Mandar ganesh murti kendr sasoli dodamarg

Mandar ganesh murti kendr sasoli dodamarg Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mandar ganesh murti kendr sasoli dodamarg, Art, Ichalkaranji.

नाट्यमहर्षी ह. ल. भिसे गुरुजींना साष्टांग दंडवतकाही व्यक्तिमत्त्वे ही काळाच्या चौकटीत मावणारी नसतात. त्यांचे अस्तित्व एख...
09/06/2026

नाट्यमहर्षी ह. ल. भिसे गुरुजींना साष्टांग दंडवत

काही व्यक्तिमत्त्वे ही काळाच्या चौकटीत मावणारी नसतात. त्यांचे अस्तित्व एखाद्या वटवृक्षासारखे असते—स्वतः उन्हात उभे राहून सावली देणारी काही माणसं ही केवळ व्यक्ती नसतात, ती संस्कारांची चालती बोलती विद्यापीठे असतात; जणू काही ज्ञानाची अखंड वाहणारी गंगा कला, साहित्य आणि जीवनमूल्यांचे चालते-बोलते ग्रंथालय.नाट्यमहर्षी ह. ल. भिसे गुरुजी हे असेच एक विलक्षण आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व.

मराठी साहित्यावर ज्यांची विलक्षण पकड आहे, वाचन ज्यांचा श्वास आहे, नाट्यकला ज्यांचा ध्यास आहे आणि ज्ञानदान ज्यांचा धर्म आहे, अशा गुरुजींचा सहवास लाभणे हेच भाग्य. माझ्या आईने ज्या गुरुजींकडून पहिली अक्षरओळख घेतली, ज्या गुरुजींनी तिच्या हातून पहिला "श्रीगणेशा" गिरवून घेतला माझ्या वडिलांनी ज्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पहिले "सा रे ग म"आळवले नाट्यकलेचे पहिले धडे घेतले , त्या गुरुजींच्या हातात माझे "नरसिंह शिवराय" हे पुस्तक अर्पण करण्याचा योग आला, हे माझ्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचे आणि अभिमानाचे क्षण आहेत.

आजच्या वेगवान आणि उथळ होत चाललेल्या काळातही दिवसाचे सात-आठ तास एकाग्रतेने वाचन करणारा हा ज्ञानयोगी पाहिला की आश्चर्य वाटते. पुस्तकांशी त्यांचे नाते हे वाचक आणि पुस्तक यापुरते मर्यादित नाही; तर ते साधक आणि साधना असे नाते आहे. त्यांच्या हातात पुस्तक दिसले की वाटते, जणू एखादा ऋषी वेदांचा अभ्यास करत आहे. ज्ञानाच्या उपासनेत इतके तल्लीन झालेले व्यक्तिमत्त्व आजच्या काळात दुर्मीळच.

त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले "मुक्तद्वार ग्रंथालय" हे केवळ ग्रंथालय नाही; ती एक विचारचळवळ आहे. ती ज्ञानसंस्कृतीची पताका आहे. हजारो ग्रंथांच्या सहवासातून असंख्य वाचकांना घडवणारे हे मंदिर ज्याची कीर्ती केवळ सिंधुदुर्ग नाही तर सर्वदूर पसरली आहे . अनेक संस्था काळाच्या पडद्याआड गेल्या, अनेक उपक्रम विस्मृतीत गेले; पण मुक्तद्वार ग्रंथालय आजही वटवृक्षाप्रमाणे खंबीर उभे राहून ज्ञानाची सावली देत आहे. यामागे गुरुजींच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचे तेज आहे असच म्हणावं लागेल.

माझ्या बालपणीच्या आठवणींच्या पानांवर गुरुजींची अनेक चित्रे कोरलेली आहेत. रामनवमी असो, शिमगोत्सव असो किंवा एखाद्या संगीत नाटकाची तयारी—गुरुजी आमच्या घरी मुक्कामी असायचे. वडिलांची नाट्यतालीम सुरू असताना आम्ही लहान मुलं कान टवकारून प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर ऐकत बसायचो.

आजही आठवते, गुरुजींची ती भलीमोठी पायपेटी घरात आली की घराचे वातावरणच बदलून जायचे. तिचे भाते उघडले की त्यातून येणारा एक वेगळाच मनमोहक

31/05/2026

#छावा #शंभूराजे #छत्रपती

23/05/2026

#संस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य # सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र राज्य

18/05/2026

#छावा #शंभूराजे #छावा_सह्याद्रीचा

14/05/2026

#छावा #शंभूराजे #छावा_सह्याद्रीचा #छत्रपती

Address

Ichalkaranji
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mandar ganesh murti kendr sasoli dodamarg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category