चंदगडी_बाळ्या

चंदगडी_बाळ्या Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from चंदगडी_बाळ्या, Cultural Center, चंदगड, Kolhapur.

 #विचार_तर_कराल?? #पटलं_तर_घ्या...
17/04/2026

#विचार_तर_कराल??
#पटलं_तर_घ्या...

31/08/2025

#गोंधळी आणि #गणपती जुनं नातं 🥰😍

30/08/2025

🥰😍🥰

 #चंदगडी_पेरणी #चंदगडी_बोलीभाषा #जागर_चंदगडी_बोलीभाषेचा #चंदगडी_बाळ्यामिरग चालू हुच्या आदीच निसर्ग वादळ यलं,नि पाऊस,वादा...
06/06/2025

#चंदगडी_पेरणी
#चंदगडी_बोलीभाषा
#जागर_चंदगडी_बोलीभाषेचा
#चंदगडी_बाळ्या

मिरग चालू हुच्या आदीच निसर्ग वादळ यलं,नि पाऊस,वादाळ बी घून यलं...तेच्या न सगळ्यांची सुरू झाली पेरणीची धावपळ!!
औता पासून माणं हाडगं, कुरी, नांगर,घुट्टा, बियाचं भात, मुगाचे गर(लई म्हाग झाल्यात म्हणी), बांध घालूस बियाचे सोले,दिडगे, मेरुल्या, भेंडया, भाज्या कसल्या कसल्या, खतं आणि सगळ्यात महत्त्वाचं माणसं ह्यो सगळा जवा करून शेतकऱ्याची घाई सुरू झाले आतं.... जो तो औता मागे हाय...सगळा शिवार ,मानी ,शेत लोकांनी ,शेतकऱ्यांनी फुलोन गेल्यात.....!!!
भाताबरोबर, भुईमूग,बाजरी, मक्का ,नाचण्याची रोपं हेंचि बी तयारी चालूचं हाय...!!
हे सगळं करतानं कजवेच्या दराकडे बी काहीजण डोळे लावून बसल्यात, काहींनी बी-बियाणं हानुस इकल्यानी काजवा यतील त्या दरास😢
काहींनी धुळवापा केल्यानी तर काहींनी रोपं टाकल्यानीत....अशी ही पेरणीची लगीनघाई चंदगडी भाषेत शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न....!!

डॉ. अरविंद आण्णापा शेनोळकर
मु.करेकुंडी, ता.चंदगड, कोल्हापूर
वाचण्यासाठी....
क्लिक on लिंक....

* चंदगडी-पेरणीची लगीनघाई*😍 # धुळवाफ #कारवाफ_काररोप #भात_पेरणी #बांध_घालणे #चंदगडी_शेती #हाडगं_कुरी_नांगर_कुळव_घुट्टा_.....

 ी #कटकं #बालपण  #आमी_चंदगडी #चंदगडी_बोलीभाषा #चंदगडी_बाळ्याबाळ्यास ढोराकडे जातानं कटकीचं झाड दिसलं. कसं काय वळीकल्यानं ...
06/06/2025


#कटकं
#बालपण
#आमी_चंदगडी
#चंदगडी_बोलीभाषा
#चंदगडी_बाळ्या

बाळ्यास ढोराकडे जातानं कटकीचं झाड दिसलं. कसं काय वळीकल्यानं तेन काय की😜.😀 आतं कटकीचं झाड दिसल्यावर आठावली ती #कटकनळी.👌
बारकं असतानची मज्जा..!!
मानग्याची पोकळ नळी करून तेच्यात दोनी बाजूस कटकं घालून मानं, यकाबाजून त्या नळीच्या भोकाच्या मापाची काठी घालून जरा जोर लावून दाबल्यावर फुडचं कटाक बंदुकीचा बार उडल्यागत आवाज करून भाईर पडताय.. कटकं लागोस चालू झाली की हेच काम मे महिन्याच्या सुट्टीत🤗😍😍
घराडे यल्यावर भाच्यास, कटकाचा इषय काढल्यावर, तेनं आणल्याचं की लगेचं मागल्या वर्षीची #कटकनळी! चल म्हणून पाटचं लागला,"कटकं हानुस!"
बागेत जाऊन कटकं काढून देलो तेला ,यता यता मानग्याच्या काटया बी घून यलाव. तो लागला की कामास मानं! #फट- #फट करीत कटकं मारुस!! बायल्या न्हुन मिया हातात घेटलो की फुसुकचं हुल्ल. आवाज काय यईना झाल्ला🤦‍♂️ तेन मारल्यानं की आवाज यई.हासोन-हासोन फुरे केल्यानं ,च्या मारी न्हुन!!😒

तीक्कुडनं आई आरडोल्ली की,

"हब ही, काय करूल्यात गं नको ते? कटकं आणि कुट्टे गावली ह्यास्न?? डाग पडत्यात हूं काय पोरा, कापडावर!!"

तो कसला ऐकताय, तो आपला कटकं संपेसक्कोळ नळीत कटकं घालीत आणि आवाज काढीत....!!
बाळ्या आपला फोटो काढल्यान आणि परत आई यऊच्या आदी यवून बसला घरात...!!!

तर मानं खल्या-खल्यास आठावली ही #कटकनळी!! आणि खल्या-खल्याच्या कटकनळीतनं आवाज ययी ,खरं सांगा!!
काय फुसका बार चं ययी??😀😀😀
डॉ. अरविंद आण्णापा शेनोळकर
#चंदगडी_बाळ्या @ #करेकुंडी, ता. चंदगड

Address

चंदगड
Kolhapur
416507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चंदगडी_बाळ्या posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share