राज्य नाट्य स्पर्धा जळगाव

  • Home
  • India
  • Jalgaon
  • राज्य नाट्य स्पर्धा जळगाव

राज्य नाट्य स्पर्धा जळगाव महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संच

*२२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा : जळगाव केंद्रातून नंदुरबारचे 'स्वराची कहाणी ' प्रथम**विद्या इंग्लिश मिडीयमचे क...
03/02/2026

*२२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा : जळगाव केंद्रातून नंदुरबारचे 'स्वराची कहाणी ' प्रथम*
*विद्या इंग्लिश मिडीयमचे काजव्यांचे स्वप्न द्वितीय तर दुसाने फाऊंडेशनचे गाठोड्याचं गुपित तृतीय*
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह व नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यसंकुलात पार पडलेल्या २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव व नंदुरबार केंद्रातून गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, नंदुरबार या संस्थेच्या स्वराची कहाणी या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच विद्या फाउंडेशन संचालित विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव या संस्थेच्या काजव्यांचे स्वप्न या नाटकास द्वितीय पारितोषिक, सुधाकर दुसाने फाउंडेशन या संस्थेच्या गाठोड्याचं गुपित या नाटकासाठी तृतीय पारितोषिक, जीवन विकास समा. संस्था आर. बी. पाटील विद्यालय, जळगाव या संस्थेच्या रद्दी या नाटकासाठी चतुर्थ पारितोषिक, तसेच महाराणा प्रताप विद्यालय, भुवावळ या संस्थेच्या हे तुम्हीही करु शकता या नाटकासाठी पाचवे पारितोषिक प्राप्त जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या पाचही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव व नंदुरबार केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक नागसेन पेंढारकर (नाटक- स्वराची कहाणी), द्वितीय पारितोषिक विशाल जाधव (नाटक- काजव्याचे स्वप्न ), तृतीय पारितोषिक दिशा ठाकूर (नाटक- गाठोड्याचं गुपित) यांना तर उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रभूदत्त दुसाने (नाटक- गाठोडयाचं गुपित) व तनिष्का पेंढारकर (नाटक- स्वराची कहाणी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे पूर्वा जाधव (नाटक- सुसू), निर्गुणी बारी (नाटक- पुस्तक एके पुस्तक), खुशी चौधरी (नाटक- आदिंबाच्या बेटावर), प्राजक्ता सुरवाडे (नाटक- चिंगी), सायली जुमडे (नाटक-स्वराची कहाणी), निखिल गुरव (नाटक- हे तुम्हीही करु शकता), ऋषिकेश शिंदे (नाटक - रद्दी), चिराग पाटील (नाटक-द डार्क डेव्हिल), ओमविलास निकुंभ (नाटक- काजव्याचे स्वप्न), अर्णव चित्ते (बदलू आम्ही गोष्टला) यांना मिळाले आहे.
तांत्रिक बाजूंची पारितोषिके प्रकाश योजना प्रथम पारितोषिक मनोज सोनार (नाटक- स्वराची कहाणी), द्वितीय पारितोषिक - श्याम चव्हाण (नाटक- काजव्याचे स्वप्न ), तृतीय पारितोषिक जितेश जावरे (नाटक- हाका नाका माका नाका), नेपथ्य : प्रथम पारितोषिक संगिता ब्राम्हणे - पेंढारकर (नाटक- स्वराची कहाणी), द्वितीय पारितोषिक राहुल भारंबे (नाटक- खेळ फुलपाखरांचा), तृतीय पारितोषिक भाग्यश्री राजपूत ( नाटक - रद्दी), रंगभूषा : प्रथम पारितोषिक पूनम जावरे (नाटक-भक्ती), द्वितीय पारितोषिक योगेश लांबोळे (नाटक - काजव्याचे स्वप्न), तृतीय पारितोषिक आरती माळी (नाटक- बदलू आम्ही गोष्टीला), वेशभूषा : प्रथम पारितोषिक रेवती जावरे (नाटक- आदिंबाच्या बेटावर), द्वितीय पारितोषिक शिवाजी माळी (नाटक- जय हो फॅन्टसी), तृतीय पारितोषिक श्रृती आढे (नाटक- धोका दिसतोय ना ! ), संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक यतीन पाटील (नाटक- काजव्याचे स्वप्न ), द्वितीय पारितोषिक अमोल ठाकूर (नाटक - पुस्तक एके पुस्तक), तृतीय पारितोषिक वैभव वारके (नाटक- हे तुम्हीही करु शकता) यांना मिळाली आहेत.
दि. २० जानेवारी ते २८ जानेवारी, २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, जळगाव व छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ६१ बालनाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अमजद सय्यद (बीड), प्रदीप कांबळे (छत्रपती संभाजीनगर) आणि वंदना जीवने (नागपूर) यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी पारितोषिकप्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले आहे. बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि बालकलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार बालनाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व बालकलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे.

महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला जळगावकरांचा मोठा प्रतिसाद ; 43 बालनाट्य संघ झाले सहभागी    #बालराज्यनाट्य
26/01/2026

महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला जळगावकरांचा मोठा प्रतिसाद ; 43 बालनाट्य संघ झाले सहभागी

#बालराज्यनाट्य

मुख्य संपादक - प्रा.डॉ. सुधीर यशोदा भगवान भटकर भ्रमणध्वनी -. 8407922404,9423490044 W...

24/01/2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावखेडा सिम, ता.यावल यांच्या ‘बंद पुस्तक’ या बालनाट्याचे सादरीकरण.

#बालराज्यनाट्य

मनाची व विचारांची स्वच्छता - बंद पुस्तकस्वच्छता, पर्यावरणाचे रक्षण आणि मानवी दृष्टीकोन यावर भाष्य करणारे उषा चोरघडे लिखि...
24/01/2026

मनाची व विचारांची स्वच्छता - बंद पुस्तक
स्वच्छता, पर्यावरणाचे रक्षण आणि मानवी दृष्टीकोन यावर भाष्य करणारे उषा चोरघडे लिखित व घीरज तायडे दिग्दर्शित ‘बंद पुस्तक’ या बालनाट्याचे सादरीकरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावखेडा सिम, ता.यावल यांनी केले. केवळ परिसरच स्वच्छ ठेवण्याबद्दल नाही तर मनाची आणि विचारांची स्वच्छताही किती महत्वाची आहे हे सांगणाऱ्या या बालनाट्यात कोमल सोनवणे, समीम तडवी, शाहिद तडवी, नदीम तडवी, धनश्री पाटील, शाहिन तडवी, रेहाना तडवी, नुरमोहम्मद तडवी, रोशनी तडवी, अलिजा तडवी, अनिसा तडवी, तमन्ना तडवी, प्रेम सोनवणे, निखत तडवी, रोहिणी पाटील, अलिया तडवी, शबिना तडवी, उन्नती साळवे, आलिया तडवी, सुमय्या तडवी या बालकलावंतांनी अभिनय केला.

#बालराज्यनाट्य

24/01/2026

विद्या फाऊंडेशन संचलित विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल,जळगावतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘काजव्याची गोष्ट’ या बालनाट्याचे सादरीकरण.

#बालराज्यनाट्य

एडिसनची गोष्ट सांगणारे - काजव्याचे स्वप्नमहान वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांच्या जीवनातील घटनेवर बेतलेले विशाल जाधव लिखी...
24/01/2026

एडिसनची गोष्ट सांगणारे - काजव्याचे स्वप्न
महान वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांच्या जीवनातील घटनेवर बेतलेले विशाल जाधव लिखीत दिग्दर्शित ‘काजव्याचे स्वप्न’ हे बालनाट्य विद्या फाऊंडेशन संचलित विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल,जळगावतर्फे सादर करण्यात आले. एडिसन लहानपणी अभ्यासात ढ होते. त्यांना शाळेव्यतिरिक्त इतर गोष्टी जाणून घेण्यात उत्सुकता होती. अखेर त्यांना वैतागून शिक्षक त्यांच्या आईला पत्र लिहून उद्यापासून शाळेत पाठवू नका असे सांगतात. या पत्राचा अर्थ विचारल्यानंतर एडिसनला आई जो अर्थ सांगते त्यातून प्रेरणा घेऊन आईकडून शिकून एडिसन नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ होतात. एडिसन यांच्या जिद्दीची व परिश्रमांची कहाणी सांगणाऱ्या या बालनाट्यात ओम निकुंभ, सोहम कदम, भार्गवी परदेशी, नकुल आंधळे, काव्या महाजन, कुशल पाटील, गणेश पाटील, उदित जांगीड, इशांत पाटील, भूपेश पाटील, यश बाविस्कर, प्रतीक खैरनार, चिराग पाटील, सार्थक महाजन, कुणाल वंजारी या बालकलावंतांनी अभिनय केला. तंत्रसहाय्य अंकुश काकडे (नेपथ्य), श्याम चव्हाण (प्रकाशयोजना), योगेश लांबेळे (रंगभूषा), सागर सदावर्ते (वेशभूषा), यतीन पाील, जया साळुंखे, जयेश साळुंखे (पार्श्वसंगीत) यांचे होते.

#बालराज्यनाट्य

24/01/2026

मदर्स केअर प्री स्कूल, भुसावळ यांनी सादर केलेल्या भक्ती या बालनाट्याचे सादरीकरण.

#बालराज्यनाट्य

प्राणीमात्रांवर प्रेम करा संदेश देणारे - भक्तीप्राणी मानवाप्रमाणे बोलू शकत नसले तरी ते सजीव आहेत, त्यांनाही त्रास होतो, ...
24/01/2026

प्राणीमात्रांवर प्रेम करा संदेश देणारे - भक्ती
प्राणी मानवाप्रमाणे बोलू शकत नसले तरी ते सजीव आहेत, त्यांनाही त्रास होतो, असा संदेश देणारे मोहिनी पाटील लिखित अजय पाटील दिग्दर्शित ‘भक्ती’ हे बालनाट्य मदर्स केअर प्री स्कूल, भुसावळ यांनी सादर केले. प्राण्यांचा गट विठ्ठलाच्या वारीला निघतात. देवाला आपले गाऱ्हाणं ऐकावं लागेल म्हणून ते निघतात. पोपट सांगत असतो की देव माणसांचा आहे प्राणी पक्षांचा नाही. या प्राण्यांना विठ्ठलाच्या वारीत प्रवेश मिळत नाही. पण जिद्दीने प्राणी विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचतात व सिध्द करतात की, देव सर्वांचा आहे. या बालनाट्यात चिराग चौधरी, प्रितल चौधरी, आस्था पाटील, अन्वी बराटे, तेजल कोळी, मायरा चाब्रा, तनिष्का चौधरी, हिमानी भोई, काव्या जोशी, आरोही लाहोटी, गणिका अग्रवाल, आरोही चौधरी, ईश्वरी चौधरी, डिंपल चौधरी, खुशी पाटील, देवा महाजन, मयांक चौधरी, हितेश बास्कर, गणेश बास्कर, सौरांश, दिव्यांश या बालकलावंतांनी अभिनय केला. तंत्रसहाय्यक अजय पाटील (प्रकाशयोजना), अनुष्का पाटील (संगीत), पुनम जावरे (रंगभूषा), प्रितीशा पाटील (वेशभूषा), अक्षय नेहे (नेपथ्य), पूर्वा चौधरी, जयश्री चौधरी (रंगमंच व्यवस्था) यांचे होते.

#बालराज्यनाट्य

24/01/2026

स्वराज्य प्रतिष्ठान संचलित जिनिथ इंटरनॅशनल स्कूल, वाकी, जामनेर यांनी सादर केलेल्या खेळ फुल पाखरांचा या बालनाट्याचे सादरीकरण.

#बालराज्यनाट्य

मैदानी खेळांचे महत्व सांगणारे - खेळ फुल पाखरांचासद्यस्थितीत बालकांमध्ये मोबाईलचा वाढता वापर. त्यामुळे मोबाईलवरच गेम खेळल...
24/01/2026

मैदानी खेळांचे महत्व सांगणारे - खेळ फुल पाखरांचा
सद्यस्थितीत बालकांमध्ये मोबाईलचा वाढता वापर. त्यामुळे मोबाईलवरच गेम खेळला जातो. मुलं यामुळे आळशी होत आहेत. जुन्या मैदानी खेळांना प्राध्यान दिले गेले पाहिजे असा संदेश देणारे खेळ फुल पाखरांचा हे संतोष शिराळे लिखीत दिग्दर्शित बालनाट्य स्वराज्य प्रतिष्ठान संचलित जिनिथ इंटरनॅशनल स्कूल, वाकी, जामनेर यांनी सादर केले. शरीर सदृढतेसाठी मैदानी खेळांची गरज सांगणाऱ्या या बालनाट्यात अभिनव पाटील, प्रांजली माळी, मानवी चौधरी, यज्ञा चौधरी, भक्ती पाटी, उत्कर्ष पाटील, दिक्षिता राठोड, जिज्ञासा सावकारे, निरल सुतार, समर गायकवाड, दर्शिल पाटील, ईश्वर कोळी, अनन्या शिराळे, लोचना पाटील, ईशान माळी, तनुश्री तिडके, राजनंदिनी पाटील, गौरी पाटील या बालकलावंतांनी अभिनय साकारला.

#बालराज्यनाट्य

Address

Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राज्य नाट्य स्पर्धा जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share