कधी नावही न ऐकलेल्या गावांमध्ये फिरता येतं, वेगवेगळ्या माणसांना भेटता येतं, ही आम्हाला आमच्या कामातली सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे.

नाटकाच्या माध्यमातून आपण मुलांसोबत काम कसं करू शकतो, गोष्टी-पुस्तकं यावर किती नवनव्या पद्धतीने काम होऊ शकतं, नाटक आणि शिक्षण याच्या मदतीने
मोकळेपणानं मुलांना बोलतं कसं करू शकतो ते बोलीभाषेतून हळूहळू पुस्तकांकडे कसं नेऊ शकतो आणि सोबत, चित्र, रंग यांचा मेळ घालत मुलांसोबतचं काम कसं करू शकतो अशा विषयांवर प्रात्यक्षिक करून बघत काम होतं.

खरंतर या ताईंसोबत नाटकाच्या, गोष्टींच्या अंगानं काम करायला जातो आणि या कामासोबत भरपूर प्रेम, त्यांच्या गोष्टी, गाणी घेऊन येतो.
बाकीच्यावेळेस जपून, सावरून वागणाऱ्या, सगळ्यांचा विचार करणाऱ्या ताया जेव्हा कार्यशाळेत मनसोक्त नाचतात, गातात, कसलाच विचार न करता बिनधास्त बोलतात तेव्हा त्यांचं हे दुसरं रूप बघताना फार भारी वाटतं.
लकबी टिपणाऱ्या, आमची नक्कल करून दाखवणाऱ्या, घरची काम करून, बस बंद असताना ४०-५० किलोमीटर प्रवास करत येऊनही जोरजोरात हसणाऱ्या, पदर खोचून आरडाओरडा करत नाचणाऱ्या, खड्या आवाजात गाणी गात रात्र जागवणाऱ्या तायांना भेटणं हीच खूप भारी गोष्ट असते.

सुरूवातीला अनोळखी असणाऱ्या ताया, हळूहळू त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगतात. काम करत असतानाची गमतीची गोष्ट म्हणजे त्या हे सगळं स्वतःच्या आयुष्याशी जोडून बघतात. आवाजातली पट्टी शिकवताना स्वतःशी कोण कुठल्या पट्टीत बोलतं हे शोधतात. आता घरातून येणारा नवऱ्याचा आवाज सुद्धा कुठल्या पट्टीत आहे, हे त्या ओळखतात. भावना समजून घेताना त्यांच्याशी कोण कसं बोलतं हे आठवून ती वाक्य जोडून पाहतात.

‘क्वेस्ट’ ही संस्था गेले अनेक वर्ष या अंगणवाडीच्या सेविकांसोबत ‘पालवी’ प्रकल्पाच्या माध्यमातून काम करतेय. त्यांच्यातल्या अनेक छोट्या गोष्टी पारखून बळ देतेय. क्वेस्ट सारख्या संस्थेमुळं अशा नवनवीन ठिकाणी जाऊन काम करता येतं! हे सगळं काम खूप कमाल आहे. कामाच्या निमित्तानं भटकताना भेटणारी ही माणसाचं काम करत राहण्यासाठी ऊर्जा देतात.
Video shot, edited and all the publicity handled by:



QUEST Kalpesh Samel Pratiksha Khasnis Tushar Marade Nilesh Marade Pralhad Kathole Kishor Kathole Harshal Kathole Earthian Art Foundation fans

A full one month before, our Iblis Workshop is already HOUSEFULL!This is our third year, and even in the third year. sti...
16/03/2026

A full one month before, our Iblis Workshop is already HOUSEFULL!

This is our third year, and even in the third year. still housefull! 🔥
Different themes, different spaces, and a bunch of slightly crazy, passionate people coming together, that’s the real fun of it!

From now on, any new registrations will go to the waiting list.
And once the waiting list reaches 25 people, we’ll announce a second batch.

Till then
Jor se bolo
IBLISSSS. HOUSEFULL! 🎭

Poster design :

हा फोटो, प्रचंड आनंद देणारा, ऊर्जा देणारा, काम करण्यासाठी ताकद देणारा!!हा आमचा सगळ्यात छोटा प्रेक्षक, अगदी खरा. आवडलं तर...
13/03/2026

हा फोटो, प्रचंड आनंद देणारा, ऊर्जा देणारा, काम करण्यासाठी ताकद देणारा!!

हा आमचा सगळ्यात छोटा प्रेक्षक, अगदी खरा. आवडलं तर भरभरून प्रेम देणारा, नाहीतर सरळ उठून निघून जाणारा.
कुठलाच खोटेपणा, कृत्रिमपणा नसणारा.

आजच्या या शाळेतली मुलं ‘नाटक’ नावाचं काहीतरी पहिल्यांदाच बघणारी, अनुभवणारी होती.
तेही त्यांच्या वयाचं, कमी शब्दाचं, त्यांच्याच आजूबाजूला घडणारं.

प्रयोगात नाटकभर या मुलांचे डोळे आमच्यावर खिळलेले होते. त्यांना नाचायचं होतं, आमच्याबरोबर गोष्टीतलंच एक व्हायचं होतं, गाणी म्हणायची होती. मध्येच प्रश्न विचारणं, त्यांचे अनुभव शेअर करणं हे तर सुरूच असतं.
नाटक बघून झाल्यावर सगळी मुलं पळत आली, त्यांना आम्हाला हात लावायचा होता, हे खरे आहेत का?, हे सुध्दा बघायचं होतं.
हे असे अनुभव फार फार कम्माल असतात. या मुलांकडून मिळणारं निरागस प्रेम मिळालं की खूप भारी वाटतं.

आज प्रयोगाला बोलवल्याबद्दल Akanksha Foundation Kirloskar Thank You!!
तुम्ही आम्हाला प्रयोगासाठी बोलावू शकता! थोडीशी जागा आणि प्रेक्षक सोडता आम्हाला फार काही लागत नाही
भेटू, तुमच्या शहरात, गावात!

Publicity by:

21/02/2026

२०१९ साली ‘जागा तुमची गोष्ट आमची’ ह्या नावाने आम्ही काही गोष्टींची नाटकं घेऊन प्रयोगाला सुरवात केली होती. पुण्यात अक्षरधारा मध्ये एक आणि कोल्हापूरात हिच्याकडून एक असे प्रयोग आम्हाला मिळाले होते आणि ह्या दोन प्रयोगावर आपण दौरा काढू असं ठरवलं.
त्या दौऱ्यात २ प्रयोग घेऊन निघालो होतो, ते प्रयोग संपेपर्यंत आम्ही २२ प्रयोग करून आलो! त्या दौऱ्यामूळे, त्या गावातील प्रेमामुळे आणि त्या सगळ्या शाळांमुळे आम्ही गेले ६ वर्ष काम करतोय. बसवलेल्या गोष्टींसोबत प्रेक्षकांकडून मिळालेल्या अनेक गोष्टी घेऊन आम्ही हा प्रवास करतोय.
त्या पहिल्या दौऱ्यानंतर आम्ही प्रत्येक नाटकाचा दौरा असाच काढतो. मुलांसाठीची बरीच नाटकं ‘आलोरगान, कडेकोट कडेलोट, तुजी औकात काये?’ आणि आता ‘लौट के बुद्धू’चं सुद्धा असंच करू .
गेली अनेक वर्षांची,खूप मोठी गोष्टींची पोटली सोबत आहेच. ६ वर्ष झाली वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेत नाटक करत आहोत.
मधल्या काळात वेगवेगळी नाटकं, उपक्रम करून पाहिले. वेगवगेळ्या नाटकाच्या संस्थासोबत काम केली. आता पुन्हा ‘जागा तुमची गोष्ट आमची’ हा दौरा नव्याने नव्या पद्धतीने काढायला आम्ही सुरूवात करत आहोत.
तुम्हाला ह्या दौऱ्यात सोबत यायचं असेल, तर नक्की कळवा. हा व्हीडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
सगळ्यांनी आजवर भरभरून प्रेम दिलय तसंच प्रेम करत रहा. आम्ही सुद्धा निघतोय प्रेम वाटायला, गोष्टी सांगायला!

Kalpesh Samel

२०१९ साली ‘जागा तुमची गोष्ट आमची’ ह्या नावाने आम्ही काही गोष्टींची नाटकं घेऊन प्रयोगाला सुरवात केली होती. पुण्यात अक्षरध...
21/02/2026

२०१९ साली ‘जागा तुमची गोष्ट आमची’ ह्या नावाने आम्ही काही गोष्टींची नाटकं घेऊन प्रयोगाला सुरवात केली होती. पुण्यात अक्षरधारा मध्ये एक आणि कोल्हापूरात Sheetal Patil हिच्याकडून एक असे प्रयोग आम्हाला मिळाले होते आणि ह्या दोन प्रयोगावर आपण दौरा काढू असं ठरवलं.
त्या दौऱ्यात २ प्रयोग घेऊन निघालो होतो, ते प्रयोग संपेपर्यंत आम्ही २२ प्रयोग करून आलो! त्या दौऱ्यामूळे, त्या गावातील प्रेमामुळे आणि त्या सगळ्या शाळांमुळे आम्ही गेले ६ वर्ष काम करतोय. बसवलेल्या गोष्टींसोबत प्रेक्षकांकडून मिळालेल्या अनेक गोष्टी घेऊन आम्ही हा प्रवास करतोय.
त्या पहिल्या दौऱ्यानंतर आम्ही प्रत्येक नाटकाचा दौरा असाच काढतो. मुलांसाठीची बरीच नाटकं ‘आलोरगान, कडेकोट कडेलोट, तुजी औकात काये?’ आणि आता ‘लौट के बुद्धू’चं सुद्धा असंच करू .
गेली अनेक वर्षांची,खूप मोठी गोष्टींची पोटली सोबत आहेच. ६ वर्ष झाली वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेत नाटक करत आहोत.
मधल्या काळात वेगवेगळी नाटकं, उपक्रम करून पाहिले. वेगवगेळ्या नाटकाच्या संस्थासोबत काम केली. आता पुन्हा ‘जागा तुमची गोष्ट आमची’ हा दौरा नव्याने नव्या पद्धतीने काढायला आम्ही सुरूवात करत आहोत.
तुम्हाला ह्या दौऱ्यात सोबत यायचं असेल, तर नक्की कळवा. ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
सगळ्यांनी आजवर भरभरून प्रेम दिलय तसंच प्रेम करत रहा. आम्ही सुद्धा निघतोय प्रेम वाटायला, गोष्टी सांगायला!

गेले काही वर्ष आम्ही मुरबाडमध्ये अर्थियनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाप्रकारांसाठी आणि कलाकारांसाठी एक सुंदर जागा तयार क...
23/11/2025

गेले काही वर्ष आम्ही मुरबाडमध्ये अर्थियनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाप्रकारांसाठी आणि कलाकारांसाठी एक सुंदर जागा तयार करत आहोत. जवळच्या गावातील मुलांसोबत नाटक, चित्रकला, संगीत अशा अनेक कलांमधून सातत्यानं काम करत आलोय.

या मुलांना, गावाला आणि देशभरातील अप्रतिम कलाकारांना एकत्र आणण्यासाठीच हा उत्सव!
इथे नाटकं, चित्रं, गाणी आणि अजून खूप काही अनुभवायला मिळणार आहे.

सह्याद्रीच्या खड्या डोंगराच्या पायथ्याशी होणाऱ्या या खास महोत्सवाला नक्की या! ✨🌿🎨🎭

-
-

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tiny Tales posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Tiny Tales:

Share

The unheard story. (Journey of Tiny Tales)

Kalpesh & Pratiksha, we both are founder of Tiny Tales. We are graduates of Lalit Kala Kendra. After graduation, We got a fellowship called 'Goshtrang'.

In this residential fellowship, we work for adivasi kids for a year, the work was based on Language development through art & stories.

At the end of that fellowship, after performing stories and plays for children in several schools and by listening to the experience as how it affected them, we decided that this wisdom and this understanding of these little minds shouldn’t be restricted to this village itself and should reach out to every child out there in every school in every village and litrate them through theater & stories.

And the outcome of this strong belief is our small little step, ‘Tiny Tales’.