Samanvit

Samanvit We are a group of people who are interested in theater. We produce commercial theater programmes for

16/09/2015

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा

गायक / गायिका : आशा भोसले
संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर
गीतकार : ना.धो.महानोर
चित्रपट : जैत रे जैत

05/07/2015

माय म्हनायची रोज मुका घेऊन कपाळी
बाळा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी

व्हावं जशास तसंच कधी चोरावर मोर
थोर महात्म्यावानी रं व्हावं उद्याच्याला थोर..
नको -हाउस रिकामा, ठेव सुईमंधी दोरा
येळ काळ जशी हाय, तू बी तंसं वाग पोरा
राखवन कर नीट, ज्याची घेशील राखोळी
माय म्हनायची रोज मुका घेऊन कपाळी

तुझी लाडाची बहीन, खूप कर तिचे लाड
तुझं तिचं नातं जनू एक मूळ एक झाड
तीच लाडाची बहीन उद्या जाईल नांदाया
जवा येईल माहेरा तुला राखी रं बांधाया
कर बोळवन तिची, घाल अंगावर चोळी
माय म्हनायची रोज मुका घेऊन कपाळी

बाळ मोट्टा झाल्यावर, सून येईल घरात
तना मना धनासंगं तुला देईल ती साथ
तुझ्या सुखदु:खामंदी तुझी करील ती कीव
येळ आली तशी तर तुला देईल ती जीव
तू बी लाव जीव तिला..असो गोरी, असो काळी
माय म्हनायची रोज मुका घेऊन कपाळी

तुला सांगते अजून नीट घे रे तू ध्यानात
बाप राबतुया तुझा भर उन्हात तान्हात
तुझ्यासाठी जीव त्याचा रोज राहतो गहान
तुला करायाला मोट्टा खुद होतुया लहान
तुझ्या भल्यासाठी त्यानं केली जिंदगी वाटोळी
माय म्हनायची रोज मुका घेऊन कपाळी

सारं ऐकून मायचं मी बी म्हनायचो मग
झाली बतावनी सारी.....आता सांग तुझा वग..

तवा हसायची माय, मला म्हनायची भोळा..
काय सांगू माज्या बाळा.. माज्या पोटचा तू गोळा
तरी सांगते रं तुला मनातल्या चार ओळी

माय बाप बाई दादा .. रक्तामासाची ही नाती
पर याहूनही थोर.. तुझा देश.. तुझी माती
तुझं माझं सुख दु:ख.. हीच माती सोसतीया
तुला मला ह्याला त्याला हीच माती पोसतीया..
मातीसाठी लढावं रं.. खावी छातीवर गोळी..
माय म्हनायची रोज मुका घेऊन कपाळी.....

संतोष नारायणकर

28/03/2015

मनातल्या मनात मी - सुरेश भट

मनातल्या मनात मी
तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा
वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे;

तुझा सुगंध मात्र मी
इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले,
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले;

तुझ्या कळ्या, तुझी फुले
इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी,
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी;

'दुरून कोण हा तुझा
मकरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा,
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;

पहा कसा हवेत मी
तुझ्यासवे सळाळतो !

रंगभुमीवरील रंगभुमीमागील ..पडद्यावरील पडद्यामागील रंगदेवतेची सेवा करणारया सर्व कलावंतांना " जागतीक रंगभूमी दिनाच्या हार्...
27/03/2015

रंगभुमीवरील रंगभुमीमागील ..पडद्यावरील पडद्यामागील रंगदेवतेची सेवा करणारया सर्व कलावंतांना " जागतीक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎭"

Prize ceremony...
26/03/2015

Prize ceremony...

Ahmednagar karandak2015
26/03/2015

Ahmednagar karandak2015

Ekankika ...ek selfy ho jae....
26/03/2015

Ekankika ...
ek selfy ho jae....

Pailateer team...on stage back stage artists .....
26/03/2015

Pailateer team...
on stage back stage artists .....

1St show of pailateer at pune on  7 th feb 2015S.M.Joshi sabhagruh.
26/03/2015

1St show of pailateer at pune on 7 th feb 2015
S.M.Joshi sabhagruh.

21/03/2015

Hello Every One.............
Happy Gudi Padwa to You & Your Family

Address

Flat No. 2. Beyond House, Golande Estate
Chinchwad
411033

Telephone

8390337171

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samanvit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share