20/09/2025
चाळीशीच्या उंबरथ्यावर
चाळीशीच्या उंबरथ्यावर येता येता जीवनाचे बरेच पैलू उलगडत गेले.अश्याच काही उलघडलेल्या आत्मसाद केलेल्या समजलेल्या जिवाभावाच्या गोष्टी
आपला भूत व वर्तमानाचा समतोल म्हणजे जीवन.
मन हे इंद्रियांचं घर आहे.त्यात चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही राहत असून आपलं आयुष्य बदल्याण्याची त्याच्यात ताकत आहे.मन नियंत्रनात ठेवणं कठीण म्हणून त्याला चांगल्या विचारांची,गुणांची , संस्कारांची, चांगल्या सवयची शिकवणी लावावी लागते तेव्हाच ते आपल्याला कुठेही भटकू देत नाही.
मनुष्याच व्यक्तिमत्व,त्याचा स्वभाव, वर्तणूक हे जीवनाला आकार देण्याचे काम करतात त्यांचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
जगातला सगळ्यात भयानक सल्ला जाऊदे! द्या सोडून.
देशासाठी काम करणं प्रत्येक सरकारच कर्तव्य आहे आणि आपला देश आपलं राष्ट सांभाळण प्रत्येक नागरिकांची जबाबदारी जेव्हा कर्तव्य आणि जबाबदारीचा समतोल राखला जाईल त्या राष्ट्राची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही.
शब्द कठोर असले तरी चालतात पण कडू नको.कडू शब्द मनाला निराश करतात
दुःख सगळीकडे आहे कुणाकडे कमी कुणाकडे जास्त आहे कुठे दुःखाच्या झळा तर कुठे झुळूक आहे हे स्वीकारून पुढे चालत राहणं आपल्या हातात आहे कारण ह्या दुःखाचा अंत नाही परिवर्तन आहे.
अध्यात्म मनुष्याला जगण्याची कला शिकवते ती प्रपंच्यात राहून परामर्थाशी सुसंवाद घडवते स्वतःला ओळखायला मदत करते.
आपल्या कळत नकळत आपले हावभाव,स्वभाव,वर्तवणूक संवाद , शब्द प्रयोग आपलं व्यक्तिमत्व दाखवत असतात.
आपल्या आयुष्यात चांगलीच माणसं येतात पण ती आपल्यासाठी योग्यच असतील असं नसतं.
सुख किंवा दुःख एका रात्रीत होत नाही कोणती तरी भावनिक जखम किंवा एकादी सल जर योग्य वेळी बरी झाली नाही heal झाली नाही कि दुःख नावाचं दुखणं मागे लागतं.
स्वतःपासून सगळी नाती निर्माण होतात म्हणून स्वतःवर लक्ष देण काळजी घेणं स्वतःला प्राध्यान्य देण स्वार्थ नाही.
मतभेद वैचारिक असावेत वयक्तिक नाही कारण वैचारिक मतभेद परिस्थिवर तोडगा काढतात वयक्तिक मतभेत माणसांवर तोडगा काढतात.
फक्त जगणं महत्वाचं नाहीय जागृत जगणं वेळेची गरज आहे त्याने आयुष्यातली बरीच प्रश्न सुटतात.
नेत्रा पवार
being poetic