Vishnubaaug - The Environment Theme Park

Vishnubaaug - The Environment Theme Park A place to relax and unload your stress in the arms of mother nature and fresh air with tasty food a Campground

01/03/2025
विष्णु बाग  आम्ही नेहमीच आलेल्या पर्यटकांना वेगळे देण्याचा प्रयत्न करीत असतो . विष्णु बागेची जमेची बाजू म्हणजे बागेस लाग...
17/02/2025

विष्णु बाग आम्ही नेहमीच आलेल्या पर्यटकांना वेगळे देण्याचा प्रयत्न करीत असतो . विष्णु बागेची जमेची बाजू म्हणजे बागेस लागून असलेला उल्हास नदी किनारा, बदलापूर शहरापासून ६ किलोमीटर अंतर , बागेत आल्यानंतर आमराई , मोकळे मैदान, विविध वृक्षांनी नटलेला हिरवागार निसर्ग, नदी पलीकडे दिसते ती माथेरानची पर्वतरांग, मुलांसाठी प्ले झोन , आमची खात्री आहे की तुम्ही येथे तुमचा चांगला वेळ तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने घालवू शकता तर नक्की भेट द्या विष्णू बाग बदलापूर पश्चिम
विष्णु बाग संपर्क : 7030228787

पाहुणचारात घरगुती जेवणाचा स्वाद असावा ह्या कडे आमचा कल असतो त्यामुळे  ह्या खेपेस  कल्याण येथून vishnubaaget आलेल्या 45 ज...
27/02/2024

पाहुणचारात घरगुती जेवणाचा स्वाद असावा ह्या कडे आमचा कल असतो त्यामुळे ह्या खेपेस कल्याण येथून vishnubaaget आलेल्या 45 जणांच्या South Indian community group (malyalam) साठी कसं जेवण दिलं म्हणजे आवडेल हा मोठा Task होता 😄

आपण मात्र पिठलं भाकरी,
भरलं वांग, कच्च्या केळ्याची भाजी, चिकन रस्सा , मच्छी फ्राय अश्या पद्धतीत जेवण देऊन त्यांना खुश केलं.

त्यांच्या रोजच्या जेवणामध्य इडली सांबार डोसा हे पदार्थ असतातच त्यामुळे त्यांना झणझणीत मिसळ-पाव breakfast मध्ये देण्याचा निर्णय घेतला .

मिसळ वर ताव मारत... आम्हाला अगदी हेच पाहिजे होत अस तृप्त होत त्यांनी आमच्यावर कौतुकाचा वर्षावच केला😊

त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्या ग्रुपच्या refrance ने येणारे booking साठी फोन.. हीच आमच्या मेहनतीची पोच पावती आहे 😊🙏🏽

टोमॅटो ,चवळी  ,गवार  वांग , दुधी अशी विविध भाजीचे पीक आम्ही विष्णु बागेत  घेत आहोत. विष्णु बाग  देवलोली गाव बदलापूर - सा...
02/02/2024

टोमॅटो ,चवळी ,गवार वांग , दुधी अशी विविध भाजीचे पीक आम्ही विष्णु बागेत घेत आहोत. विष्णु बाग देवलोली गाव बदलापूर - सावरा रोड बदलापूर पश्चिम

24/01/2024

विष्णु बाग आता लोकांच्या पसंतीस येऊ लागले आहे. सुंदर सजावट,उत्तम रुचकर जेवण ,बागेतील स्वच्छता त्याच जोडीला नयन रम्य परिसर .सहलीस आलेली लोक इथला पाहुणचार घेतल्यानंतर त्यांचे घरगुती समारंभ इथेच करायचे ठरवतात . वाढ दिवस असो वा मुंज हळद ,संगीत, आणि लग्न ही एकाच ठिकाणी संपन्न होतात. आलेल्या पाहुण्यांची पिकनिक तर पिकनिक होते, त्याच जोडीला समारंभ देखील साजरा होतो.

02/01/2024

नमस्कार विष्णु बाग परिवारातर्फे आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार आपण विष्णु बाग येथे भेट देऊन सहलीचा आनंद घेतला. तुम्ही पुनः परतीचा प्रवास करताना आनंदाचे क्षण घेऊन नक्की परतला असाल हे नक्की ह्यात आमच्या संपूर्ण टीम चे देखील समाधान आहे.
विष्णु बाग तर्फे आम्ही सातत्याने आमच्या या बागेत काही तरी नवीन करण्याचं प्रयत्न करू ,त्यासाठी आमच्या कडे तुमच्या सारखी हक्काची माणसे आहेत .जी पुनः पुनः येथे येऊन आमचा उत्साह वाढवतील. आमचा प्रयत्न अगदी सोन्याच्या अस्सल खणखणीत नाण्याप्रमाने तुम्हाला सेवा देणे हाच असेल
तुम्ही पुढील वेळेस विश्वास नाही तर खात्रीने आमच्या कडे याल ,त्यावेळेस पुन्हा अगदी आदरातिथ्य भावाने आम्ही तुम्हाला परत एकदा म्हणू विष्णु बागेत आपल स्वागत आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा

चाफा बोलेना, चाफा न बोलताच त्याच्या सोबत तासनतास उभे राहावेसे वाटते. चाफ्याचा सुगंध, पांढरा शुभ्र रंगांच्या मध्ये  असलेल...
12/10/2023

चाफा बोलेना, चाफा न बोलताच त्याच्या सोबत तासनतास उभे राहावेसे वाटते. चाफ्याचा सुगंध, पांढरा शुभ्र रंगांच्या मध्ये असलेली पिवळसर छटा हे मूळ आकर्षण आणि ऊन ,वारा ,पाऊस या ऋतू मध्ये कणखर पणे उभे राहण्याची अदा ह्या सगळ्या गोष्टी याच्या कडून शिकण्यासारखे आहेत. वर्षापूर्वी आम्ही लावलेलं हे झाड आता छान बहरू लागले आहे.
विष्णु बाग: Devloli Village Badlapur Savra road, Badlapur west

विष्णु बागेत आपण पिकवलेली भाजी कारले,वडीचाअळू ,दुधी सांगायचे म्हणजे कारले जरी खावयास कडू असले तरी त्यात कष्टाचा गोडवा मि...
11/10/2023

विष्णु बागेत आपण पिकवलेली भाजी कारले,वडीचाअळू ,दुधी सांगायचे म्हणजे कारले जरी खावयास कडू असले तरी त्यात कष्टाचा गोडवा मिसळला आहे. निसर्गाचे रूप त्याचा सोबतच्या सहवासाने अनुभवायला मिळते आणि मिळतो तो फक्त आनंद .

बदलापूर मध्ये ⛺ कॅम्पिंग व्यवस्था, एका छोट्या कुटुंबासाठी टेंट मध्ये राहण्याचा अनुभव.  आकर्षक टेंट ,रुचकर जेवण ,सोबत स्व...
10/10/2023

बदलापूर मध्ये ⛺ कॅम्पिंग व्यवस्था, एका छोट्या कुटुंबासाठी टेंट मध्ये राहण्याचा अनुभव. आकर्षक टेंट ,
रुचकर जेवण ,सोबत स्वीमिंग पूल, रेन डान्स आणि सगळ्यात मह्त्वाचं म्हणजे ठाणे,डोंबिवली,कल्याण ,अंबरनाथ येतील पर्यटक तासाभरात या ठिकाणी पोहचू शकतील.
Vishnubaag :7030228787
Vishnubaag devloli Village, Badlapur Savra Road, Badlapur West

Address

Deololi Village, Savara Road, Badlapur Gaon, Badlapur (west), Dist Thane Pin
Badlapur
421503

Opening Hours

Monday 9:30am - 5pm
Tuesday 9:30am - 5pm
Wednesday 9:30am - 5pm
Thursday 9:30am - 5pm
Friday 9:30am - 5pm
Saturday 9:30am - 5pm
Sunday 9:30am - 5pm

Telephone

+917030228787

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishnubaaug - The Environment Theme Park posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Vishnubaaug - The Environment Theme Park:

Share