Kalyan Gayan Samaj

Kalyan Gayan Samaj Kalyan Gayan Samaj is an organisation committed and dedicated towards promoting Hindustani Classical Vocal, Instrumental Music & Dance.

We organize Devgandharva Mahotsav every year in the second week of December to celebrate India's rich cultural heritage Kalyan Gayan Samaj is a melting pot for Artists, Indian Classical Vocal, Music & Dance Instructors & Students. We are blessed with an old & rich cultural history and we are proud of our art & culture heritage.

ठेवा आठवणींचा !!गेल्या १०० वर्षांच्या प्रवासात कल्याण गायन समाजाने शेकडो अमूल्य आठवणी आपल्या संग्रही साठवलेल्या आहेत. त्...
22/06/2026

ठेवा आठवणींचा !!

गेल्या १०० वर्षांच्या प्रवासात कल्याण गायन समाजाने शेकडो अमूल्य आठवणी आपल्या संग्रही साठवलेल्या आहेत. त्यातील अनेक आठवणी या दुर्मिळ आणि संग्राह्य अशा आहेत.

या सांगीतिक वारशाचा खजिना आम्ही आता सोशल मिडियाच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडत आहोत. या सृजनयात्रेत सहभागी व्हा, आणि या अमोल क्षणांचा आनंद घ्या!

21/06/2026
शताब्दी वर्ष साजरे करताना कल्याण गायन समाज अनेक उपक्रम राबवीत आहे. संगीत साधकांसाठी *गुरूवाणी* या मार्गदर्शक कार्यक्रमाच...
14/06/2026

शताब्दी वर्ष साजरे करताना कल्याण गायन समाज अनेक उपक्रम राबवीत आहे. संगीत साधकांसाठी *गुरूवाणी* या मार्गदर्शक कार्यक्रमाची संकल्पना यातूनच पुढे आली.
येत्या 21 जुन 2026 रोजी पं सत्यशील देशपांडे यांचे बंदिशीतील सौंदर्य व विविधता या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन होणार आहे.
अधिक माहितीसाठी +919820232659 या नंबर वर संपर्क साधावा.
प्रवेश विनामूल्य

14/06/2026

कालाय तस्मै नमः! काळ हा सर्वात शक्तिशाली आहे. म्हणूनच एखाद्या क्षेत्रात ताठ मानेने टिकून रहायचं असेल तर काळाबरोबर व काळाप्रमाणे स्वतःला बदलायला लागतं. शतक महोत्सव साजरा करणाऱ्या कल्याण गायन समाजाने अर्थातच काळाची बदलती पाऊलं नेहमीच ओळखली व संगीताच्या क्षेत्रात आपला स्वतःचा ठसा कायम ठेवला. संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी नवनवीन माध्यमांचा वापर हे त्याचेच द्योतक!

विद्यार्थी, कलाकार आणि गुरू या यशस्वी संगीत साधकाच्या तीन अवस्था म्हणता येतील. आजच्या प्रथितयश कलाकारांना या प्रत्येक अवस्थेत काय आव्हाने पेलावी लागली, काय अनुभव आले आणि या सगळ्याला त्यांनी कसा प्रतिसाद दिला, हे त्यांच्याच तोंडून ऐकणे हा देखील संगीत साधनेचा एक भाग असु शकतो.
कल्याण गायन समाजातर्फे सादर होणाऱ्या अशा अनेक कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजेरी लावणं बऱ्याच जणांना ईच्छा असूनही शक्य होतच असं नाही. म्हणूनच सर्वांना सोयीचं, विशेषतः तरुण पिढीला भावणारं इंटरनेट हे माध्यम निवडून पॉडकास्टच्या द्वारे ही माहिती सर्वांसमोर ठेवावी व काळ वेळाच्या मर्यादा निकाली काढून अनुभवाचं हे दालन सर्वांसाठी खुलं करावं या उद्देशाने आम्ही सादर करत आहोत.... *सृजन संवाद!*
१२ जून हा कल्याण गायन समाजाचे संस्थापक कै काकासाहेब बर्वे यांची पुण्यतिथी..
तो योग साधून कल्याण गायन समाजाचा पहिला पॅाडकास्ट सादर करतोय..

06/06/2026

सुमारे दोन वर्षांपूर्वी, 'गायन समाज'च्या टीमने 'कल्याण गायन समाज'च्या वतीने एक पॉडकास्ट सुरू करण्याचा विचार केला होता आणि आता, येत्या १२ जून रोजी आम्ही आमच्या 'कल्याण गायन समाज' यूट्यूब चॅनेलवर या पॉडकास्टचा पहिला भाग (एपिसोड) प्रदर्शित करत आहोत.

नक्की पहा!

अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा व आमच्यासोबत जोडलेले राहा!"

Address

Tilak Chowk
Kalyan
421301

Opening Hours

Monday 5pm - 9pm
Tuesday 5pm - 9pm
Wednesday 5pm - 9pm
Thursday 5pm - 9pm
Friday 5pm - 9pm
Saturday 5pm - 9pm

Telephone

0251-2205372

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalyan Gayan Samaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Kalyan Gayan Samaj:

Shortcuts

Share