06/10/2023
आज पंडित दीनदयाळ विद्यालयात *वर्ल्ड फॉर नेचर पुणे* चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शुभम पांडे मा.श्री अभिजीत वाघमोडे आणि त्यांचे सहकारी श्री श्रेयश पट्टणशेट्टी, श्री अनुप शेलार आणि किटवडे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक त्याचबरोबर पर्यावरण प्रेमी मा. श्री उत्तम कोकितकर यांनी विद्यालयाला भेट दिली सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री संजीव देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले World For Nature नेचर ही संस्था प्राण्याविषयीची जनजागृती करण्याचे काम करते या त्यांच्या उपक्रमांतर्गत आज त्यानी सर्प जनजागृती कार्यक्रमाविषयीची माहिती तक्त्याच्या आधारे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या सापां विषयीची माहिती मनोरंजक रीतीने विद्यार्थ्यांना दिली यामध्ये त्यांनी विषारी साप, बिनविषारी सापाविषयीची माहिती दिली नाग सापापासून ते धामण जातीच्या सापापर्यंतच्या सर्व सापांची माहिती दिली या माहितीने नक्कीच विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका कुशंकांचे निरसन त्यांच्याकडून करून घेतले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते