श्री. कैलास खरे - गायक व कीर्तनकार

  • Home
  • India
  • Dombivli
  • श्री. कैलास खरे - गायक व कीर्तनकार

श्री. कैलास खरे - गायक व कीर्तनकार गायक व कीर्तनकार मी श्री. कैलास यशवंत खरे. मी युवा पिढीतील गायक आणि कीर्तनकार आहे. मी सांगितीक शिक्षण गानतपस्वी पं.

Kiran Phatak यांच्याकडे घेतो आहे. अभंग, नाट्यसंगीत, भक्तीसंगीत, भावसंगीत गायनाचे कार्यक्रमही करतो. आतापर्यंत अनेक संगीत नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. याखेरीज मी कीर्तने करतो. आतापर्यंत विविध पौराणिक, ऐतिहासिक - राष्ट्रीय, सामाजिक विषयांवर मी शेकडो कीर्तने केली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी कीर्तनसेवेची संधी मला मिळाली आहे. परमेश्वरी कृपा आणि आपणासारख्या रसिक सज्जनांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असावेत एवढीच प्रार्थना...!!!

08/09/2026

लंगडा गं लंगडा देव एक पायाने लंगडा |
असा कसा देवाचा देव बाई ठकडा ||

मोहाडी येथील समारोपाच्या म्हणजे काल्याच्या कीर्तनात उत्तररंगातील कथाभाग वर्णन करताना कृष्णाच्या बाललीला वर्णन करताना त्या बाललीला देखील किती सुखद होत्या हे सांगताना प्रमाण म्हणून शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा हा अत्यंत गोड अभंग गायचा प्रयत्न केलाय ज्याला मूळ स्वरसाज श्री. अजितकुमार कडकडे यांचा लाभला आहे...!! 🥰

जरूर ऐका...आणि शक्यतो इअरफोन ला ऐका म्हणजे आवाजाची अधिक चांगली गुणवत्ता मिळेल.. आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.. आणि हो आवडल्यास लाईक शेअर नक्की करा 😊🥰🙏🏻🙏🏻🙏🏻

साथसंगत -

तबला - अमेय हर्डीकर.
पखवाज - पंकज जाधव
ऑर्गन - सर्वेश पाध्ये.

06/09/2026

भेटीची आवडी उतावीळ मन |
लागलेसे ध्यान जीवीजीवा ||

मोहाडी येथील कालच्या समारोपाच्या म्हणजे काल्याच्या कीर्तनात उत्तररंगातील कथाभाग वर्णन करताना आलेली कथा म्हणजे गौळणींच्या कागाळ्या ऐकून त्यावर उपाय म्हणून श्रीकृष्णाला यशोदा मैय्या दिवसभर रानात गुरं राखायला पाठवते आणि कायम गोपिकांच्या दिवसभर मागे पुढे असणारा लाडका कृष्ण आता दिसत नाही म्हणून करमेना झालेल्या गोपिकांच्या मनाची स्थिती वर्णन करण्यासाठी प्रमाण म्हणून जगद्गुरू तुकोबा रायांचा हा अत्यंत गोड अभंग गायचा प्रयत्न केलाय ज्याला संगीत आणि मूळ स्वरसाज पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा लाभला आहे...!! 🥰

जरूर ऐका...आणि शक्यतो इअरफोन ला ऐका म्हणजे आवाजाची अधिक चांगली गुणवत्ता मिळेल.. आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.. आणि हो आवडल्यास लाईक शेअर नक्की करा 😊🥰🙏🏻🙏🏻🙏🏻

साथसंगत -

तबला - अमेय हर्डीकर.
पखवाज - पंकज जाधव
ऑर्गन - सर्वेश पाध्ये.

काल मोहाडी येथील श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदिरात श्री कृष्ण जन्माच्या कीर्तन सोहळ्यानंतर भेटायला येणारे भाविक रसिक श्रो...
05/09/2026

काल मोहाडी येथील श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदिरात श्री कृष्ण जन्माच्या कीर्तन सोहळ्यानंतर भेटायला येणारे भाविक रसिक श्रोते यांची भेट घेताना.. त्यांच्याशी बोलताना... इथे मोहाडी मधेच ( जो मूळचा जयसिंगपूर कडील आहे पण नोकरी निमित्त मोहाडी मध्ये वास्तव्यास आहे ) अश्या एका नव्याने झालेल्या मित्राने टिपलेली ही क्षणचित्रे ( candid image म्हणतात त्यातलीच काहीशी 😜) पण ती पाहून मन खरंच हरखून गेलं 🥰

यासारिखा आनंद आणिक नाही...!! तीन वर्षांचा लोकांशी जुळलेला स्नेहबंध त्याची मजा काही औरच...!! 🥰🥰 हे सगळं अनुभवताना कायम संतांचे हेच शब्द मुखी येतात... 👇🏻👇🏻👇🏻

हेचि घडो मज जन्म जन्मांतरी | मागणे श्रीहरी नाही दुजे ||

क्षणचित्र सौजन्य - हर्षवर्धन अलासे, जयसिंगपूर.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

05/09/2026

अनंत ब्रह्मांडे उदरी | हरी हा बालक नंदाघरी || १ ||
नवल केवढे केवढे | नकळे कान्होबाचे कोडे || २ ||
पृथ्वी ज्याने तृप्त केली | त्यासी यशोदा जेवू घाली || ३ ||
विश्वव्यापक कमलापती | त्यासी गौळणी कडीये घेती || ४ ||
तुका म्हणे नटधारी | भोग भोगूनी ब्रह्मचारी || ५ ||

मोहाडी येथील कालच्या महत्वाच्या श्रीकृष्ण जन्माच्या कीर्तन सोहळ्यात पूर्वरंगामध्ये " कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता " या श्री जगद्गुरू तुकोबा रायांच्या अभंगावर निरूपण करताना भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी बोलताना यासाठी प्रमाण म्हणून जगद्गुरू तुकोबा रायांचाच हा दुसरा अत्यंत गोड अभंग गायचा प्रयत्न केलाय...!!🥰🥰

जरूर ऐका...आणि शक्यतो इअरफोन ला ऐका म्हणजे आवाजाची अधिक चांगली गुणवत्ता मिळेल.. आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.. आणि हो आवडल्यास लाईक शेअर नक्की करा 😊🥰🙏🏻🙏🏻🙏🏻

साथसंगत -

तबला - अमेय हर्डीकर.
पखवाज - पंकज जाधव
ऑर्गन - सर्वेश पाध्ये.

छायाचित्रण सौजन्य - हर्षवर्धन अलासे.
( हा बिचारा माझ्यासोबत समोर दोन अडीच तास कीर्तनभर उभा होता आणि सगळ्या बाजूने फिरून सुंदर रिल्स टिपली आहेत त्यासाठी त्याचे विशेष आभार 😊🙏🏻🙏🏻 )

04/09/2026

संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ |
नाही तळमळ दुःख लेश ||

मोहाडी येथील कीर्तनात पूर्वरंगामध्ये " सदा संतांपाशी जावे | त्यांचे जवळी बैसावे || " या टेम्ब्ये स्वामींच्या अभंगावर निरूपण करताना संतांकडे काय मिळेल यासाठी प्रमाण देताना जगद्गुरू तुकोबा रायांचा हा अत्यंत गोड अभंग गायचा प्रयत्न केलाय ज्याला संगीत आणि मूळ स्वरसाज पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा लाभला आहे...!! 🥰

जरूर ऐका...आणि शक्यतो इअरफोन ला ऐका म्हणजे आवाजाची अधिक चांगली गुणवत्ता मिळेल.. आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.. आणि हो आवडल्यास लाईक शेअर नक्की करा 😊🥰🙏🏻🙏🏻🙏🏻

साथसंगत -

तबला - अमेय हर्डीकर.
पखवाज - पंकज जाधव
ऑर्गन - सर्वेश पाध्ये.

04/09/2026

भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते |
भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथुनी पाडीते ||

उलट उलट माघाऱ्या गड्या फिर गोते खाशी |
भरला पूर मायेचा लोंढा वाहुनिया जाशी ||

मोहाडी येथील कीर्तनात पूर्वरंगामध्ये " सदा संतांपाशी जावे | त्यांचे जवळी बैसावे || " या टेम्ब्ये स्वामींच्या अभंगावर निरूपण करताना संत / सद्गुरू कृपेनें काय साधेल याबद्दल विवेचन करताना प्रमाण म्हणून संत मुक्ताबाई यांचा हा अत्यंत गोड अभंग गायचा प्रयत्न केलाय ज्याला संगीत आणि मूळ स्वरसाज बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराज यांचा लाभला आहे...!! 🥰

जरूर ऐका...आणि शक्यतो इअरफोन ला ऐका म्हणजे आवाजाची अधिक चांगली गुणवत्ता मिळेल.. आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.. आणि हो आवडल्यास लाईक शेअर नक्की करा 😊🥰🙏🏻🙏🏻🙏🏻

साथसंगत -

तबला - अमेय हर्डीकर.
ऑर्गन - सर्वेश पाध्ये.
पखवाज - पंकज जाधव.

03/09/2026

जय शंकर ओंकार शुभंकर..
मुनीजन रंजन तूच निरंजन...

मोहाडी येथील कीर्तनात उत्तररंगात सुरुवातीला आख्यानाच्या अनुषंगाने श्री शिवांची स्तुती करण्याच्या हेतूने सहज आलेलं हे नाट्यगीत.... खरं तर हीं नांदी आहे... 😊🥰
जरूर ऐका...शक्यतो इअरफोन ला ऐका म्हणजे आवाजाची अधिक चांगली गुणवत्ता मिळेल.. आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.. आणि हो आवडल्यास लाईक शेअर नक्की करा 😊🥰🙏🏻🙏🏻🙏🏻

साथसंगत -

तबला - अमेय हर्डीकर.
पखवाज - पंकज जाधव.
ऑर्गन - सर्वेश पाध्ये.

02/09/2026

देव देव्हाऱ्यात नाही... देव नाही देवालयी..
देव चोरोनी नेईल अशी कोणाची पुण्याई?

मोहाडी येथील कीर्तनात पूर्वरंगात देवाचं अस्तित्व या विषयी बोलताना सहज आलेलं हे भक्तीगीत... 🥰 जरूर ऐका... शक्यतो इअरफोन ला ऐका म्हणजे आवाजाची अधिक चांगली गुणवत्ता मिळेल.. आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.. आणि हो आवडल्यास लाईक शेअर नक्की करा 😊🥰🙏🏻🙏🏻🙏🏻

साथसंगत -

तबला - अमेय हर्डीकर.
ऑर्गन - सर्वेश पाध्ये.

31/08/2026

श्रोतेहो नमस्कार 😊🙏🏻

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असणारं छोटंसं पण टुमदार गांव म्हणजे मोहाडी.. 🥰 आणि या मोहाडी गावातील एक विशेष मंदिर म्हणजे श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदिर...

या मंदिरात दरवर्षी गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त खास नारदीय कीर्तनमालेचं आयोजन केलं जातं.. यंदा माझं इथलं सलग तिसरं वर्ष आहे... आणि आता श्रोत्यांशी इतके सुंदर स्नेह बंध जुळले आहेत की काही श्रोते आता एखाद्या आख्यानाची फर्माईश करतात... त्यातलीच हीं एक फर्माईश म्हणजे संत सावता माळी आख्यान 😊

सावता माळी आख्यान म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे गीत आलंच पाहिजे.... तेच काल गायचा प्रयत्न केला होता... आवाजाच्या उत्तम गुणवत्ते साठी कृपया इअरफोन ला ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया जरुर कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा 🙏🏻🥰🥰

साथसंगत -
ऑर्गन - सर्वेश पाध्ये
तबला - अमेय हर्डीकर.

27/08/2026

Address

Dombivli
421201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री. कैलास खरे - गायक व कीर्तनकार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share