09/07/2020
किती कंटाळा आलाय यार घरात बसून बसून. . . 😒😏
अशीच काहीशी वाक्य आणि व्यथा प्रत्येकांकडून वारंवार कानावर पडतायत. . .
एकीकडे काही लोकांना घरात बसवत नाहीय तर दुसरीकडे घरी थांबण्याची ईच्छा होत असताना देखिल घरा बाहेर जावं लागतय असे ते आपले आणि तुमचे आमचे. .
#पोलिस #डॉक्टर #नर्सेस आणि #सफाई_कामगार. .
त्यांना घराच्या बाहेर जाण्याची #हिम्मत होत नाहीय. .
हो मी हिम्मत म्हणेल कारण, रोज ते बाहेर कुणाच्या ना कुणाच्या आकांता बघत आहेत, कोणीच बाहेर निघत नसताना जिवावर उदार होऊन बाहेर पडत आहेत,जड मनाने कुटुंबापासून लांब जात आहेत, घरी जात असताना आपल्याला संसर्ग झालेला तर नसेल ना या भितीने घरी जाऊन सुद्धा आतुरलेल्या लेकरांपासून लांब राहत आहेत. . .
दुर्दैवाने या महामारीच्या विरोधात लढणाऱ्या कित्येक योद्ध्यांनी आपले प्राण गमावले. . .
एवढं सगळं असूनही हे योद्धे आजतागायत खऱ्या अर्थाने लढत आहेत. . .
अशा शूरवीर योद्ध्यांना शतशः नमन. . . . 🙏🙏🙏🙏🙏