Angad Dhone

Angad Dhone all dth मनोरंजन

सोच Branded होनी चाहिए  कपड़े नहीं
27/06/2021

सोच
Branded
होनी चाहिए कपड़े नहीं

30/03/2021

हे काळजाला भिडलं..आणि आवडलंही..❤️😑

पार्टी ट्रस्ट लातूर ❤❤
25/12/2020

पार्टी ट्रस्ट लातूर ❤❤

08/11/2020
कोल्हापूरवाले फारच update राहतात, फडणवीसांनी बोलायचे आणि ह्यांनी लगेच बॅनर लावले राव
11/06/2020

कोल्हापूरवाले फारच update राहतात, फडणवीसांनी बोलायचे आणि ह्यांनी लगेच बॅनर लावले राव

१९९९साली साहेबांनी लावलं रोपटं हळूहळू वटवृक्ष होण्याकडे मार्गक्रमण करतय; आज एकविशी पार केलीय, महाराष्ट्रातील स्वाभिमानी ...
10/06/2020

१९९९साली साहेबांनी लावलं रोपटं हळूहळू वटवृक्ष होण्याकडे मार्गक्रमण करतय; आज एकविशी पार केलीय, महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकांचा संच एकत्र राहून पक्ष चांगल्या वाईट काळाला तोंड देत पुढे चालत आहे; पक्षाने अनेकांना मोठं केलं नावं दिल राज्यात सर्वदूर पोहचवलं; राज्यात समाजहितासाठी स्वतःला झपाटून घेऊन रोजगार, शिक्षण आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या; सत्ता कोणाचीही असली राज्यात कायमच राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दबदबा कायम ठेवला; गेल्यावर्षी मोठ्या खडतर काळातून मार्गक्रमण करत पक्ष लढला आणि सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि ठणकावून सांगितलं 'भले पक्षाने निर्माण केलेले लोक सत्तेसाठी, स्वार्थासाठी सोडून लोटांगण घालत जातील मात्र पक्षाने एक प्रेमाचं घट्ट नातं सर्वसामान्य लोकांसोबत विणलं आहे त्यांच्या सोबतीने पुन्हा असंख्य नेतृत्व निर्माण करण्यास पक्ष सक्षम आहे'

आपल्या एकनिष्ठ मावळ्यांच्या सोबतीने लढून पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे; तरीही भविष्यातील लढाई खुप मोठी आहे; सर्वसामान्यांच्या हक्कांना न्याय देत प्रत्येकाच्या घराघरात अगदी हृदयात पक्षाला आपलं स्थान निर्माण करायचं आहे; महाराष्ट्राच्या मातीतल्या रांगड्या असणाऱ्या पक्षावर नेहमीच विरोधकांकडून घाव करण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात पण होत राहील; पण या सगळ्यांवर मात एकदिवस असाही उजाडेल जेव्हा 'सहाव्या मजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस रुबाबात बसलेला असेल' सत्तेच्या माध्यमातून काम करत असतानाच संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली घौडदौड जोरात करत राहील असा मला विश्वास आहे...

ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे आपण सर्वजण एकत्र आलोय एकमेकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालोय, अशा सगळ्या जिवाभावाच्या प्रेमळ मित्रांना 'पक्षाच्या वर्धापन दिनाच्या खुप खुप शुभेच्छा..💐♥️

#राष्ट्रवादीकुटुंब #मिशनसहावामजला⏰

शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात संकल्पना आहे तरी काय ?शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात संकल्पनेविषयी थोडक्यात माहिती…छत्र...
11/02/2019

शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात संकल्पना आहे तरी काय ?
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात संकल्पनेविषयी थोडक्यात माहिती…

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष सहजासहजी घडत नाहीत. काळाच्या क्षितिजावर निर्माण झालेल्या अंधकारमय सामाजिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीतुनच “शिवाजी” नावाच्या सूर्याचा उदय होत असतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपुर्ण आयुष्य समाजातील अंधकार दुर करण्यासाठी व्यतीत केले. म्हणुनच आज शेकडो वर्षांनंतर सुद्धा समाजात आदर्शवादी मानवी व्यवहाराचे मुर्तीमंत उदाहरण म्हणुन छत्रपती शिवरायांना आठवावे लागते. अनेक सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवरायांच्या संदर्भातील उदाहरणे दिल्याशिवाय कार्यक्रम पुर्ण होत नाहीत.

छत्रपती शिवरायांच्या कार्याच्या महतीमुळे आज शेकडो वर्षांनंतरही शिवजयंती समाजातील सर्व घटक मोठ्या उत्साहात साजरी करत असतात.

शिवजयंतीचा प्रवास

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणलं की काही काळापुर्वी गावोगावच्या चौकात महाराजांची मुर्ती किंवा प्रतिमा मांडुन आजुबाजुला पताके, झेंडे लावायचे आणि स्पीकरवर शाहिरी पोवाडे वाजवायचे असे स्वरुप होते. त्यापुढच्या काळात डॉल्बी, डिजेचा प्रभाव वाढला आणि शिवजयंतीच्या मोठमोठ्या मिरवणुका निघु लागल्या. मिरवणुकीत सामील होणारी तरुणाई हळुहळु डीजेच्या तालावर थिरकु लागली. जयंती म्हणलं की डीजे पाहिजेच ही तरुणाईची मागणी बनली.

सगळीकडचेच चित्र निराशादायक होते अशातला भाग नाही, काही ठिकाणी आशादायक चित्रही बघायला मिळत होते. शिवजयंतीनिमीत्त सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमांचेही आयोजन होऊ लागले होते. वेगवेगळ्या व्याख्यानमाला, स्पर्धा, सामाजिक उपक्रम या माध्यमातुन शिवजयंती साजरी व्हायला सुरुवात झाली. डोक्यावर मिरवले जाणारे शिवराय डोक्यात कसे येतील यावर सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमाचा जोर राहिला.

या सगळ्यांचा आढावा घेतला तर दिसुन येते की आज आपण या प्रवासाच्या अशा एका टप्प्यावर आहोत जिथुन आपल्याला पुढे सरकण्याची गरज निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांत आणि जगातील विविध देशांत साजरी होत आहे. सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमांची संख्याही वाढली आहे. कधीकाळी डिजेसमोर थिरकणारे युवक आज स्वतःहुन “डिजेमुक्त शिवजयंती” साजरी करण्याचा आग्रह धरत आहेत.

शिवजयंतीच्या काळात कार्यक्रम, रोषणाई, सजावट, मिरवणुका, उपक्रम, इत्यादींसाठी होणाऱ्या खर्चाची उलाढाल करोडोंच्या घरात आहे. शिवजयंती निमीत्त गुंतवलेली वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य, पैसा (Input) आणि त्यातुन समाजाला मिळणारे लाभ (Output) याचा आज प्रकर्षाने विचार करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती औपचारिकता म्हणुन साजरी होऊ नये. तिच्या माध्यमातुन समाजात आणि व्यक्तिगत आयुष्यात विधायक बदल घडावेत ही मागणी जोर धरत आहे. शिवजयंतीत नैतिक मुल्यांच्या प्रदर्शनापेक्षा त्यांचे अनुकरण करण्याची वृत्ती बळवावी ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

नुसत्या डिजेवर मोठमोठ्याने महाराजांची गाणी वाजवली म्हणुन महाराज दुरपर्यंत पोहोचत नाहीत, शांतपणे महाराजांना आठवुन त्यांचे विचार आचरणात आणले तर महाराजांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा समाज तयार होईल ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. गेल्या एक-दीड शतकापासुन शिवजयंती रस्त्यारस्त्यांवर आणि चौकाचौकात साजरी होत आहे. आपल्या घरात बसणारे गणपती आता चौकाचौकात विराजमान होऊ लागले परंतु चौकाचौकातील शिवराय आपण आपल्या घरापर्यंत आणता आले नाहीत. घरातुन बाहेर पडल्यानंतरच दिसणारे महाराज घरात दिसेनासे झाले. हे चित्र बदलण्यासाठीच शिवजयंतीच्या एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला. ती म्हणजे शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात !

काय आहे घरोघरी शिवजयंती संकल्पना ?

शिवजयंतीला चौकाचौकात होणारा गोंगाट कमी करुन आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी शिवजयंती अगदी सणासारखीच आनंदमय वातावरणात सहकुटुंब साजरी करायची. छत्रपती शिवराय घराघरात आले तरच घरामध्ये शिवरायांच्या विचारांचे संस्कार येतील. आपल्या नव्या पिढीला शिवरायांच्या विचारांची ओळख घरातुनच व्हायला हवी. ही यामागची संकल्पना आहे. मागच्या दोन वर्षांपासुन ती राबविली जात आहे.

शिवजयंती घरोघरी कशी साजरी करायची ?

१) सकाळी लवकर उठुन दारात रांगोळी काढावी. घरावर भगवा झेंडा लावावा. स्वयंपाकघरात गोड अन्नपदार्थ बनवावेत. साखर, पेढे वाटावेत.

२) घरात छोटी-मोठी सजावट करावी. महाराजांची मुर्ती अथवा प्रतिमा ठेवावी. त्यास सहकुटुंब हार किंवा पुष्प, सुमनांजली अर्पण करावी.

३) घरातील मुलामुलींना आणि मित्रसमुहाला शिवचरित्रावरील पुस्तकं भेट द्यावीत. कुटुंब, मित्रपरिवारासमवेत शिवचरित्रावर चर्चा करावी. शिवचरित्रातील प्रेरणादायक गोष्टी लहानांना समजावुन सांगाव्यात.

४) तुम्ही जर शिवजयंती निमीत्त आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी बाहेर जाणार असाल तर घरच्या इतर सदस्यांना घरात शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

५) जमल्यास समाजातील उपेक्षित, गरीब, शोषित, अनाथ अथवा गरजुंना यथाशक्ती मदत करावी.

६) सार्वजनिक वृक्षारोपण, स्वच्छता सारखे उपक्रम राबवावेत.

७) आपण घरी सहकुटुंब साजरी केलेल्या शिवजयंतीचे फोटो #घरोघरी_शिवजयंती या हॅशटॅगसह सोशल मिडीयावर अपलोड करावेत. जेणेकरुन या संकल्पनेचा जास्तीत जास्त प्रचार होऊन सर्वत्र घरोघरी शिवजयंती साजरी होईल.

घरोघरी शिवजयंती साजरी करताना कोणती काळजी घ्यावी ?

१) छत्रपती शिवरायांना आपण पौराणिक कथांमधील चमत्कार करणारे देव म्हणुन नाही, तर आदर्श जीवन जगण्यासाठीचे वास्तववादी प्रेरणास्रोत म्हणुन वंदन करा.

२) घरातील शिवजयंतीला कोणत्याही कर्मकांडाचे स्वरुप देऊ नका. घरी शिवजयंती साजरी करत असताना शिवरायांच्या प्रतिमेसमोर नारळ फोडणे, नैवेद्य दाखवणे, आरती म्हणणे, नवस बोलणे, उदबत्त्या-धुपारे लावणे असे तत्सम प्रकार टाळावेत.

“पाडवा, दसरा, दिवाळी जशी आपली संस्कृती
तशीच साजरी करु घरोघरी यंदाची शिवजयंती”

चला, ऐतिहासिक बदलाचे साक्षीदार व्हा. शिवजयंती घराघरात साजरी करुन शिवराय मनामनात पोहोचवा.

जय शिवराय !

33कोटीला भारी 19 फेब्रुवारी
09/02/2019

33कोटीला भारी 19 फेब्रुवारी

 #आપणांસ_ઉदंड_आયુષ્યાच्या_               अનંત_ शिवશુभेच्छा..              ुळजाभवानी आपणास                   उदंड आयुष्य ...
05/02/2019

#आપणांસ_ઉदंड_आયુષ્યાच्या_
अનંત_ शिवશુभेच्छा..
ुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो!.
🌹💐 #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा💐🌹
Happy ßirthday sir

शिवराय_असे_शक्तीदातातो  #सहयाद्री गेली ३२८ वर्षे झालीआम्हाला हेच सांगतोय कि, माझा संभाजी  #राजा हा माझ्या या दऱ्या-खोऱ्य...
03/12/2017

शिवराय_असे_शक्तीदाता
तो #सहयाद्री गेली ३२८ वर्षे झाली
आम्हाला हेच सांगतोय कि, माझा संभाजी #राजा हा माझ्या या दऱ्या-खोऱ्यात घनदाट अरण्यात #वादळासारखा झेपावणारा #गनिमावर तुटून पडणारा,एकही #लढाई न हरलेला #सच्चा वीर होता.
🚩जय शिवराय 🚩
🚩 जय शंभूराजे 🚩

Address

Jalna
431209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Angad Dhone posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share